सृष्टी निवळे या विद्यार्थ्यांनीचे लॉकडाऊन काळात चित्रकलेच्या क्षेत्रात पाऊल….!

नागेश सोनकांबळे यांच्या ललित कला अॅकडमीमूळे घडत आहेत बालचित्रकार…

नांदेड – बातमीदार

कोरोना महामारीच्या काळाती्ल लॉकडाऊन मूळे विद्यार्थ्यांना शाळेपासून दूर राहावे लागले व त्या प्रदिर्घ दोन वर्षाच्या काळखंडाचा अनेक विद्यार्थ्यांनी सदुपयोग करत विविध कलागुण आत्मसात केले त्यातीलच एक कु.सृष्टी अरुण निवळे पाटील या ग्यानमाता विद्यामंदीर शाळेत ईयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने छंद म्हणून सुरू केलेल्या चित्रकलेला आज वेगळी झळाळी प्राप्त झाली असून तिने काढलेल्या अनेक पेंटींगचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे..

आपल्या चित्रकलेबद्दल कु.सृष्टीने सांगितले की ,कोरोना लॉकडाऊनच्या काळात घरातच थांबावे लागले त्यामुळे विरंगुळा निर्माण होण्यासाठी सुरवातीला एक शिवाजी महाराजांची “स्केचिंग काढावयास घेतली व ती पेटींग अगदी अर्ध्या तासात पूर्ण केली आणि विशेष म्हणजे कोणत्याही प्रशिक्षण व मार्गदर्शनाशिवाय काढलेले शिवाजी महाराजांचे चित्र हे अतिशय सुबक झाले होते..

त्यामुळे उत्साह वाढला  व असेच  एक-दोन पेंटींग दिवसाकाठी काढत गेलो आणि त्यातून काढलेल्या चित्रांचा एक संच तयार झाला व तो संच ग्यानमाता शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना व्हिडीओ डॉक्युमेंटरींच्या स्वरूपात ऑनलाईन पाठविण्यात आला त्यातून आणखी प्रोत्साहन मिळून शाळेतील शिक्षक व  मैत्रींणींचे स्केच रेखाटले ते पण अगदी हुबेहुब तयार झाले,त्यातुनच शाळेच्या वतीने जवळपास १५० चित्रांची ही डॉक्युमेंटरी लॉकडाऊन मधील विद्यार्थ्यांचा विरंगुळा  म्हणून जुन महीन्यात बोर्डाकडे पाठविण्यात आली त्यामुळे मला चित्रकलेसाठी आणखी प्रोत्साहन मिळत जाऊन माझा आत्मविश्‍वास वाढत गेला..

माझी चित्रकलेतील प्रगती बघून माझे पालक डॉ.रजनी व डॉ.अरुण यांनी श्रीनगर येथील ललीत कला अॅकडमी येथे श्री नागेश सोनकांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकलेच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून दिला व आता मी सरांच्या मार्गदर्शनात चित्रकलेतील बारकावे आत्मसात करत वॉटर कलर पेन्टींग, ऍक्रेलिक पेंटींग, चारकोल पेन्टींग, पोर्टेट असे चित्रकलेचे विविध प्रकार शिकले आहेत व त्यावर सातत्याने सराव करत विशेष नैपुण्य मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे असे तिने शेवटी सांगितले ..

सृष्टीला सहज विरंगुळ म्हणून सुरूवात केलेल्या चित्रकलेत निर्माण झाली विशेष रुची …

मागील लॉकडाऊन काळात सुरू झालेला चित्रकलेचा प्रवासात जवळपास २०० पेक्षा अधिक चित्रांचा संच तयार झाला असून व ती एकटीच विद्यार्थी आहे की जिच्या संचाचा व्हिडीओ बोर्डाकडे पाठविण्यात आला त्यामूळे तिला अधिक प्रोत्साहन मिळत गेले तसेच प्रत्येक चित्रकाराचे एक स्वप्न असते ते म्हणजे आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरविणे व कु. सृष्टी ही आपल्या प्रोत्साहनाने, आशिर्वादाने लवकरच पूर्ण करेल असा विश्‍वास सृष्टीचे पालक डॉ. रजनी व डॉ.अरुण निवळे पाटील यांनी व्यक्त केला ..

————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *