कठिण प्रसंगी निर्भय कसे राहावे..!

 

वर्तमान समय आपल्या सर्वांसाठी अडचणी आणि तणावपूर्ण असा झाला आहे.  भयंकर भीती  आणि चिंताग्रस्त  वातावरण या मुळे आपल्यावर दडपण वाढले आहे. जगभरातील लोकांचे जीवन  ठप्प झाले आहे.  प्रत्येक माणसाला चिंता सतावतेय कि पुढे काय होणार? आपले तसंच आपल्या आप्त जनांच्या स्वास्थ्याच्या काळजीने भयभीत झाले आहेत. प्रश्न असा आहे कि अश्या भयग्रस्त प्रसंगी स्वतः निर्भय कसे राहायचे?  चला तर आपण जाणून घेऊया :-

आपण भयभीत का होतो ?

अज्ञात अशा शंकेने आपल्याला भीती तसेच संदेह निर्माण होतो. आपल्याला चिंता वाटते कि पुढे काय होईल. मनात अशी शंका येते, भीती वाटते कि आपल्या कडून कोणतीही चूक घडू नये तसेच कोणताही चुकीचा निर्णय घेतला जाऊ नये.  अशी हि शंका येते कि आपल्या प्रयत्नाना अनुकूल  यश आले नाही तर त्याचा परिणाम काय होईल. या जगताला चालविणारी प्रभूसत्ते वरच जर आपला भरवसा राहिला नाही तर दुर्घटनांची भीती हि राहणारच.  आपण निर्बल आहोत म्हणून भीती वाटते. शाळेतील विद्यार्थी मैदानावर त्रास देणाऱ्यांना घाबरतात. शाळेतून रोज घरी परत येणारे छोटि छोटि मुले मोठ्या मुलांचा मार खाण्याला भितात. कामकाजाच्या ठिकाणी कामगार मालकाला घाबरतात. कारण त्यांची मोल मजुरी, पगार पाणी  व नोकरी हे मालकाच्या हातात असतात. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अन्यायाला  विरोध करण्याला आपण दुर्बल व अशक्त आहोत अशी शंका येते कारण ज्यांच्या कडे सत्ता व बळ आहे ते नंतर बदला घेतील.

वास्तवते पेक्षा असा विचारच आपल्याला भयभीत करतो कि पुढे काय होईल. ज्यांना मृत्यूची भीती वाटते वास्तविक पाहता ते अन्य अज्ञात अशा गोष्टींना घाबरतात. अशा प्रकारचं भय कोणत्या न कोणत्या प्रकारे आपल्याला खात असते.

लोक अशा अज्ञात भीतीला घाबरतात कारण ती पीडादायक व दुःखदायी असू शकते. लोकांना त्यांचे भविष्य माहित नसते कि त्यांच्या वाट्याला काय येणार आहे म्हणूनच त्यांचे जिवन भय आणि चिंताग्रस्त असते.

जीवनात निर्भयता कशी येईल?

आपला आत्मा पूर्णतः चैतन्ययुक्त असा आहे. परमपिता परमेश्वराचा तो अंश असल्या कारणाने निर्भय आहे.  प्रभू चैतन्याचा महासागर आहे आणि आपला आत्मा त्याच्या अंश असल्या कारणाने तो परमात्म्याचा लघु रूप आहे. प्रभू स्वतःनिर्भय आहे म्हणूनच आत्मा देखील निर्भय आहे. जेंव्हा आपण आत्म्याच्या संपर्कात नसतो तेंव्हा आपण भयग्रस्त होतो. आत्मा शाश्वत आणि चैतन्यशील आहे. शाश्वत अशा आत्म्याशी एकरूप होणे याचा अर्थ कसलेही भय नसणे. आत्म्याला भीती अशी नाहीच. ज्ञान आणि विवेक बुद्धी हे आत्म्याचे प्रमुख गुण  आहेत. म्हणून आत्मा दिव्य ज्ञानप्राप्तीस तो समर्थ आहे. त्याच्या पासून काहिच लपविता येत नाहि मग त्याला भीती कसली? स्वतःच्या आत्म्याशी सम्पर्क करणाऱ्या लोकांमध्ये संत, सुफी व पैगंबर असे महापुरुष नेहिमी जागृत सचेत व अवस्थेत याचा अनुभव घेत असतात.

संवेदना रहित होणे

चिकित्सा क्षेत्रात संवेदना रहित करणे याचा अर्थ असा कि एखाद्या व्यक्तिस अल्प प्रमाणात  एखादा औषधी पदारथ अल्प प्रमाणात द्यायचा, ज्याला त्या पदार्थाचे वावडे (एलर्जी) आहे. अल्प प्रमाणात असा पदार्थ दिल्याने अशा व्यक्तीची प्रतिकार शक्ती विकसित होते. असे केल्याने त्याचे शरिर अधिक प्रमाणात प्रतिकार करण्यास समर्थ होते. अशा प्रकारे आपण छोटया छोटया समस्यांना सामोरे जाऊन निर्भय सराव जर आपण केला तर जीवनात येणाऱ्या मोठ्या समस्यांशी आपण समर्थपणे सामना करू शकू. निर्भय होण्याचा असा सराव तेंव्हाच करू शकतो जेंव्हा आपण आपल्या शक्तिशाली आत्म्याशी जोडले जातो.

आपण आत्म्याचे सामर्थ्य आणि त्याची निर्भयता आपण कशी ओळखू शकतो ?

प्रचंड आत्मशक्ती मुळेच आपण सर्व आव्हानाशी सामना करू शकतो हे आपण जाणले पाहिजे. जर आपण आत्मशक्तीस जोडलो गेलो तर आपण कोणत्याहि भयावह परिस्थितीवर आपण विजय प्राप्त करू शकतो आणि चिरकाल टिकणारी शांती व सुरक्षा कवचात राहू शकतो. आपली आत्मशक्ती पितापरमेश्वराशी एकरूप झाल्यास ती कायम आपल्या बरोबर राहते व जीवनातील समस्यांशी सामना करण्यास मदतनीस होते. आवश्यकता आहे कि आपण शांतपणे धनाभ्यासाला बसून या आत्मशक्तीला अनुभव करावा.    ध्यान-अभ्यास एक अशी प्रक्रिया आहे ज्या मुळे आपले बाह्य जगात भरकटलेले लक्ष अंतर्मुख एकाग्र केले जाते.  असे केल्याने भरकटणारे लक्ष परमात्म्याचा अंश,  अनंतप्रेम, व  सुखाचे आगर  असलेल्या आत्म्याशी  जोडले जाते.

वर्तमान काळात आपण काय करू शकतो?

आपल्या जीवनातील संकटांना आपण संपवू शकत नाही, बाहेरील दुनियेतील घडणाऱ्या घटनांवर आपले नियंत्रण नाही,  आपली नौकरी, आपले घर, धन दौलत आणि आपले आप्तजन  यांचाही कधिच वियोग होणार नाही हे आपण खात्री पूर्वक सांगू शकत नाही.  आपण एवढंच करू शकतो कि आपण निर्भय होऊन अशा समस्यांशी सामना करावा  जेणे करून दुःख आणि चिंता आपल्याला पंगू बनवू शकणार नाही. आपण स्वतः अशा  प्रकारच्या  बातम्या  वाचणे, पाहणे, ऐकणे सोशल मीडिया पासून दूर राहाणे आणि आपला वेळ ध्यान-अभ्यास करणे आणि आपल्या आत्मशक्तीचा अनुभवण्यासाठी घालवावा. एकदा जरी आपणाला आपल्यातील दिव्यतेची अनुभूती झाली आणि या आत्मशक्तीला ओळखले तर  आपले जीवन प्रेम, ख़ुशी, निर्भयता तसेच आस्थेने खुलून उठेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *