आयआयबी ठरत आहे मेडीकल प्रवेशासाठी देशभरातील विद्यार्थ्यांसाठी नवे केंद्र ..!

संपूर्ण भारतभरातून आयआयबी च्या पीसीबी ऑनलाईन कोर्सला पसंती ..१० जून पासून दुसऱ्या बॅचला सुरूवात ..!

नांदेड-लातूर

येथील शिक्षण क्षेत्रातील नामाकिंत ब्रँड असलेल्या आयआयबी च्या नवीन स्वरूपातील ऑनलाईन कोर्सेससाठी आता राज्यासह संपूर्ण देशभरातून विद्यार्थ्यांचा ओघ वाढला आहे आजघडीला ,गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, हरीयाणा, पश्‍चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तेलगंणा, छतीसगढ सह दिल्लीच्या ही विद्यार्थ्यांची आयआयबीला पसंती मिळत असून संपूर्ण देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी आयआयबीच्या ऑनलाईन बॅच ला प्रवेश घेतला असल्याची माहीती आयआयबीचे व्यवस्थापकीय संचालक श्री दशरथ पाटील यांनी दिली ..

देशात महत्वपूर्ण शैक्षणिक केंद्र म्हणून महाराष्ट्रातील पुणे आणि राजस्थानातील कोटा या दोन शहरांत कडे फार पूर्वीपासून बघितले जाते पण मेडीकल प्रवेश परिक्षेसाठी दोन्ही शहरांचे नाव आता मागे पडून नव्यानेच शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवत अलीकडच्या काळात गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक केंद्र म्हणून नांदेड आणि लातूर कडे बघितले जात आहे..

मेडीकल प्रवेशासाठीच्या पूर्व परिक्षेसाठी गुणवत्तेच्या आधारावर नांदेड व लातूर शहराचा उल्लेख आवर्जून करावा लागेल व त्यासाठीच्या नीट परिक्षेत गुणवत्तेची कामगिरी बजावणाऱ्या आयआयबी या संस्थेला महाराष्ट्राचा  कोहिनूर म्हटले तर वावगे ठरू नये महाराष्ट्रातील नांदेड व लातूर सारख्या निमशहरी भागात शिक्षणासाठी क्रांती घडणे म्हणजे महाराष्ट्राच्याच्या दृष्टिकोनातून हा क्रांतीकारीच नव्हे तर ऐतिहासिक बदल आहे या बदलाचे शिल्पकार आयआयबी व त्यांची सर्व टीम हे ठरत आहेत..

अगदी लहान स्वरुपात स्थापित झालेल्या आयआयबीने २१ वर्षा अगोदर बायोलॉजी विषयासाठीच्या शिकवणीतून आपली मुहूर्तमेढ रोवली होती पुढे त्यांचे हे बायोलॉजी क्लासेस नांदेड पुरतेच मर्यादित न राहता लातूरला ही आपली शाखा सुरू करत आयआयबीने त्यांचे क्षितीज उंचावत नांदेड बरोबरच लातूरमध्ये गुणवत्तेचा वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे ..

आता आयआयबीने राज्यासह संपूर्ण देशात आपल्या गुणवत्तेच्या कक्षा उंचावल्या आहेत व एकापेक्षा एक सरस निकालावरून महाराष्ट्रासह राजस्थानातील कोटा शहरालाही मागे टाकले असून वैद्यकीय अभ्यास क्रमाच्या प्रवेशासाठी देशात २०१६ पासून नीट ही एकच परीक्षा घेतली जाते..

नीट च्या तयारीसाठी खाजगी शिकवणी लावण्यासाठी देशातील अनेक विद्यार्थी हे कोटा येथे प्रवेश घेत असतात .. नीट परीक्षा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती मात्र राज्यातील सीईटीचा मानदंड असलेल्या आयआयबीने कोटापेक्षाही सरस निकाल आपल्या नांदेड व लातुरात मराठवाड्यातून दिले तेही सर्वसाधारण गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना संस्कार करत गुणवत्तेचा एक नवा पायंडा या ठिकाणी निर्माण केला ..

आता आयआयबीने काळाची खरी गरज ओळखत बायोलॉजी या विषयातील उत्तुंग यशानंतर फिजिक्स व केमिस्ट्री या दोन्ही विषयांची शिकवणी एकाच छताखाली देण्याचा यावर्षीपासून श्रीगणेशा केला आहे. शिस्तबद्ध अभ्यासक्रम , कठोर परिश्रम व तंतोतंत नियोजन आणि भरपूर सराव परीक्षा तसेच वेळोवेळी विद्यार्थ्यांचे शंकानिरसन या बळावर मराठवाडा व विदर्भासारख्या मागास भागातील विद्यार्थ्यांवर गुणवत्तेचे संस्कार करत मेडिकल ला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राज्यातील ५० टक्के जागा ह्या एकट्या नांदेड-लातूर येथील विद्यार्थी काबीज करतात..

यावरूनच आयआयबीच्या गुणवत्तेची परंपरा लक्षात येते व या बळावर आजमितीला राज्यातील भंडारा गोंदिया चंद्रपूर व नागपूर या सोबतच मुंबई नाशिक पुणे जळगाव नंदुरबार अशा वीस-पंचवीस जिल्हयासह दिल्ली,भोपाळ,अहमदाबाद,इंदोर,राजस्थान,हरयाणा,उत्तरप्रदेश,आंध्रप्रदेश तसेच तेलगंणा,कर्नाटका अशा जवळपास देशभरातील अनेक राज्यांतून हजारो विद्यार्थी हे ऑनलाईन अकरावी व बारावी चा अभ्यासक्रमासाठी आयआयबीला पहिली पसंती देत आहेत ..

‘आयआयबी’ ने आपल्या गुणवत्तापूर्ण वाटचालीने राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे…!

आजपर्यंत आयआयबी चे १० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी हे एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र ठरले असून. आयआयबी नेहमीच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात एक आदर्श घडवित आलेली एक शैक्षणिक संस्था आहे. त्याची नोंदही अनेक मान्यवरांनी घेऊन आयआयबीचा यथोचित सन्मानही केलेला आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये आलेल्या जागतिक कोरोनाच्या महामारीच्या काळातही आपला दर्जा सिद्ध करतांना विद्यार्थ्यांची ऑनलाईन तयारी करून घेतली व याच २०२० मध्ये पार पडलेल्या नीट परीक्षेत  तब्बल ६  विद्यार्थ्यांनी ३६० पैकी ३५५ गुण मिळवून आयआयबी च्या गुणवत्तेचा ठसा देशभर उमटवला आहे, त्यासोबतच १२५३ विद्यार्थ्यांना एमबीबीएस साठी प्रवेश मिळाला आहे.

मागील दोन दशकांपासून बायोलॉजी त नेहमीच अग्रेसर असणारी आयआयबी आता बायोलॉजीसोबतच फिजीक्स व केमिस्ट्री शिकविण्यासाठी सज्ज झालेली आहे ती पण नव्या स्वरुपात…. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्‍चित करण्याकरीता आयआयबी च्या  www.iibedu.com या संकेतस्थळावर  भेट देऊन नोंदणी करावा असे आवाहन आयआयबीच्या वतीने करण्यात आले आहे….

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *