जिओजित च्या नांदेड शाखेचे नवीन जागेत स्थलांतर !

जिओजीत नांदेड शाखेचा १४ वर्धापनदिन उत्साहात साजरा..!

वर्धापन दिनानिमित्ताने नवीन जागेत स्थलांतर

नांदेड – बातमीदार

देशातील सुप्रसिद्ध गुंतवणूक मार्गदर्शक कंपनी असलेल्या जिओजित च्या नांदेड शाखेचा १४ वा वर्धापन दिन ९ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व वर्धापन दिनानिमित्ताने जिओजित च्या स्थलांतरीत नव्या कार्यालयाचे उद्धाटन आगळे कॉम्पलेक्स, कलामंदीर समोर, डॉक्टर लेन येथे, नांदेड क्रेडाई चे अध्यक्ष श्री नितीन आगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिओजित चे विभागीय व्यवस्थापक श्री जितेंद्र कुलकर्णी व नांदेड शाखा व्यवस्थापक सतिश रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती ..

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड ही भारतातील एक अग्रगण्य गुंतवणूक सेवा कंपनी आहे जिचे मुख्यालय कोची, केरळ येथे आहे. तीच्या संपूर्ण भारतात ४५० शाखा आहेत. जिओजीत च्या सर्विसेस मध्ये ट्रेडिंग/डिमॅट अकाउंट, म्युच्युअल फंड, एस आय पी, जीवन आणि सामान्य विमा, कमोडिटी, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणी स्मार्टफोलिओ समाविष्ट आहेत अशी माहीती शाखा व्यवस्थापक श्री सतिश रेड्डी यांनी यावेळी दिली…

वर्धापन दिन व नूतन कार्यालय उद्धाटन प्रसंगी नांदेड क्रेडाई चे अध्यक्ष श्री नितीन आगळे, जिओजित चे विभागीय व्यवस्थापक श्री जितेंद्र कुलकर्णी व नांदेड शाखा व्यवस्थापक सतिष रेड्डी व टीम आदी…

——————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *