प्रा. व्ही डी कोनाळे !

#वाढदिवसाचे अभिष्टचिंतन…!!

#सोज्वळ मनाचा सच्चा माणूस – प्रा. व्ही डी कोनाळे सर,
#अंत्यत शिस्तीचे शिक्षक, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून मार्गक्रमण करणारे धैयवेडे व्यक्तिमत्त्व, कोनाळे कलासेस चे संचालक आदरणीय सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

#रसायनशास्त्रासारखा अवघड विषय हाताळत ‘आयआयटी’,’ नीट’ व ‘एम्स’ सारखे दर्जेदार शिक्षणाचे माहेरघर प्रा. व्हि. डी. कोनाळे यांनी नांदेडसारख्या शहरात केल्याचे त्यांच्या सातत्यपूर्ण निकालावरून दिसुन येते. अगदी तीन-चार वर्षापूर्वी आयआयटी च्या प्रवेश परिक्षेची तयारी करण्यासाठी नांदेडच्या विद्यार्थ्याना अन्य मोठ्या शहरात धाव घ्यावी लागत असे ही बाब लक्षात घेत प्रा. कोनाळे सरांनी तीन वर्षापूर्वी आयआयटी सेंटर आपल्या नांदेडात सुरू केले त्यासाठी उच्च शिक्षित शिक्षक वृंद आपल्या नांदेडात आणला त्याचमूळे आता कोनाळे आयआयटी सेंटर नांदेडच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे….

आज जरी नांदेड हे शहर शिक्षणाचे हब म्हणून नावारुपाला आले आहे तरी एकेकाळी नांदेडातील टॉपर्स विद्यार्थ्यांचा ओढा कायमच् मोठया शहरांकडे असायचा … तो ओढा थांबविण्यात प्रा. कोनाळे यांच्या कोनाळ पॅटर्न चाही मोलाचा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही जरी प्रा. कोनाळे यांची जन्मभूमी उदगीर जि. लातूर जरी असली तरी त्यांनी आपली कर्मभूमी नांदेडला मानत हजारो विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या आयआयटी आणि वैद्यकिय क्षेत्रात पाठविले आहे. त्यामुळे प्रा. कोनाळे हे नांदेडसाठी नक्कीच भुषणावह आहेत…

लातूर जिल्ह्यातील उदगीर लातुक्यात असलेल्या तळेगाव या लहनशा गावात शेतकरी कुटूंबात जन्म घेऊन प्राथमीक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी नांदेडला आले. येथेच आपले भविष्य बनवायचे या हेतून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेऊन येथील यशंवत महाविद्यालयात सन १९९८ ते ९९ असे दोन वर्ष प्राध्यापकाची नोकरी केली. विशेष म्हणजे इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत असतांना ते खाजगी शिकवणी घेऊन कमवा व शिका या प्रमाणे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. ज्याकाळात नांदेडातून वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या नामाकिंत महाविद्यालयात प्रवेश मिळवणे हे खूपच दुर्मिळ होते त्या काळात आपल्या पतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकिय व अभियांत्रीकी क्षेत्रात जाता येत असल्याने त्यांच्या कामातील काही भाग त्यांच्या पत्नीने उचलून घेतला व प्रा. कोनाळे सरांना अधिक वेळ हा विदयार्थ्यांना देता यावा यासाठी त्यांनी आपली सुस्थितीत असलेली शिक्षिकेची शासकिय नोकरी सोडली… साधारणपणे १५-२० वर्षापूर्वी किती मोठा निर्णय व त्याग हा…. त्याच मुळ संकल्पनेतून आजमितीला श्री. कोनाळे हे दरवर्षी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियाचे पाल्य आणि गरजू व हुशार परंतु आर्थीक परिस्थिती नाजूक असलेल्या शेकडो मुलांना ते माफक तर काही जणांना मोफत शिकवणी देतात.

प्रा. व्ही.डी. कोनाळे नांदेडमध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी मागील २५ वर्षापासून मार्गदर्शन करतात या बळावरच त्यांचे सखोल मार्गदर्शन वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी कारणीभूत असल्याचे कित्येक विद्यार्थी मोठ्या अभिमानाने नमूद करतात … आणि अधिक विस्ताराने ते दरवर्षीच्या अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश याद्यांवरून सिद्ध होते….

प्रा. कोनाळे सरांशी चर्चा करतांना अगदी काल घडलेल्या घटने प्रमाणे ते सांगतात की ,१५ वर्षापूर्वी आदिती देशपांडे ही विद्यार्थिनी १२ वी मध्ये नांदेड जिल्ह्यातून पहिल्या क्रमांकाने झळकली. थोडं आठवणीत रमतांना ते नमूद करतात की , कोनाळे केमिस्ट्री क्लासेसचे विद्यार्थी दिव्या बियाणी (२०१०), अकिता हंगरगेकर (२०११) हे १२ वीतून त्यावेळी संपूर्ण राज्यात सर्वप्रथम आले होते तर सीईटी परिक्षेत सुमित धुळशेटे हा २०१२ मध्ये राज्यात सर्वद्वितीय आला होता तर सर्व तृतीय येण्याचा गौरव क्लासेसच्या श्रद्धा सोमाणी हिने प्राप्त केला असे ते एकापक्षा एक अशा नयनरम्य आठवणीत रमतांना आपली कारर्किद डोळयासमोर जशीच्या तशी उभी करतात..

आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना आपल्या ‘मायक्रो- टीचिंगच्या बळावर प्रा. कोनाळे यांनी ‘ऑक्सिजनची कमतरता पडू दिली नाही हे विशेष अशा विद्यार्थ्यांत रमणाऱ्या हाडाच्या शिक्षकाचा व सोज्वळ मनाच्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना अनंत शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी अनेक सदिच्छा…

#प्रा.व्हि.डी.कोनाळे… समजून घेतांना …एकदा वाचाच…!

उदगीरातून नांदेडात आल्यानंतर यशवंत महाविद्यालयात एम. एससी आणि त्यानंतर शासकीय अध्यापक विद्यालयातून त्यांनी बी. एडचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण करत असतानांच नांदेडमध्ये सुद्धा शिका, शिकवा व कमवा’ अशी सुरुवात १९९५ मध्ये त्यांनी कोनाळे केमिस्ट्री क्लासेसच्या माध्यमातून केली. छोट्याशा रूममधून झालेली ही सुरुवात केवळ १७ विद्यार्थ्यावर करण्यात आली. यशवंत महाविद्यालयात १९९८ ते ९९ या काळात तासिका तत्त्वावर अध्यापनाचे काम केले. त्यानंतर मात्र पूर्णपणे नांदेडमध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना केमिस्ट्री या विषयाचे अध्यापन सुरू केले. आज दोन तपानंतरही प्रा. व्ही. डी. कोनाळे यांच्या रुपाने वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशाच्या वाटेवरल्या पांथस्थासाठी मार्गदर्शनाचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.—

सर सलाम तुमच्या संघर्षाला..!

आपला स्नेहाकिंत,
मारोती सवंडकर, दै.उद्याचा मराठवाडा, नांदेड..
९८५०३०४२९७..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *