यशस्वी बांधकाम व्यावसायिक ते ट्रॅक्टर डिलर – श्री.गणेश कल्याणकर…!

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन…!

नांदेडातील तारासिंग मार्केट या नावाजलेल्या मार्केट मध्ये के.के.ट्रेडींग नावाची एक फर्म आहे .. त्याचे संचालक श्री पुंजाजीराव कल्याणकर हे एक नावाजलेले व्यावसायिक म्हणून नांदेडात ओळखल्या जातात …त्यांनी आपल्या कारकिर्दीत संपूर्ण मराठवाडा-विदर्भतील साखर कारखान्यांना विविध प्रकारची साधन सामुग्री पुरवठ्याचे काम हयात भर केले आहे ..त्यासोबतच सॅनिटरी..हार्डवेअर साहीत्याचा व्यवसाय हा मूळ व्यवसायाला एक जोड उद्योग म्हणून त्यांनी केला आहे ..

याच आपल्या मूळ वडीलोपार्जित व्यवसायात श्री गणेश कल्याणकर हे वडीलांना मदत व्हावी म्हणून आपल्या वाणिज्य शाखेतील पदवीच्या शिक्षणानंतर त्यांनी २००० साली के.के.ट्रेडींग येथे काम करायला सुरूवात केली .. त्याच दरम्यान त्यांनी आपले मास्टर ऑफ बिझीनेस ॲडमिस्ट्रेशन चे शिक्षणही पूर्ण केले व के.के.ट्रेडींग येथील व्यवसायात ते २००० ते २००८ असे पूर्ण वेळ कार्यरत होते … जिथे त्यांनी व्यवसायातील बारकावे व आराखडे समजून घेतले असे म्हणायला हरकत नाही आणि त्यांनतर साधारणतः २००४ साली त्यांनी त्यांच्या साठी नवीन असलेल्या बांधकाम क्षेत्रात कामास सुरूवात केली ..

बांधकाम क्षेत्र हे जरी त्यांच्यासाठी नवीन असले तरीही आपल्या सतत शिकण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांनी या क्षेत्रात अल्पावधीतच आपला जम बसवायला सुरूवात केली ..व आपल्या कारकिर्दीतील पहीला प्रोजेक्ट म्हणून शांतीविहार .. पारस नगर .. नांदेड ही साईट पूर्णत्वास नेली ..दर्जेदार बांधकाम… अचूक लोकेशन व वाजवी दरामुळे विक्रमी वेळेत नोंदणी होऊन अवघ्या तेरा महीन्यात संपूर्ण १८ फ्लॅट असलेला प्रोजेक्ट यशस्वीरीत्या विक्री व पझेशन सह पूर्णत्वास गेला … आपल्या दर्जेदार बांधकाम गुणवत्तेच्या बळावर त्यांचे नाव हे नांदेडातील गृहशोधाच्या शोधात असलेल्यांसाठी उत्तम पर्याय म्हणून पुढे आले ..

 

पूढे आपल्या याच वाटचालीत त्यांनी शांतीसागर हा आणखी एक दर्जेदार प्रोजेक्ट पारसनगर भागातच पूर्ण केला त्यानंतर आपल्या कार्य कुशलतेच्या बळावर त्यांनी शांती सागर हा रो हाऊसेस् चा मोठा प्रोजेक्ट विक्रमी वेळेत बांधकाम…विक्री व पझेशन आदी सर्व आघांड्यावर उतीर्ण होत यशस्वीरीत्या पूर्ण केला ..

एकापाठोपाठ एक अशा दर्जेदार गृहप्रकल्पांमुळे श्री गणेश कल्याणकर हे नाव नांदेडातील बांधकाम क्षेत्रात आवर्जून आणि आदरपूर्वक घेतले जाऊ लागले ..त्याला कारणही तसेच आहे ..त्यांचा बांधकामाचा दर्जा व विक्रीनंतर ग्राहकांशी असलेलं त्यांच नातं हे आपल्या विनम्र व विनयशील सेवेमुळे अधिक दृढ होत गेलं..

श्री कल्याणकर यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल त्यांनी निर्माण केलेल्या गृह प्रकल्पात रहीवाशी असलेले नागरीक त्यांच्या बद्दल मोठ्या आनंदाने म्हणातात की काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात. काही माणसे गरिबीला गुलाम करतात माञ, जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणंस खऱ्‍या जीवनाचा सन्मान करतात.. त्यात गणेश कल्याणकर यांचे नाव आमच्या मते निश्‍चितच पहील्या रांगेत आहे ………….

आपल्या बांधकाम व्यवसायातील वाटचालीबरोबरच ते क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतही मोठ्या हिरहिरीने सहभागी होते व त्याबरोबरच २०१७ ते २०१९ या वर्षी क्रेडाई ची नांदेड जिल्हयाची धुरा त्यांच्या खांद्यावर होती .. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासन व बांधकाम व्यावसायिक यांच्या दरम्यानचा दुवा म्हणून उत्तम कार्य केले तसेच अनेक समाजपयोगी उपक्रम यशस्वीरीत्या त्यांनी राबविले आणि आजही ते क्रेडाईत पहील्या ईतकेच एक्टीव्ह आहेत …….ज्याप्रकारे अलिकडच्या दोन-तीन वर्षात बांधकाम क्षेत्रात अमूलाग्र बदल घडले त्या परिस्थितीत त्यांनी आपल्या व्यवसायाबरोबरच क्रेडाई च्या सर्वच सदस्यांना अपडेट करण्याच काम मोठ्या जागरुकतेने ते करतांना दिसतात ……आणि क्रेडाईच्या माध्यमातून सातत्याने नवनवीन काही तरी करण्याचा त्यांचा प्रयत्न अविरतपणे सुरू असतो  व तो राहील अशी ग्वाही ते मोठ्या आनंदाने देतात………….

बांधकाम क्षेत्राला अचानक आलेल्या मर्यांदामुळे त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्यासाठी अगदी नवखं असलेल्या ॲटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या आत्मविश्‍वासाने उडी घेतांना त्यांनी नांदेडातील सागंवी भागात भारतातील नावाजलेला ट्रॅक्टर ब्रॅड टॅफे मॅसी फग्रुसन ट्रॅक्टरची डिलरशिप सुरू केली .. नवीन क्षेत्रातील त्यांचा प्रवेश ही हा एक प्रकारचा योगायोगच आहे कारण सांगवी भागात अगदी मोक्याच्या ठिकाणी त्यांची वडीलोपार्जित जागा होती .. दरम्यान टॅफे मॅसी फग्रुसन ची टिम ही नांदेडात सक्षम डिलरच्या शोधात होती तो त्यांचा शोध श्री गणेश कल्याणकर यांच्या पाशी येऊन थांबला आणि त्यांनी श्री कल्याणकर यांच्यावर विश्‍वास दाखविला .. अगदी अल्पावधितच आपल्या विनयशिल..विनम्र.. आणि ग्राहकांच्या समाधान करण्याच्या पद्धतीने नांदेड जिल्हयात विक्रमी आकड्यात ट्रॅक्टरची विक्री त्यांनी केली आहे .. त्यासाठी त्यांचा टॅफे ट्रॅक्टर्ऱ्स च्या वतीने गौरवही करण्यात आला आहे ..

अधिक माहीतीसाठी व संपर्कासाठी पत्ता

एस.एस. ट्रॅक्टर्ऱ्स , विमानतळ रोड, सांगवी , नांदेड

९०४९९८७६७२

के.के.हाईटस् – नांदेडच्या वैभवात भर …

नांदेडातील सर्वात उंच ईमारत म्हणून गणल्या जाणाऱ्या के.के. हाईटस् या आणखी एका दर्जेदार असा आठ मजली प्रकल्प हा श्री गणेश कल्याणकर व त्यांच्या मित्रांनी एकत्र येत पूर्णत्वास नेला असून के.के. हाईटस् हा प्रकल्प नांदेडकरांसाठी एक अभिमान ठरावा असा आहे .. प्रत्येक नांदेडकरांने या प्रकल्पास एकदा आवर्जून भेट द्यावी अशी ही वास्तू असून अत्यंत आधुनिक बांधकाम साहीत्य आणि तंत्रज्ञान या प्रकल्पासाठी वापरले आहे ..-

आपला सुचिंतक… –

मारोती सवंडकर , दै. उद्याचा मराठवाडा, नांदेड ..

९८५०३०४२९७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *