श्री रुपेश सेठ वट्टमवार एक रॉयल व्यक्तिमत्व ..!

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन ……….!!

सोबतच ..रॉयल नांदेड ची शान – हॉटेल ‘मिडलॅंड’


वट्टमवारस् उदगीर टू नांदेड….!

मुळचे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवाशी असलेले भास्करराव वट्टमवार व्यवयासानिमित्त नांदेडला स्थायीक झाले. नांदेडला आल्यानंतर त्यांनी ज्योती चित्रमंदीर या चित्रपटगृहाची उभारणी केली. काही दिवसातच शहरातील नावाजलेलं चित्रपटगृह म्हणुन लौकीक मिळविला.
भास्करराव वट्टमवार यांना राजेश, रवि व रुपेश हे तीन मुलं. तिघांचा स्वतंत्र व्यवसाय आहे. राजेश वट्टमवार सध्या चित्रपटगृह सांभाळतात. तर रवि वट्टमवार बांधकाम व्यवसायीकांच्या क्रेडाई या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आहेत. तर रुपेश वट्टमवार यांनी बांधकाम व्यवसायासोबतच आता हाॅटेल व्यवसायात जम बसविला आहे.

हॉटेल मिडलँड चे संचालक रुपेश वट्टमवार उद्यमशिल व्यक्तिमत्व ..!

१९७४ मध्ये जन्म झालेल्या रुपेश वट्टमवार यांचे प्राथमिक शिक्षण प्रतिभा निकेतनमध्ये तर बारावीपर्यंतचे शिक्षण पिपल्स कॉलेजमध्ये झाले. यानंतर त्यांनी नाशिक येथील भोसला मिल्ट्री कॉलेजमधून बि.कॉम. पदवीचे शिक्षण पूर्ण केले. नांदेड येथील पिपल्स कॉलेजमधून ‘डीबीएम’ (व्यवयाय व्यवस्थापन पदविका) पूर्ण केले. तर विधी महाविद्यालयातून ‘डीटीएल’ (कर सल्लागार) ही पदविका पूर्ण केली. मुळात व्यवसायाचे बाळकडू वडीलांकडून मिळाल्याने रुपेश वट्टमवार यांनी बारावीत असताना सर्व शिक्षा अभियानात काम सुरु केले. यावेळी त्यांनी बॅनर, स्टीकर, टी शर्ट, ऑडीओ कॅसेट, ब्लक बोर्ड आदींचा पुरवठा करण्याचे काम केले.  या कामाच्या अनुभव त्यांना इतर व्यवसायात कामात आला. यानंतर पाणी पुरवठा योजनांचे विविध कामे केली. बांधकाम विभागातंर्गत रस्ते बांधणीचे काम केले. शिवा कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने बांधकाम व्यवयासाचे काम २००२ पर्यंत केले. यानंतर रुपये वट्टमवार यांनी २००६ पासून रेल्वेच्या कामाकडे वळण्याचा निर्णय घेतला. यात बिल्डींग वर्क, ब्रिजेस, शेड, फेब्रिकेशनच्या कामाचा समावेश आहे. या सर्व कामाच्या अनुभवाची शिदोरी सोबत असताना नांदेड सारख्या ठिकाणी हॉटेल व्यवसायाला असलेली संधी लक्षात घेवून या व्यवसायात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

नांदेड शहर दक्षीण भारतातील महत्वाचं शहर म्हणुन ओखळले जाते. महाराष्ट्रातील मराठवाड्यात दोन क्रमांकाचे शहर तसेच शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंघजी यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले शहर. शासनानेही या शहराला पवित्रनगर म्हणुन जाहीर केले आहे. यामुळे नांदेडला देश-विदेशातील भाविकांची गर्दी नेहमी असते. नेहमी वर्दळीचे असलेल्या या शहरात भाविकांना तसेच पर्यटकांना पंचतारांकी सुविधा मिळाव्यात या करीता, नांदेड शहरातील बांधकाम क्षेत्रात जम बसवलेले रुपेश भास्करराव वट्टमवार यांनी हॉटेल व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला.

हॉटेल मिडलँडच्या उभारणीतच दूरदृष्टी…!

त्यांनी गुरु गोविंदसिंघजी स्टेडीयम जवळ, रेल्वेस्थानक रोडवर बारा हजार स्केअर फुट जागेत अलिशान हॉटेल मिनलॅंडची उभारणी केली आहे. वास्तुुशास्त्राचा उत्तम रचना असलेले हॉटेल मिडलॅंड नांदेडच्या वैभवात भर घालणारे आहे. विदेशी फर्निचर असल्यामुळे या हॉटेलची शोभा अधिकच वाढते. मोहक तसेच सुबक रचना या सोबतच त्याला साजेल अशी रंगसंगतीची जुळवा – जुळव केली आहे. असे असलेतरी सामान्य नागरिकांना परवडेल अशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध अाहेत. या हॉटेलची रचना रुपेश वट्टमवार यांच्या संकल्पनेतुन बनल्यामुळे यात अधिकच झळाळी आल्याचे दिसुन येते.
यावेळी इतर हॉटेलपेक्षा वेगळे हॉटेल असावा, अशी मनाशी गाठ बांधून तयारी सुरु केल्याचे रुपेश आर्वजून सांगतात. रेल्वेस्थानका शेजारी तसेच श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडीयमच्या जवळ बारा हजार चौरस फुट आकाराच्या भुखंडावर त्यांनी हॉटेल उभारणीचा मनोदय २०१८ मध्ये निश्‍चित केला. यात पंचताराकिंत सुविधा असाव्यात. परंतु ते सामान्य नागरिकांना परवडेल असा दर ठेवण्याची भुमिका सुरुवातीपासून असल्याने त्या पध्दतीने नियोजन करण्यात आले. यासाठी त्यांनी डिझायनरचा शोध सुरु केला. मुंबई येथील शेहूल कपाशी या डिझायनरची त्यांनी निवड केली. यापूर्वी शेहूल कपाशी यांनी राज्यातील नामांकीत हॉटेलसह घराची उभारणी केली आहे. तसेच नांदेड शहरातील मिनी सहयाद्री या शासकीय निवास स्थानाची रचनाही त्यांनी केली आहे. अशा डिझायनरच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु केले अशा प्रकारे दुरदृष्टीतून नियोजन बद्ध रित्या हॉटेल मिडलँड उभे राहीले ..

आधुनिक धाटणीचे हॉटेल मिडलँड नांदेडचे आकर्षण ..!

तीन माळ्यात बांधकाम केलेल्या मिडलॅंड हॉटेलमध्ये जमिनीवर सहाशे नागरिक बसतील असा हॉल उभारला आहे.  या हॉलचे वैशिष्ट्ये म्हणजे यात खांबाचा अडथळा नाही. यामुळे कार्यक्रमाचा अडथळा बसलेल्या नागरिकांना येत नाही. दुसऱ्या माळ्यावर अकरा रुम आहेत. तर तिसऱ्या माळ्यावर दहा रुम आहेत. तर विशेष दोन रुम उपलब्ध आहेत. तिसऱ्या माळ्यावर एक हजार नागरिक बसतील असा सुशज्य हॉलचे बांधकाम केले आहे. हॉटेलमधील रुमची रचना इतर हॉटेलच्या तुलनेत हवेशीर व सुटसुटीत असल्यामुळे आतील नागरीकांना कोंडल्यासारखे होत नाही. हॉटेलमधील सर्वात महत्वाचे वैशिट्ये म्हणजे यातील फर्निचर विदेशातून मागविण्यात आले आहे. यामुळे येथे येणाऱ्या ग्राहकांना त्याचे वेगळेपण लगेच लक्षात येते. येथीन ग्राहकांना वापरण्यासाठी हर्बल वस्तू पुरविला जातात. हॉटेलचे बांधकाम नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन बांधकाम केले आहे. संस्पेशन वायरचा वापर केल्याने बांधकामात मोठ्या हॉलमध्ये खांब येत नाहीत. यामुळे हे नवीन तंत्रज्ञान भुकंप राेधक असल्याचे रुपेश वट्टमवार यांनी सांगीतले. हॉटेलचे बांधकाम केवळ सोळा महिन्यात पूर्ण केले. हॉटेलमध्ये जेवणाचीही उत्तम व्यवस्था रुपेश यांनी केली आहे. यामुळे या हॉटेलमध्ये येणारे ग्राहक पुन्हा याच ठिकाणी येण्याचा आग्रह धरतात. नांदेड सारख्या ऐतिहासीक शहरात देशविदेशातूून येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांना उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्यामुळे एकवेळ तरी या ठिकाणी भेट देण्याचे आवाहन उद्योजक रुपेश वट्टमवार आग्रहाने करतात.

अशा उद्यमशिल व रॉयल व्यक्तिमत्वास पुनश्‍चः एकदा वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आणि पुढील दमदार वाटचालीसाठी मनपूर्वक सदिच्छा…

—————-
आपला सुचिंतक,

मारोती सवंडकर , दै. उद्याचा मराठवाडा , नांदेड

९८५०३०४२९७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *