आयुर्वेद तज्ञ वैद्य अविनाश अमृतवाड यांच्याशी हितगुज ..!!

कर्करोग आणि आयुर्वेद – डॉ.अविनाश अमृतवाड..

‘कॅन्सर’ अर्थात कर्करोग ही व्याधी आता सर्वांच्या परिचयाची झाली आहे. कर्करोग हे संपूर्ण जगामध्ये मृत्यूचे क्रमांक दोनचे कारण समजले जाते. कॅन्सरवरील उपचारांमध्ये आधुनिक विज्ञानाने खूपच प्रगती केली आहे. तरीही जगामध्ये सर्वत्र या रोगाचे प्रमाण लक्षणीयदृष्ट्या वाढत आहे. भारताबद्दल जर विचार करावयाचा झाला तर आपल्याकडे दरवर्षी पाच लाख कॅन्सरग्रस्त रुग्णांची भर पडत आहे. या निमित्ताने आयुर्वेद व भारतीय शास्त्र यांचे कर्करोग उपचारा विषयीचे योगदान असा विचार आपण करूया.

आधुनिक संशोधनानंतरही प्राथमिक अवस्थेमध्ये कर्करोगाचे निदान करणे हे प्रत्येकवेळी शक्य होतेच असे नाही. रासायनिक औषधांनी काही दिवस लक्षणे दबली तरी त्यामुळे होणारे दुष्परिणाम हे डॉक्टर व रुग्ण या दोघांचीही कसोटी बघणारे आहेत. कॅन्सरच्या गाठीवरील शस्त्रक्रियेनंतर लगेचच काही दिवसांमध्ये त्याचठिकाणी किंवा दुसरीकडे नवीन गाठ तयार होण्याचे प्रमाण अधिक आहे.‘कॅन्सर’ हा शरीराचा ऱ्हास करणारा रोग असून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये बर्‍याच वेळा त्याची गंभीर लक्षणे दिसत नाहीत. जेव्हा त्याची चाहूल लागते, तेव्हा तो शरीरामध्ये सर्वत्र पसरलेला असतो, अंतिम अवस्थेमध्ये तर तो बहुतेक सर्व अवयवांना ग्रासून टाकतो. पचनसंस्था, यकृत, मूत्रपिंड, पित्ताशय, अस्थि, मज्जासंस्था इ. सर्व प्रणालींमध्ये कर्करोग पसरला असताना शरीराची चयापचय क्रिया पूर्णपणे बिघडून जाते. आधुनिक उपचारानंतर त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. चुकीचा आहार व आचार-विचारांमुळे वेगवेगळे कर्करोग वाढत आहेत. कारण त्यामुळे शरीरात जीवरासायनिक असंतुलन निर्माण होते. अशा जीवरासायनिक असंतुलनामुळे पेशी समूहांचा क्षोेभ होतो. या क्षोभामुळे पेशींची असाधारण, अनियंत्रित व अनुपयुक्त अशी वाढ होते. ज्याला आपण कर्करोग म्हणतो. त्यामुळे या रोगाकडे केवळ शरीराचाच नव्हे तर शरीर, मन, इंद्रिये, आत्मा या सर्वांनाच बिघडविणारा  रोग असे आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने पाहिले पाहिजे.  अर्थातच त्यावरील उपचारही एकांगी, तात्पुरते, घातक, मर्यादित हेतूंनी केलेले नसून आयुर्वेदशास्त्राप्रमाणेच सर्वंकष पातळीवर केले पाहिजेत.

कर्करोगावरील आधुनिक वैद्यकशास्त्राचे उपचार हे सामान्य माणसाच्या कुवतीबाहेर गेले आहेत. केमो, रेडिओथोरपी व शस्त्रक्रिया एवढ्या उपायांनी सारे काही संपले असे नाही. जिथे अ‍ॅलोपॅथीला मर्यादा पडतात तिथे आयुर्वेदाचे उपचार सुरू होतात. कॅन्सर रोगाची काळजी घेणे त्याचे दु:ख, भोग व वेदना कमी करणे, त्याकडे एक पेशंट म्हणून न पाहता सहृदयतेने एक संपूर्ण माणूस म्हणून पाहणे, त्याचा आहार-विहार याची काळजी घेणे, त्याची प्रतिकारशक्ती वाढविणे, मनाची उमेद वाढविणे, त्याचे जे आयुष्य नैसर्गिक आहे ते मिळवून देणे आणि केवळ निर्धारित आयुष्य न मिळवून देता ते सुखकर व अर्थपूर्ण करणे हे कार्य आयुर्वेद करू शकतो.

आयुर्वेदशास्त्र हे जगातील सर्वात प्राचीन वैद्यकशास्त्र…

आयुर्वेदशास्त्र हे जगातील सर्वात प्राचीन वैद्यकशास्त्र आहे, शास्त्रशुद्ध, गुण आणि मूलभूत उपचार करणारे, काळाच्या कसोटीवर उतरलेले वैद्यकशास्त्र आहे. आयुर्वेदातील काही दिव्य औषधांमध्ये कर्करोग बरे करणारा गुण आहे. कर्करोगाच्या योग्य अवस्थेमध्ये आयुर्वेद उपचारांचा योग्य वापर केला तर कर्करोग आटोक्यात ठेवण्यासाठी मदत होते. कर्करोगामध्ये पुढील अवस्थेत तीव्र वेदना हे एक प्रमुख लक्षण असते. या वेदना कमी करण्यासाठी पंचकर्म, क्षारकर्म, अग्निकर्म व काही बहुमोल वनौषधी उत्तम काम करतात. वाढलेला कर्करोग कमी होण्यासाठी, गाठीचा आकार कमी करण्याकरिता उपयोगी पडणारी अनेक औषधे आयुर्वेदामध्ये आहेत. काही वेळा कर्करोगाचा परिणाम म्हणून जलोदर निर्माण होतो. हा जलोदर आटोक्यात ठेवण्याचे काम आयुर्वेदातील वनस्पती, खनिजे व भस्मे करीत असतात. त्याशिवाय याकामी शुद्ध गोमूत्राचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात होतो.

कर्करोगामध्ये काही वेळा यकृताची अनिर्बंध वाढ होताना दिसते. ही वाढ कमी करण्यासाठी कोरफड, शरपुंखा, माका ही औषधे उपयुक्त ठरतात. कर्करोगामधील उचकी हे एक त्रासदायक लक्षण असते. त्या उचकीवर नारिकेल मषी या औषधाचा सुंदर उपयोग होतो. रासायनिक औषधे अर्थात केमोथेरपी व रेडिओथेरपी यामुळे रुग्णांच्या शरीराचा तीव्र दाह होत असतो. हा तीव्र दाह कमी करणे काही वेळा अवघड होऊन बसतो. अशावेळी आयुर्वेदातील प्रवाळ, मोती भस्म, उशीर, चंदन ही औषधे हा दाह कमी करतात. मोठ्या प्रमाणात होणारा रक्तस्त्राव थांबवण्याचे काम आयुर्वेदिक औषधे करतात.

याशिवाय विविध अवयवांचा विशिष्ठ कर्करोग प्रकारांसाठी विशिष्ट आयुर्वेदिक रसायन औषधे खूपच उत्तम कार्य करताना दिसतात. उदा. मुख-त्रिफला, आतडे-शिग्रू, अस्थि-भल्लातक, स्तन-चिंचा, गर्भाशय-अशोक, फुफूस-पिंपळी. पुन:पुन्हा कर्करोगाची उत्पत्ती होऊ नये व शरीरात त्याचा इतरत्र प्रसार होऊ नये म्हणून गुळवेल, आवळा, त्रिफला, लसूण या औषधांचा उपयोग प्रतिबंधक म्हणून होतो. कर्करोगी रुग्णांमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण स्थिर ठेवणे महत्त्वाचे असते. रोग्यांना अशक्तपणा, वजन कमी होणे, भूकेची संवेदना कमी होणे, मलावरोध ही लक्षणे सतावित असतात. याशिवाय रुग्णांची अतिरिक्त चिंता आणि डिपे्रशन दूर करून रुग्णांचे मनोधैर्य टिकविणे महत्त्वाचे असते. रुग्णांची ढासळलेली प्रतिकारकशक्ती पूर्वपदावर आणणे व रासायनिक उपचारांमुळे झालेला असमतोल दूर करणे हे काम आयुर्वेदातील अश्‍वगंधा, तुलसी, हरिद्रा, सुर्वाभस्म, ब्राम्ही ही औषधे करतात.

अशा तर्‍हेने योग्य अवस्थेत जर आयुर्वेद उपचार, योग व प्राणायाम उपचार केले तर शरीर व मनाचे संतुलन उत्तमरीतीने होते. कॅन्सरचा केवळ प्रकार लक्षात घेऊन चालत नाही, तर नाडीपरीक्षा, आहार, मनाचे गुणदोष यांचा विचार करून आयुर्वेदीय पद्धतीने निदान केले जाणे आवश्यक आहे. तज्ज्ञ वैद्यांकरवी नाडीपरीक्षा करणेही निदानाच्या दृष्टीने आवश्यक आहे. योग्य पद्धतीने, योग्य त्या अवस्थेमध्ये अचूक आयुर्वेदीय आहारसल्ला, गुणकारी औषधे, पंचकर्म उपचार, व्यायाम, योगासने, प्राणायम, योगनिद्रा या सर्वांचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अवलंब केल्यास कर्करोगाच्या वेदना, प्रसार, तीव्रता, पुन्हा-पुन्हा उद्भवणे यावर सकारात्मक फरक झाल्याचे नवीन संशोधनाअंती आढळून आले आहे.

डॉ.अविनाश अमृतवाड,

श्री विश्‍वेश्‍वर आयुर्वेद चिकित्सालय,लाहोटी अर्पाटमेंट,चिखलवाडी,नांदेड

संपर्क – ०२४६२-२४००१०,९११२९९२५०४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *