#रंगाच्या रंगसंगती सोबतच कलेच्या क्षेत्रातील वाटचाल – प्रशांत गुर्जर !

#जन्मदिनस्य अभिष्टचिंतनम्
जीवेत शरद: शतम् …!
—————————————-
#आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांचे हार्दीक अभिष्टचिंतन ….!!
#प्रशांत गुर्जर म्हणजेच आमचे लाडके दादा त्यांची व माझी ओळख माझ्या बालपणापासूनची …. ते वसंतनगर भागात राहावयास होते व राजर्षी शाहू शाळेच्या मैदानावर ते आणि त्यांचे मित्र क्रिकेट खेळायला यायचे तेंव्हा आम्ही अगदी लहान होतो तेंव्हापासून मी त्यांना ओळखतो … त्यानंतर मी पुनश्चः नांदेडात आल्यावर त्यांनी मला वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन … सकाळ मधील आणि त्यांनतर आजतागायत त्यांनी माझ्या कारकिर्दीत केलेली सातत्यपूर्ण मदत… प्रशंसा..
शाबासकी…. पाठराखण…. तसेच सातत्यपूर्ण मार्गदर्शन….. या सगळ्यांसाठी मी कायम त्यांच्या ऋणात राहू इच्छितो …. प्रशांत गुर्जर….. एक सच्चा मित्र, भाऊ,सरळ साधा कुठेही उपलब्ध होणारा माणूस…..म्हणून आमच्या सगळ्या टिमचे संकटमोचन म्हणून सर्वांना आवडणारे असे व्यक्तित्व…..
स्वतः गरीबी मध्ये जन्म घेऊन मनाने श्रीमंत असलेला जिवा-भावाचा माणूस. ग्रामीण भागात दहावी पर्यंत शिक्षण घेतले. गाव सोडले. स्वतः कष्ट करत पुढील शिक्षण घेतले. नांदेड सारख्या वाढत्या शहरात अनेकांशी संबंध प्रस्थापित केले. गरीबीचा कधीही बाऊ केला नाही. स्वकष्टावर आपल्या व्यवसायात त्यांनी जम बसविला. अनेकांना नोकरीला, उद्योग धंद्याला लावले माझ्यासारख्यांना तर ते कायमच बॅकिंग सपोर्ट च्या भुमिकेत राहीले ….
आजही प्रशांत गुर्जर म्हटले की, समोर येतो तो त्यांचा साधा सरळ स्वभाव आणि साधी राहणी व आधुनिक व ग्रामीण भागाची सांगड असलेला पेहराव.. साधा शर्ट, जीन्स ची पॅन्ट आणि ईनशर्ट केलेला टापटीप व निट क्लिन सेव्ह असलेला आनंददायी चेहरा पण चेहऱ्यावर निराळाच उत्साह घेऊन निघालेला हा माणूस .. सामान्यातल्या सामान्य माणसात निखळ, निर्मळ, नितळ पाण्यासारखा मिसळून जातो.. आपलासा वाटतो…. हि तर त्यांची खासियत…आणि आजवरच्या यशाचे गमक आहे ….!
अत्यंत सर्जनशील आणि उत्तम व्यक्तित्व लाभलेल्या प्रशांत गुर्जर यांना जाहिरात क्षेत्रात कामाच्या बळावर उदंड संधी निर्माण झाल्या आहेत. या क्षेत्रात त्यांनी स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे त्यांचे हे यश केवळ त्यांच्याकडे असलेली अस्सल सर्जनशीलता आणि मेहनत घेण्याची अफाट क्षमता या बळावरच !
जाहीरात क्षेत्राबद्दल ते नेहमीच तीन तत्त्वे अगदी ठामपणे मांडतात व तीच आचरणात आणतात ती म्हणजे कल्पकता…व्यापकता आणि अचूकता …. जाहिरातीच्या प्रत्यक्ष मांडणीमध्ये सातत्य आणि संगती राखावी लागते म्हणजे प्रत्येक जाहिरातीत एक प्रकारचे शाब्दिक वा चित्रात्मक साधर्म्य असावे लागते हे वरील तत्वांच्या आधारे ते बांधील असलेली फिलॉशॉपी अशी त्यांची ठरलेली जाहीरात संदर्भातील सर्वसाधारण उजळणी ते मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या कलेच्या क्षेत्रात वापरतांना दिसतात…१४ ऑक्टोबर या जागतिक जाहिरात दिनी त्यांचा वाढदिवस हा ही एक उत्तम योग ..!!
अशा विविधांगी , कल्पक, गुणात्मक आणि मनमोकळ्या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना भरभरून शुभेच्छा व पुढील आनंददायी वाटचालीसाठी सदिच्छा ….!
सदैव आपलाच ,
मारोती सवंडकर , दै.उद्याचा मराठवाडा, नांदेड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *