आमच्याविषयी

Brands Of Nanded…!

थेट … लोकल टू ग्लोबल …!!

ब्रँडीग साठीचे वेगवेगळे ऑप्शन्स् आपल्याच भागात एकाच व्यासपीठावर उपलब्ध ..

मराठवाड्यातील माणूस उद्योगात किंवा व्यवसायात तग धरू शकत आणि ईथले व्यवसाय हे एका मर्यादेपेक्षा पुढे सरकत नाहीत अशा बाबी आपल्या आजूबाजूला सर्वत्रच चर्चिल्या जात असतात हे आपण नेहमी पाहतो …

त्याही पुढे जात आपण एक बाब प्रकर्षाने नोंद घेतो ती म्हणजे आपल्या मराठवाड्यातील युवकांसाठी काही तरी केले पाहीजे … मराठवाड्यातील युवकांनी उद्योग व्यवसायात उडी घेतली पाहीजे … नवीन संधी निर्माण केल्या पाहीजे … पण आताच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील अनेक युवकांनी आपल्या भागात नवीन स्टार्ट अपस् तयार केले आहेत .. ईथले काही ब्रँडस् सातासुमद्रापार गेले आहेत .. तर काही ब्रँडस् नी देशभरात आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण केली आहे तर काहींनी आप-आपल्या भागात दमदार जम बसविला आहे …

या सर्वांनाच आजरोजी आपला ब्रँड अजून पुढे गेला पाहीजे व त्याचबरोबर बॅ्ँडच्या ईमेज बरोबर तो विविध अर्थांनी चहूबाजूने चर्चित राहीला पाहीजे असं सर्वसाधारण उद्धीष्ट असतं …ब्रँड मोठा तर प्रत्येकालाच करायचा आहे … पण तो कसा आणि कशाप्रकारे याची अडचण तर मोठ्या तसेच उदमोन्मुख अशा दोन्ही उद्योजकांच्या समोर आहे ..असते ..

मी माझ्या विविध वर्तमानपत्रातील नौकरीच्या दरम्यान ज्यात लोकमत.. दै. आनंदनगरी व सकाळ या दर्जेदार वर्तपत्रांसोबत संपूर्ण मराठवाडाभर काम करतांना बारा वर्षाच्या कारकीर्दीत एक बाब प्रकर्षाने नोंदविली ती म्हणजे उद्योजक-व्यावसायिक-नवीन स्टार्ट अपस् आदींना ब्रँडीगच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी व त्यावरील एक खांबी सोल्युशन …. यावर विचार करत असतांनाच उद्योग-व्यावसायिक-उदयोन्मुख नेतृत्व क्षेत्रातील बांधवांसाठी एक नवीन … सशक्त व मजबूत बहुआंगी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने … बँडस् ऑफ नांदेड …थेट लोकल टू ग्लोबल .. हे नवीन वेब पोर्टल सूरू करण्याच्या निर्णय घेतला असून ज्यात प्रामुख्याने आज रोजी उपलब्ध आयुधा मधून विविध ब्रँडींग फंडे हे आपल्या मराठवाड्यातील व्यावसायिकांना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे या अर्थाने आपल्या मराठवाड्यातील विविध भागात कार्यरत असणाऱ्या सर्वच व्यावसायिकांची-उद्योन्मुख नेतृत्वांची दखल … घ्यावयाची आहे …

खऱ्या अर्थाने आजच्या वेगवान काळात प्रत्येक व्यवसायाला ब्रँडीगची गरज असून पण या ब्रँडीग संदर्भात अनेक गैरसमज पाहावयाला मिळतात त्यातील मुख्य म्हणजे ब्रँडीग किंवा जाहीरात हा अनावश्‍यक खर्च असून त्याची आपल्या व्यवसायाला आजरोजी गरज नाही … पण खरी चूक ईथेच होते … ज्याअर्थी आपण नवीन स्टार्ट अप सुरू केलं आहे त्याअर्थी ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचलं पाहीजे असं म्हणतात ना मोठ्या वृक्षा पेक्षा छोट्या रोपट्यांना अधिक खतपाण्याची गरज असते …

त्यावर आधारीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नवनवीन संकल्पना आपल्या भागातील व्यावसायिकांना अंत्यत अल्प दरात देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून असणार आहे

आपणही आमच्या नवीन संकल्पनेस् प्रतिसाद द्याल या खात्रीसह …

धन्यवाद ..!

आपला स्नेहाकिंत,

मारोती सवंडकर , नांदेड …

Maroti Sawandkar,

Cell- 9370365554 / WhatsApp- 9850304297

E-Mail : marotisawandkar01@gmail.com