March 9, 2021
प्लास्टर करावे की शस्त्रक्रिया?

प्लास्टर करावे की शस्त्रक्रिया?

नांदेड – प्रतिनिधी

हाडांच्या उपचारांत आधुनिक बदल …  

वाहनांच्या संख्येत रोज वाढ होते आहे आणि रस्ते मात्र तेवढेच आहेत. वाहने वेगात धावताहेत. नियमांचा दुरुपयोग करणारे अनेक आहेत. आज अपघातांचे स्वरूपही बदलले आहे. त्यामुळे होणाऱ्या दुखापतींच्या प्रकारामध्येही फार बदल झाले आहेत.

वाहनांच्या संख्येत रोज वाढ होते आहे आणि रस्ते मात्र तेवढेच आहेत. वाहने वेगात धावताहेत. नियमांचा दुरुपयोग करणारे अनेक आहेत. आज अपघातांचे स्वरूपही बदलले आहे. त्यामुळे होणाऱ्या दुखापतींच्या प्रकारामध्येही फार बदल झाले आहेत. पॉलिट्रॉमाच्या केसेस तर दिवसेंदिवस वाढत आहेत. पॉलिट्रॉमा म्हणजे एकाच व्यक्तीला झालेल्या विविध दुखापती आणि फॅक्चर्स. पॉलिट्रॉमा केसेसना अपघाताच्या ठिकाणीच तत्काळ उपचारांची गरज असते. अशा रुग्णांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात हलवावे लागते. घटनास्थळीच होणाऱ्या बऱ्याच मृत्यूंचे कारण बहुधा डोक्याला होणाऱ्या दुखापती असतात.

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे दुखापत झालेल्या व्यक्तीला कामावर लवकरात लवकर रुजू होण्याची इच्छा असते. फिजिओथेरपिस्टकडे महिनो न्‌ महिने चकरा मारण्याची इच्छा नसते. नवनवीन उपचार पद्धती अशावेळी मदतच करते. यामुळे शारीरिक हालचाली आणि सांध्यांच्या दुःखविरहित हालचाली लवकरात लवकर शक्य होत आहेत. पूर्वीच्या काळी बहुतेक सर्व फ्रॅक्चर्सना प्लास्टर हा एकच उपाय होता. नंतर अॅण्टिबायोटिक्सच्या शोध लागला. आता शस्त्रक्रियेचे तंत्रसुद्धा दिवसेंदिवस प्रगत होत आहे. १९८० सालच्या आसपास स्वित्झर्लंडच्या ए. ओ. नावाच्या गटाने फ्रॅक्चरमुळे होणारे अपाय टाळण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा धातू तयार केला. यापासून नेल्स, प्लेटस् व स्क्रू बनवता येतात. या पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे हाडांचे संधीकरण होते. हाडांनी शरीराचे वजन लवकर सहन करण्याची क्षमता वाढविली जाते. त्यामुळे फ्रॅक्चर लवकर जुळण्यास मदत होते.

या शोधानंतर डॉ. इलिझारोव्ह नावाच्या रशियन अस्थिशल्य विशारदाने एक नवीन तंत्रज्ञान शोधून काढले. याचे नाव ‘इलिझारोव्ह तंत्रज्ञान’ असे पडले. हा एक रिंग-फ्रॅक्चरचा प्रकार असून याद्वारे पिना हाडातून जाऊन हाडाभोवतालच्या रिंगला जोडल्या जातात. या पद्धतीचे तंत्रज्ञान व साधन अशा रितीने रचले आहे की त्यामुळे हाडांचे संधीकरण अगदी मजबूत होते. शस्त्रक्रियेच्या अगदी दुसऱ्याच दिवसापासून किंवा शस्त्रक्रियेच्या वेदना कमी झाल्याबरोबर रुग्णामध्ये शरीराचे किंवा अवयवाचे वजन सहन करण्याची क्षमता येते. हे तंत्रज्ञान जगभर लोकप्रिय झाले. फ्रॅक्चर व पोलिओमुळे हाडांमध्ये निर्माण होणाऱ्या विकृती, मांडी व पायांतील जन्मजात विकृती सुधारण्यासाठी व आखूड हाडांचा दोष घालविण्यासाठी या तंत्राचा उपयोग होतो. अपघातस्थळीच हाडे नष्ट झाली असल्यास अशा कठीण कम्पाउंड फ्रॅक्चर्सचा उपचार या तंत्रामुळे यशस्वीरित्या करता येतो.

आता तुम्ही विचाराल की प्लास्टरचे कार्य व उपयोग आताच्या काळात होतो की नाही? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. फ्रॅक्चरच्या उपचारात प्लास्टर अजूनही महत्त्वाचे आहे. जवळजवळ ५० टक्के फ्रॅक्चरना प्लास्टरचाच उपचार केला जातो. मुलांच्या बाबतीत प्लास्टरचा उपाय फार उपयुक्त आहे. कारण त्यांच्या हाडांची वाढ होत असते. हाडांचा आखूडपणा किंवा वाक आपोआपच दुरुस्त होऊ शकतो. मोठ्या माणसांच्या बाबतीत मात्र ते हाड आपोआपच पूर्ववत होऊ शकत नाही. म्हणून अस्थिशल्यविशारदांना वाटले की हाडाचा वाक किंवा आखूडपणा तसाच राहिला तर ते शस्त्रक्रियेचा उपाय सुचवतात.

प्रत्येक शल्यविशारदाच्या मतांमध्ये फरक पडतो. एक जण शस्त्रक्रिया सुचवतो, तर दुसरा प्लास्टर सुचवतो. यावरून मनाचा गोंधळ उडतो. इथे मला असे सांगावेसे वाटते की एखाद्या विशिष्ट शल्यविशारदाच्या अनुभवाप्रमाणे शस्त्रक्रियेचे परिणाम जास्त चांगले असतात तर दुसऱ्या शल्यविशारदाच्या अनुभवाप्रमाणे प्लास्टरने जास्त चांगले परिणाम साधले जातात. म्हणून मतांमध्ये फरक पडतो. आपण चांगल्या अस्थिशल्य विशारदाची निवड करावी आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला ज्या पद्धतीने फ्रॅक्चरचा यशस्वी रीतीने उपचार करता येईल तो करू द्यावा. हाडांची संधी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. एक अस्थिशल्यविशारद विविध पद्धतींनी हाडांचे तुकडे जोडून हाड दुरुस्त करण्यात निसर्गाला मदत करत असतो. फ्रॅक्चर दुरुस्त होण्याची प्रक्रिया शरीरातील कॅल्शियमच्या अभावामुळे संथ होते. वृद्ध व्यक्तींमध्ये फार हळू होते. मुलांमध्ये ही प्रक्रिया फार लवकर होते. हाडांचे तुकडे इतस्ततः विखुरले असतील तर ‘मॉर्बिडिटी'(फ्रॅक्चर दुष्परिणाम) कमी करण्यासाठी तसेच हाडांचा आखूडपणा व वाक टाळण्यासाठी शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय उरतो. नाही तर कायमचे व्यंग किंवा अपंगपणा निर्माण होऊ शकतो.- –

डॉ. स्‍्वप्निल चक्रावार ,
एम.बी.बी.एस, एम.एस.आर्थो,
ऑर्थोस्कोपी व जाँईन्ट रिप्लेसमेंट सर्जन,
चिंतामणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स्, सेंट्रल बँकेच्या वर, आयुर्वेदीक कॉलेज समोर, नांदेड
संपर्क – ७७७५८५४४४६

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot