शिक्षणाच्या प्रवाहात – अचूक मार्गदर्शन !

#दखल उद्यमशिलतेची …!
#मारोती सवंडकर- ९८५०३०४२९७…
#गणेश तिडके पाटील नावाचा अवलिया.. !
#ब्रॉडवे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरचा मार्गदाता…अनेक अडचणींना तोंड देत यशोशिखरावर विराजमान !
———————————-

मागील वर्षीपासून जगभरात सर्वत्रच कोरोना महामारीने थैमान घातले असल्याचे आपल्याला पाहावयास मिळत असून त्याही परिस्थितीत ऑनलाईन शिकवणी व ऑनलाईन कन्सलटन्सी च्या माध्यमातून अनेक शैक्षणिक संस्थानी ज्ञानदानाची आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली आहे यात शैक्षणिक सल्लागार संस्था असलेल्या ब्रॉडवे ने विद्यार्थी हिताचा एक नवा आयाम प्रस्थापित केला आहे…
मेडिकल, इंजिनीअरिंग, आयआयटी, एनआयटी या शाखांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थी आणि पालकांची प्रबळ महत्त्वकांक्षा असते. परंतु, चांगले गुण घेऊनही योग्य प्रवेश मिळत नाही. सोयीचे महाविद्यालय मिळत नाही. अशा वेळी शैक्षणिक सल्लागाराची भूमिका आजच्या स्पर्धेच्या काळात खूप मोलाची ठरते. त्याचा एक सल्ला विद्यार्थ्याचे अवघे करिअर घडवू शकते. अत्यंत महत्त्वाच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाणार्या पालक आणि विद्यार्थ्यांना या गोष्टींचे खूप महत्त्व असते. नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रात मागील जवळपास दहा वर्षांपासून ब्रॉडवे या संस्थेच्या माध्यमातून गणेश तिडके हे शैक्षणिक सल्लागाराचे कार्य करताहेत. त्यांनी आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा दिली आहे

#ब्रॉडवेचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व कार्य …!

नांदेडच्या श्रीनगर परिसरातील बी.के. हॉलच्या मधोमध एक पिवळा धमक बोर्ड दिसून येतो तिथे कोरोना कालावधीच्या आधी बोर्डाच्या खालच्या कार्यालयासमोर आपल्याला नेहमी विद्यार्थी आणि पालकांची गर्दी तिथून मार्गक्रमण करणाऱ्या प्रत्येकाला दिसून यायची… ती गर्दी असायची शैक्षणिक सल्ला घेणाऱ्यांची व प्रवेश फॉर्म भरणाऱ्यांची …..शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आणि नागपूर ,पुणे ,मुंबई, वाशीम, यवतमाळसह इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाची एकच मनीषा असते, ती म्हणजे आपला परीक्षा फार्म अचूक भरावा. ऑनलाइन असलेल्या प्रवेश परीक्षेची आणि प्रवेश प्रक्रियेची अचूक माहिती मिळावी. बहुतांश पालक व विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले असतात. ऑनलाइन प्रक्रियेला पहिल्यांदाच सामोरे जात असतात. त्यामुळे त्यांना या प्रक्रियेसंबंधी काहीही माहिती नसते….
गणेश तिडके आणि त्यांचे सहकारी पूर्णवेळ या आपल्या ब्रॉडवे एज्युकेशन कन्सलटन्सीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या शंकाचे निरसन करत असतात. दहावी-बारावीनंतर करिअर कोणत्या क्षेत्रात करावे, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांना केल्यास त्यांच्या तोंडातून मेडिकल, आयआयटी, एनआयटी, इंजिनीअरिंग या शाखांची नावे येतात. त्यासाठी नांदेड शहरात दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे कोचिंग क्लासेस आहेत. येथील क्लासेसचा दरवर्षी आपला उच्चांकी व चांगला निकाल पाहून संपूर्ण राज्यातून विद्यार्थ्यांचा लोंढा नांदेडकडे येत आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षण तर दर्जेदार मिळतेच , परंतु नीट, जेईई यासारख्या परीक्षा पास झाल्यानंतर पुढे काय?, पुढील प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे असेल ?, या महाविद्यालयात जागांचे आरक्षण कसे असेल ? सदरील महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क कसे असेल ?, असे अनेक प्रश्‍न पालकांमध्ये असतात. याचा विचार करून गणेश तिडके यांनी बि.के.हॉल परिसरात ब्रॉडवे एज्युकेशन कन्सलटन्सीच्या माध्यमातून शैक्षणिक सल्ला केंद्र सुरू केले आहे…
ब्रॉडवे च्या माध्यमातून दरवर्षी ऑक्टोबर , नोव्हेंबर महिन्यात पुढील प्रवेश परीक्षेबाबत सविस्तर माहिती देणारी माहिती पुस्तिका प्रकाशित केली जाते. तसेच सभागृहात मेगा सेमिनारचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या साह्याने प्रवेश प्रक्रिया समजावून सांगितली जाते. त्याचबरोबर ब्रॉडवेकडून संबंधित नीट, एमएचसीईटी अथवा इंजिनीअरिंग आदी प्रवेश परीक्षांचे फार्म भरून घेतले जातात. पुढे परीक्षा पार पडल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना निकालाचे आणि निकालानंतर होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचे वेध लागतात. त्या बाबतचीदेखील इत्यंभूत माहिती आणि सहकार्य ब्रॉडवेकडून केले जाते. प्रवेश परीक्षेसाठी लागणारी कागदपत्रे विद्यार्थ्याकडे नसल्यास विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतो, अथवा सदरील विद्यार्थ्यास अपेक्षित आरक्षण आणि फीस सवलत मिळत नाही…
त्याकरिता योग्य वेळी काऊन्सिलींग होणे गरजेचे आहे, हे महत्वाचे काम गणेश तिडके मागील दहा वर्षापासून करत आलेले आहेत. विद्यार्थी घडविण्यात जेवढा कोचिंग क्लासेसचा वाटा आहे. तेवढाच त्या विद्यार्थ्यांना योग्य आणि अचूक काऊंसिलिंग करून प्रवेश मिळवून देण्यात काउन्सलर, अर्थात गणेश तिडके यांचा वाटा आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही…आज घडीला गणेश तिडके यांच्या ब्रॉडवे एज्युकेशन कंसलटन्सीच्या नांदेडसह लातूर, पुणे येथे शाखा असून या शाखांची संख्या दरवर्षी वाढत आहे.
शैक्षणिक सल्लागार क्षेत्रात ब्रॉडवे नावाचा ब्रँड उभा राहीला त्यामागे गणेश तिडके यांचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी जो तरुण नेत्रदीपक प्रगती करतो, तो निश्‍चितच कुण्याही ध्येयासक्त तरुणास प्रेरणादायी ठरेल, यात काही शंका नाही.
—–
#ब्रॉडवेचा चकाकता ‘ब्रॅन्ड’:
—-
महाविद्यालयीन शिक्षणासाठी अनेक वेळा मार्गदर्शनाअभावी आवडीचे क्षेत्र मिळत नसल्याने विद्यार्थी निराशेत असतात. अशात कुटुंबातील शिकल्या सवरल्या पालकांचा दबाव वेगळाच असतो. आवडीच्या क्षेत्रातच करिअरची संधी मिळावी ही प्रत्येक विद्यार्थी, पालकांची मनीषा असते, ती साहाजिक व योग्यही असते. पण बऱ्याच वेळेस योग्य मार्गदर्शनाअभावी वेगळा निर्णय घेण्याचा प्रसंग ओढावतो. मार्गदर्शनाअभावी वाट चुकलेल्या विद्यार्थी -पालकांसाठी ब्रॉडवेने यशाचा मार्ग दाखविला आहे. आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवू पहाणाऱ्या मराठवाड्यासह राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ब्रॉडवेचा ब्रॅंड दिशादर्शक व मार्गदर्शक ठरत आहे…
—————————————
#अधिक माहितीसाठी संपर्क —

#गणेश तिडके पाटील,
ब्रॉडवे एज्युकेशनल कन्सल्टन्सी,
जुने बिके हॉल,श्रीनगर,नांदेड
हेल्पसेंटर- आयआयबी क्लासेस समोर,श्यामनागर,नांदेड,

#लातूर शाखा- मोटेगाववकर क्लासेसच्या बाजूला, उद्योग भवन,लातूर
#हेल्पलाईन – 9822393225, 7666992658…!

—//—

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *