मा. धनंजय तांबेकर साहेब ..!

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन …!

गोदावरी अर्बन एक विश्‍वासात्मक वाटचाल …वाटचालीत महत्वपूर्ण योगदान असलेलं व्यक्तिमत्व श्री धनजंय तांबेकर साहेब …

जनता, व्यापारी, शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक, सरकार, शेअर मार्केट आणि देशी-परदेशी संस्था यांच्याशी आर्थिक व्यवहार करणार्‍या संस्थेस बँक म्हणतात पण बँकेला विश्‍वासदर्शक पथमार्गावर मार्गस्थ करणाऱ्या व्यक्तिमत्वाला व्यवस्थापकीय संचालक म्हणतात ही व्याख्या ज्या ठिकाणी तंतोतंत जुळते ते म्हणजे गोदावरी अर्बन चे व्यवस्थापकीय संचालक श्री धनजंय तांबेकर साहेब यांच्या पाशी ….

या वर्षी साहेबांच्या वाढदिनी श्री तांबेकर साहेबांना बऱ्याच दिवसानंतर आज पुन्हा एकदा प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला … त्यांच्या प्रत्येक भेटीत बँक म्हणजे काय … आणि ती चालते कशी ….त्याही पुढे जाऊन नवीन बँकाना ठेवी कशा मिळतात .. बँकीग ची कोअर यंत्रणा कशाप्रकारे कार्य करते …. ऑनलाईन सेवांवर बँकेच्या यंत्रणेचा अंकुश …. बँकीग क्षेत्रातील मर्यादा…. ईथपासून ते गोदावरी अर्बनची आजपर्यंतची वाटचाल……. पुढील विस्तार ….. या सगळया बाबींवर चर्चा व्हायची आणि त्यातून आम्हालाही एका नव्या क्षेत्रातील महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण माहीतीही मिळत जायची या माहीतीतीलच श्री तांबेकर साहेबांनी सांगितलेला भारतीय बँकीगचा ताळेबंद एक वर्तपानपत्राशी निगडीत व्यक्ति म्हणून मला तांत्रिक दृष्ट्या अजून सक्षम करणारा तर होताच पण एका नव्या क्षेत्राविषयी स्कोप वाढविणाराही होता तो म्हणजे असा की त्यांनी मांडलेल्या आकडेवारीच्या तपशिलानुसार ते म्हणाले की २०१४ सालच्या मोजणीनुसार, भारतामधील व्यावसायिक बँकांची एकूण संख्या १६७ आहे व त्यांच्या शाखांची संख्या ८८ हजारांच्या आसपास जाते. इतक्या सगळ्या बँकांत काम करणार्‍यांची संख्या आठ लाखांहून थोडी अधिक आहे.

अशी माझ्या बँकीग च्या ज्ञानातील भर ही त्यांच्या भेटीतून आलेला महत्वपूर्ण ठेवा आहे असे मी मानतो पण देशाअंतर्गत बॅकीग बरोबरच त्यांनी मांडलेला जागतिक स्तरावरील बँकीग क्षेत्रातला रोजगाराचा ताळेबंद एक भारतीय म्हणून मला अस्वस्थ करणारा वाटतो तो असा…

या तुलनेत चीनमधल्या व्यावसायिक बँकांची संख्या २५०, आणि बँकिंग सेवा देणार्‍या संस्थांची संख्या ३,७६९ इतकी आहे. या सगळ्या संस्थांच्या चीनमधल्या एकूण एक लाख ९६ हजार इतक्या शाखांमध्ये ३० लाख कर्मचारी काम करतात. जगभरातल्या सर्वात मोठ्या १०० बँका घेतल्या, तर त्यात एकट्या चीनमधल्या ११ बँका आहेत, त्याही अगदी सुरुवातीच्या क्रमांकांवर. या यादीत भारतातल्या तीन बँका आहेत, मात्र त्या यादीत शेवटी शेवटी येतात. इंडस्ट्रियल ॲन्ड कमर्शियल बँक ऑफ चायना ही चीनमधली सर्वात मोठी बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही तिची भारतातील प्रतिस्पर्धी बँक आहे. चीनच्या इंडस्ट्रियल ॲन्ड कमर्शियल बँकेचा व्यवसायाकार आहे २०,१०० कोटी डॉलर इतका. त्या तुलनेत भारतातील स्टेट बँकेचा व्यवसाय ४,००० कोटी डॉलर इतकाच आहे म्हणजेच आपल्या देशात बँकीग क्षेत्र वाढीसाठी अजून खूप मोठा स्कोप आहे… त्या स्कोप नुसारच मी आणि आमची टिम आमचे ध्येय निश्‍चित करून मार्गस्थ आहोत हा त्यांचा आशावाद मोठा आश्‍वासक वाटतो…

त्याबरोबरच ते मांडतात की, आपल्या भागातील बॅकाची गरज ही आणखी खूप मोठ्या प्रमाणात असून त्या मार्गक्रमात गोदावरी अर्बनची स्थापना राजश्री ताईं व आदरणीय हेमंत पाटील साहेब यांच्या पुढाकारातून नांदेडात करण्यात आली सर्वांनी एकत्र येऊन एकदिलाने आणि एकविचाराने समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कसून प्रयत्न करणे हे गोदावरी अर्बन चे तत्व होय.

आजच्या घडीला बँकेच्या खातेधारक सदस्यांच्या अडचणींची सोडवणूक करणे, त्यांना मदत करणे आणि अशा पद्धतीने सर्व खातेधारक सदस्यांचे हित साधणे हा मुख्य हेतू समोर ठेवत समाजपयोगी कामात बँकेचा नेहमीच पुढाकार असतो त्याबरोबरच नफा मिळविणे हे उद्दिष्ट असले, तरी ते दुय्यम महत्त्वाचे असून स्थानिक व्यापार आणि छोटे उद्योगधंदे व्यापारी आणि छोटे कारखानदार यांना अल्प व दिर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्या बरोबरच इंथ येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला समाधानकारक सेवा देण्याचे कार्य बँकेच्या माध्यमातून होत असून त्यास ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे ..

एम. डी. धनंजय तांबेकर यांचा नुकताच मा. नितीन गडकरींच्या हस्ते गौरव

५ ऑक्टोबर २०२१ रोजी गोदावरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…

गोदावरी अर्बनने राज्यासह इतर चार राज्यात अवघ्या आठ वर्षाच्या कालावधीत केलेल्या नेत्रदीपक प्रगतीची सहकार भारतीने दखल घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांचा गौरव करण्यात आला आहे. सहकार भारतीद्वारा आळंदी, पुणे येथे ११ व्या त्रैवार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे, खा. सुजय विखे पाटील, रिझर्व्ह बँक संचालक सतिश मराठे,यांची उपस्थिती होती.

गोदावरी अर्बनने अल्पावधीतच महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक व गुजरात या पाच राज्यात शाखा विस्तार केला आहे. संस्थेच्यावतीने ग्राहकांना राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. याचा फायदा त्यांना गेल्या दोन वर्षात देशात सगळीकडे कोरोनाची बिकट परिस्थित अनेक मातब्बर संस्थाचा प्रगतीचा आलेख मंदावला असतांना देखिल संस्थेने आपल्या ग्राहकांना घरपोच सेवा, मोबाईल बँकिंग, ऑनलाईन व्यवहार अशा अपेक्षीत सेवा राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी यांची प्रमुख देत प्रगतीचा आलेख उंचावर नेला आहे..

अशा बँकीग क्षेत्रातील प्रत्येक खाच-खळग्यांची व अत्याधुनिक बदलांसोबत तंत्रज्ञानाची सखोल जाण असलेल्या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने श्री तांबेकर साहेबांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनभरून शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून सदिच्छा …

आपला स्नेहाकिंत ,

मारोती सवंडकर , दै. उदयाचा मराठवाडा , नांदेड …

९८५०३०४२९७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *