क्रिएटिव्ह म्हणजेच गुणवत्ता, ११ वी PCB ची दुसरी बॅच १५ जूनपासून …!

पहिल्या बॅचला देशभरातून उदंड प्रतिसाद …!

क्रिएटिव्ह चा विद्यार्थ्यांना मदतीचा हात … NEET व JEE ची तयारी आता अवघ्या ४०,००० रुपयात..

नांदेड-लातूर : प्रतिनिधी…

आपल्या दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण अशा शिक्षण पद्धतीमुळे आता राज्यातच नव्हे, तर देशपातळीवर आपले अढळ स्थान निर्माण केलेल्या  प्रा. रमाकांत जोशी यांच्या क्रिएटिव्ह फिजिक्स ने या वर्षीपासून एकाच छताखाली PCB विषयांच्या तयारीला सुरूवात केली आहे त्याला विद्यार्थी आणि पालकांतून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याने ११ वी PCB, NEET साठीच्या पहील्या बॅचची मर्यादा संपल्यामुळे व विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसादानंतर आता  ११ वी PCB ची दुसरी बॅच १५ जूनपासून सुरू होत असल्याची माहीती संचालक प्रा.रमाकांत जोशी यांनी दिली आहे ..

प्रा.रमाकांत जोशी यांच्या क्रिएटिव्ह कोचिंग क्लासेसने ११ वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मागील महीन्यातच सुरू केली होती त्यासोबतच विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून फक्त ४०,००० रुपयांत NEET किंवा JEE यांची तयारी करता येत असून फक्त ८००० रुपयांत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे त्यानुसार पहील्या ऑनलाईन बॅचला संपूर्ण देशभरातून उंदड प्रतिसाद मिळाल्याने तसेच एकीकडे कोरोनाचे संकट व विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता १० च्या निकालाबाबतचा संभ्रम असल्याकारणाने अनेक विद्यार्थी पहिल्या बॅचसाठी जॉईन होऊ शकले नाहीत. तरी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उदात्त हेतून प्रा. रमाकांत जोशी हे १५ जूनपासून दुसरी बॅच सुरू करत आहेत…

दरम्यानच्या काळात क्रिएटिव्ह च्या वतीने बेसिक कन्सेप्ट वर आधारीत असलेला व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी खास तयार करण्यात आलेला ब्रिज कोर्स हा हजारो विद्यार्थ्यांना www.creativecoachingclasses.com या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे.

रौप्य महोत्सवी वर्षात वाटचाल करणाऱ्या प्रा. रमाकांत जोशी यांच्या क्रिएटिव्ह ने आपल्या नाविन्यपूर्ण शैलीत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रमाची ही संधी तयार केली आहे..यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले आहेत .

“क्रिएटिव्ह म्हणजेच गुणवत्ता” हे समीकरण आता चांगलेच रुजले असून प्रा. रमाकांत जोशी यांच्या क्रिएटिव्ह क्लासेसने राज्यात  आपले अव्वल स्थान निर्माण केले आहे. विविध परीक्षेत क्रिएटिव्ह चे विद्यार्थी प्रतिवर्षी घवघवीत यश संपादन करत असल्यामुळे क्रिएटिव्ह हा ” यशस्वी शैक्षणिक पॅटर्न” म्हणून देशभरात ओळखला जात आहे.

“सदैव उत्तमाचा ध्यास” या निश्चयाने  काळाची गरज पाहता ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा स्वीकार करत क्रिएटिव्ह ने आपल्या नावाला आणि नावामागील यशाला विशिष्ट प्रदेशातच मर्यादित न ठेवता देशभरात आपली ओळख निर्माण केली आहे. दरम्यान  सद्यस्थितीत ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर असल्यामुळे पहिल्या बॅचला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर आता मंगळवार, दि. १५ जूनपासून दुसरी बॅच सुरू होत आहे.

…………….

११ वी च्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम अशा तज्ज्ञ टिमकडून PCB साठी एकत्रित पणे दिले जाणारे लेक्चर, सहज-सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम लक्षात येईल असे दर्जेदार विडिओ, डिजिटल स्मार्ट बोर्ड ,विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन, अत्यंत नियोजनबद्ध मार्गदर्शन, वेळेचे यथोचित नियोजन, अभ्यासाचे तंतोतंत  मूल्यमापन  आदींमुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधानकारक वातावरण असल्याच्या हजारो प्रतिक्रिया विद्यार्थ्यांतून व्हिडीओ आणि फोन कॉलच्या माध्यमातून उमटत आहेत.

तरी अधिक माहीतीसाठी व नोंदणीसाठी विद्यार्थी व पालकांनी क्रियटिव्ह च्या www.creativecoachingclasses.com या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन संचालक प्रा. रमाकांत जोशी यांनी केले आहे तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा असेही त्यांच्या वतीने कळविण्यात आले आहे ..

—————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *