March 9, 2021

कॉमर्स मधील वाढत्या रोजगाराच्या संधी …!

वेगाने विकसित होणाऱ्या आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी निष्णात आर्थिक तज्ञांची नितांत आवश्‍यकता ..

गुंतवणूक सल्लागार असतील पुढच्या आर्थिक विश्‍वाचे सारथी

नांदेडातील प्रत्येक विद्यार्थी घडावा .. येत्या काळातील वाणिज्य क्षेत्रातील प्रत्येक संधीचा लाभ आपल्या शहरातील युवकांनी घ्यावा असा ध्यास उराशी बाळगत या क्षेत्रात ज्ञानार्जनाचे कार्य करणारे प्रा. कृष्णा निलावार हे ध्येयवेडे शिक्षक असून … ते स्वतः कॉमर्स पदवीधर आहेत त्यासोबतच विविध प्रकारच्या डझनभर डिग्र्या त्यांच्या नावासमोर आहेत .. त्यासोबतच त्यांनी विविध व्यावसायिक कोर्सेस ही केले आहेत .. तसेच त्यांना विद्यार्थ्यांना शिकवणीचा ८ वर्षाचा दांडगा अनुभव असून त्यांच्या मगनपुरा-नवा मोंढा भागातील उन्नती कॉमर्स क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी मागील सलग पाच वर्षापासून स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठाचे गोल्ड मेडेलिस्ट आहेत यावरूनच त्यांचा चढता आलेख लक्षात येतो .. उच्च दर्जाच्या शिक्षणा सोबतच अंत्यत माफक फिस हे त्यांच्या शिकवणी वर्गाचे वैशिष्ट्ये आहे … बालपणापासूनच अंत्यत हुशार विद्यार्थी म्हणून प्रा. कृष्णा निलावार हे त्यांच्या शालेय पातळीवर सुपरचित होते .. त्यात पुढे जातांना त्यांनी ज्ञानासोबतच ..शालिनतेवर प्रुभुत्व मिळविले आहे ..आज त्यांच्या विद्यार्थ्यांत ते कृष्णा सर म्हणजेच यशाची गुरूकिल्ली म्हणून विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत ..

त्यांच्या मते आज च्या घडीला कॉमर्स या क्षेत्रात खालील संधी उपलब्ध आहेत ..त्यातील काही ठळक संधीबद्दल थोडक्यात माहीती अशी की .

सर्टिफाईड फायनन्शिअल प्लेनर

आपल्या देशातील अर्थव्यवस्था, गुंतवणूक व्यवस्था आणि आर्थिक व्यवहार वाढत आहेत. सामान्य लोकांकडे अधिक पैसा येत आहे आणि त्यांची गुंतवणुकीबद्दलची आस्था आणि सजगता वाढत आहे. अशा वेळेस गुंतवणूक सल्लागाराची गरज वाढत आहे, कॉमर्स हे आजच नव्हे तर येत्या काळातही स्वयंरोजगारासाठी एक उत्तम साधन असणार आहे यात शंका नाही .
तरी आधुनिक भारताचा भक्कम पाया या अर्थ तज्ञांकडून जाणार असला तरी आपण कॉमर्स या क्षेत्राचा व्याप , व्याप्ती व त्यातील ढोबळमानाच्या संधी यावर एक प्रकाश टाकूयात

वाणिज्य शाखेतील करिअर

अकरावी साठी ऑनलाईन भरणे चालू आहे, कुठले करिअर निवडावे याच्या विचारात सर्व विद्यार्थीवर्ग बुडून गेला आहे.दरवर्षी खूप विद्यार्थी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतात. अलिकडच्या प्रवाहानुसार याहीवर्षी वाणिज्य शाखेलाच विद्यार्थ्यांची पहिली पसंती असल्याचे पहावयास मिळते आहे. त्यामुळे योग्य माहिती असल्यास वाणिज्य शाखेत अपरिमित उपलब्ध आहेत.

योग्य कॉलेज ची निवड
अकरावी मध्ये योग्य कॉलेज निवडणे आवश्यक आहे. कॉलेज चांगले असेल शिक्षणाचा दर्जा आणि वातावरण यांचा फरक पडतो.

गणित किंवा एसपी ० सेक्रेटरीअल प्रेक्टीस…
तुम्हाला अकरावी मध्ये गणित आणि सेक्रेटरीअल प्रेक्टीस यामधून एक विषय निवडावा लागतो. तुमचे दहावीला गणित चांगले असेल, अथवा पुढे संख्याशास्त्र, फायनान्स, प्रोडक्शन व्यवस्थापन, विमा, बँकिंग यामध्ये करिअर करायचे असल्यास गणित हा विहस्य उत्तम आहे. काही कोर्सेस साठी जसे इंदिरा गांधी विकास संस्था, अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवीसाठी बारावी दर्जाला गणित असणे आवश्यक असते. मात्र कंपनी सेक्रेटरी किंवा बिझनेस कायद्यात करिअर करायचे असल्यास एसपी निवडणे चांगले.सीए करायचे असल्यास गणित घ्यावे.

कॉमर्स मधील पदवीचे प्रकार

बीकॉम

बारावी नंतर बहुतांश विद्यार्थी कॉमर्स मधील पदवीस मध्ये प्रवेश घेतात. बीकॉम च्या शेवटच्या शेवटच्या वर्षाला अकाऊन्टस किंवा व्यवसाय व्यवस्थापन यापैकी एक ग्रुप निवडावा लागतो. एका ग्रुपचे तीन पेपर्स असतात.

बीएमएस

व्यवसाय व्यवस्थापन या क्षेत्रात जाण्याचे तुमचे नक्की झाल्यास तीन वर्षे केवळ व्य्वास्थापनाच्या अभ्यासास देणे उत्तम आहे. त्यासाठी बेचलर ऑफ मेनेज्मेंट स्टडीज अर्थात बीएमएस हा अभ्यासक्रम उपलब्ध असतो . हाच कोर्स मुंबई विद्यापीठाबाहेर बीबीए म्हणून ओळखला जातो. यात फरक नाही. तेंव्हा गोंधळू नका.

बीबीआय

येत्या काळात बँकिंग क्षेत्राला सोन्याचे दिवस येणार आहेत. त्यामुळे या विषयातील प्राविण्याची पदवी म्हणजे बीबीआय. हा कोर्स केल्यावर इंडिअन इंस्तित्युत ऑफ बँकिंग एंड फायनान्स या संस्थेची जेएआयआयबी आणि नंतर सीएआयआयबी परीक्षा द्यावी. पदवीनंतर बँकिंग अंड इंस्युरंस किंवा फानंस या विषयातील एमबीए करता येते. तसेच पदवी नंतर सर्टीफाईड फायनान्शिअल अनालिस्ट (सीएफए- अमेरिका) किंवा सर्टीफाईड रिस्क मेनेज्मेंट (सीआरएम) हे कोर्स करता येतात. हे कोर्स काय आहेत हे तुम्हाला पदवीला असतानाच कळू शकेल.

कॉमर्स मधील व्यावसायिक कोर्सेस

तुम्ही बारावी झाल्यावर व्यावसायिक कोर्सेस न प्रवेश घेऊ शकता. तुमच्या बीकॉम पेक्षा खूप मोठे आणि प्रतिष्ठीत करिअर तुम्हाला हे व्यावसायिक कोर्सेस देतील.

या पैकी काय करावे हे तुम्ही नंतर ठरवालच. तिन्ही कोर्सेस ची ढोबळ कल्पना घेऊ.

चार्टर्ड अकाऊण्टन्ट (सीए)

व्यापारी, कंपन्या आणि उद्योग यांचे आर्थिक लेखे, करविषयक गोष्टी आणि आर्थिक व्यवस्थापन पाहणारे व्यावसायिक म्हणजे सीए. उद्योगाव्यतिरिक्त सामान्य माणसाच्या आय्करबब्तितिअहि सीए काम करतात. त्यामुळे नोकरी आणि स्वयंरोजगार यामध्ये सीए ला मरण नाही. सीए बरोबर (पदवी नंतर) फायनान्स मध्ये एमबीए केल्यास सोने पे सुहागा! सीए ला लागणारा कालावधी आणि ट्रेनिंग पाहता सीए पूर्ण करतानाच एमबीए होऊ शकते.

कंपनी सेक्रेटरी

कंपनी कायदा आणि इतर व्यवसाय विषयक कायद्यांविषयी सल्लागार व्यावसायिक म्हणजे सीएस. जिथे सीए अकौंटस विषयी कामे पाहतो, कंपनी आणि इतर व्यापारी कायद्यांच्या किचकट तरतुदींचा सीएस बादशहा असतो. अगदी सामान्य कायद्यान्बरोबरच, सेबी, बौद्धिक संपदा, कर कायदे, परकीय चलन कायदे अशा विशिष्ट कायद्यांमध्ये प्रविण्यसुद्धा सीएस मिळवू शकतो. पुढे इतरही अनेक शाखा खुल्या होतात. सीएस बरोबरीनेच पदवी झाल्यावर एलएलबी करावे. पदवी नंतर एलएलबी केल्यास तीन वर्षात एलएलबी पूर्ण होते.

कॉस्ट अकाऊण्टन्ट (सीडब्ल्यूए)

खर्च आणि उत्पादन या क्षेत्रातील व्यावसायिक म्हणजे कॉस्ट अकाऊण्टन्ट. सध्याच्या कंपनी कायद्यातील तरतुदींमुळे या क्षेत्राचे महत्व वाढत आहे.

या तीन मध्ये फरक असा कि जर तुम्हाला गणित आणि बारावीत अकौन्त्स आवडले असेल तर सीए करावे. कायद्याची आवड असल्यास सीएस करावे. सीएसआणि सी डब्ल्यू ए मध्ये तीन वर्षे पूर्ण केल्यावर ट्रेनिंग करावे लागते तर सीए मध्ये दोन वर्षे झाल्यावर ट्रेनिंग करावे लागते नानातरच तिसरे वर्ष देता येते.

पदवी नंतरचे व्यावसायिक कोर्सेस
सीएफए

आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्तम कोर्स म्हणजे सीएफए. हा कोर्स भारतात आयसीएफएआय ही हैद्राबाद ची संस्था घेते तर अमेरिकेतील सीएफए हा कोर्स सुद्धा आहे. मात्र अमेरिकेतील कोर्स अधिक मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित आहे. त्यामुळे सीएफए युएसए चा कोर्स करावा.

सीआरएम

रिस्क व्यवस्थापन हा असाच प्रसिद्ध आणि खूप संधी असलेला कोर्स आहे. त्यासाठी सीआरएम हा कोर्स घेतला जातो.

सीआयएमए

आपल्या इकडील सीए सारखाच मेनेज्मेंट अकौन्तिङ्ग हा कोर्स घेतला जातो. सीआयएमए नंतरही चांगले करिअर आहे.

पदवी सोबत करता येण्यासारखे कोर्सेस

तुमची पदवी घेतानाची वर्षे तरी का वय घाल्वावीत? तुम्ही पदवीबरोबर लहान पदविका कोर्सेस करू शकलात तर अधिक उत्तम ! मुंबई विद्यापीठ, वेलिंगकर, माटुंगा, गरवारे , कलिना, भारती विद्यापीठ येथे हे कोर्सेस उपलब्ध आहेत.

१. कर व्यवस्थापन

२. आयात- निर्यात व्यवस्थापन (वेलिंगकर, इंडिअन मर्चंट चेंबर, वर्ल्ड ट्रेड सेंटर)

३. बौद्धिक संपदा व्यवस्थापन

४. सायबर कायदा

५. पर्यटन व्यवस्थापन

६. रिटेल व्यवस्थापन

पदवीनंतर करण्यात येणारे स्पेशलायजेशन

अ) बौद्धिक संपदा

बौद्धिक संपदा हे एक फार मोठे क्षेत्र आहे. त्यामध्ये करिअर च्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. सीएस केल्यावर, किंवा एलएलबी करून बौद्धिक संपदा या विषयावर चांगलि पदव्युत्तर पदविका करता येईल.

ब) फायनान्स

फायनान्स हे असेच एक मोठे क्षेत्र आहे. त्यामध्ये करिअर साठी चांगल्या संधी आहेत. सीए आणि/ किंवा पदवीनंतर फायनान्स मध्ये एमबीए करून या क्षेत्रात प्रवेश करता येईल. सीएफए, सीआरएम हे त्याचे विविध पैलू आहेत.

क) ऑपरेशन व्यवस्थापन

प्रोडक्शन मध्ये ऑपरेशन व्यवस्थापनाला चांगली संधी आहे. या विषयात एमबीए किंवा मुंबई विद्यापीठाचा पदव्युत्तर पदवी कोर्स उपलब्ध आहे.

ड) इ-कॉमर्स

सध्या ऑनलाईन व्यवसायाची चलती आहे. या मह्द्ये काम करायचे असेल तर मुंबई विद्यापीठाचा इकॉमर्स विषयातील एमकॉम आहे, तसेच वेलिंगकर आणि एमइटी मध्ये इ बिझनेस मध्ये एमबीए कोर्स उपलब्ध आहेत. तसेच सप्लाय चेन मधील, एमबीए किंवा पदव्यत्तर पदविका उत्तम.

इ) आयात- निर्यात

आयात निर्यात किंवा इंटरनेशनल बिझनेस हे असेच क्षितिजापलीकडे विस्तार असलेले क्षेत्र आहे. यासाठी पदविका, पदव्युत्तर पदविका तसेच एमबीए सुद्धा उपलब्ध आहेत. आयआयएफटी या संस्थेचा पदव्युत्तर पदविका कोर्स या क्षेत्रात सर्वोत्तम मानला जातो.

याशिवाय पदवी करतानाच काय शिकाल?

परकीय भाषा

कॉमर्स मध्ये पदवी करताना परदेशी भाषा शकणे उत्तम!. जापनीस, जर्मन, फ्रेंच किंवा स्पेनिश भाषा शिकता . जर्मनसाठी मेक्सम्युलर आणि फ्रेंच करायचे असल्यास अलायन्स फ्रान्से या इन्स्टीट्यूट उत्तम आहेत. जापनीस साठी इंडोजापनीस असोसिएशन चांगले आहे.

आयटी

याशिवाय संगणक विषयात तुम्हाला पदविका घेता येईल. इन्फोर्मेशन टेक्नोलोजी मधील पदविका उत्तम. सोबत महाराष्ट्र राज्याचा एमएससीआयटी कोर्स करायला विसरू नका.

टेली

सध्या सर्वत्र संगणकीय अकौंटिंग चालते. त्यामुळे टेलीचा कोर्स करणे उत्तम आहे.

त्यामुळे कॉमर्स मध्ये विविध उप्शाखांचे आगार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एखादी शाखा निवडून त्यात स्पेशलायझेष्ण करू शकता.

चला तर मग कॉमर्स सोबत नव्या रोजगार विश्‍वाचे भागीदार होऊयात , आधुनिक अर्थविश्‍वाचे साक्षीदार होऊयात !!

अधिक माहीतीसाठी संपर्क

प्रा.कृष्णा निलावार ,

उन्नती कॉमर्स क्लासेस , मगनपुरा-नवा मोंढा, नांदेड ..

९४२०८४८४८८ , ९५९५९४८४८८

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot