शिवसेनेच्या वतीने आयोजित लसीकरण मोहीमेस उदंड प्रतिसाद..!

नांदेड – बातमीदार..

येथील मगनपुरा विभागात वृक्षमित्र फाऊंडेशन, नांदेड व शिवसेने तर्फे मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्ताने उपशहर प्रमुख मनोज ठाकूर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या कोव्हॅक्सीन व कोव्हीशिल्ड पहिला व दुसरा डोस ,१८ वर्षा वरील सर्वांसाठी मोफत लसीकरण शिबीरास उत्फूर्त प्रतिसाद मिळून १२९ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहीती आयोजक मनोज ठाकूर यांनी दिली..

शिबीरासाठी उद्घाटक म्हणून नांदेड उत्तर चे आमदार बालाजी कल्याणकर, तर प्रमुख पाहुणे जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे,उमेश मुंडे, महानगर प्रमुख अशोक उमरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या शिबीरासाठी  नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने लसीकरण करून शिबीर यशस्वी करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले

कोरोना लसीकरण आपल्या दारी या घोषणे नुसार अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत लसीकरण शिबीरांचे आयोजन करून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मगनपुरा येथील शिबीराचे आयोजक  मनोज ठाकुर (शिवसेना उप शहर प्रमुख) यांनी यावेळी केले.

________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *