जिद्द …चिकाटी व आत्मविश्वास यांचा सुरेख ताळमेळ ..
दोन्ही सख्खे भाऊ आयआयटी साठी पात्र ठरण्याची नांदेडातील पहीलीच घटना…!
वडील डॉ. प्रकाश शिंदे यांचे व्यसनमुक्ती साठी मोठे कार्य ..
नांदेड शहरातील पावडेवाडी नाका भागात चिंतामणी हॉस्पिटल या नावाचे व्यसनमुक्ती रुग्णालय असून संचालक एक ध्येयवेडे डॉक्टर आहेत ते व्यसनमुक्तीचे कार्य मोठ्या जोमाने व अगदी मनापासून करतात …कित्येक सभा.. सभारंभ व धार्मिक सोहळे यांना हजेरी लावून ..व्यसनमुक्तीसाठी जनजागरण करतात प्रवचने देतात ..त्यांचे हे कार्य मागील पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळापासून अविरतपणे सुरू असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत २५ ते ३० हजार लोकांना व्यसनमुक्त केले आहे .. त्या अवलिया डॉक्टरांचे नाव हे डॉ. प्रकाश शिंदे असून ते वाघाळा- नांदेड येथील होमिओपॅथी कॉलेजला प्राध्यापक म्हणून पण कार्यरत आहेत ..
सहज भेट ठरली ग्रेट भेट …
आज सहज एक कर्टसी व्हिजिट म्हणून त्यांच्या कडे जाण्याचा मला योग आला .. त्यावेळी तिथे दोन १९-२० वर्षाचे युवक हे लॅपटॉप वर ऑनलाईन क्लास अटेंड करत होते .. मी गेल्यानंतर नमस्कार वगैरे सोपस्कार झाल्यानंतर डॉक्टर साहेबांनी माझा त्यांच्याशी परचिय करून दिला .. व तो देतांना त्यांनी सांगितले की हा माझा मोठा मुलगा मुकूलेश प्रकाश शिंदे .. तो सध्या कानपूर आयआयटी येथे तृतीय वर्षात शिकत असून तो माझा लहान मुलगा विश्वेष प्रकाश शिंदे सध्या दिल्ली आयआयटी येथे प्रथम वर्षात शिकत आहे ..
ज्यावेळी मी हे ऐकलं त्यावेळी काही क्षणांसाठी अचंबित झालो की , दोन्ही भाऊ .. आणि दोघंपण आयआयटी सारख्या संस्थेत गुणवत्तेच्या बळावर प्रवेश मिळवलेले गुणवंत.. त्यांना बघून माझा काही क्षण विश्वासच बसेना .. पण मी थोड्या ईकडच्या तिकडच्या गप्पा मारत त्यांना थोडंस बोलतं केलं त्यावेळी बोलतांना त्यांचे या यशामागचे कष्ट व नियोजन लक्षात आले ..
मुलांच्या यशात आई-वडीलांचा फार मोलाचा वाटा ..
दोघही भाऊ चार वर्षे .. कोटा राजस्थान येथे राहून जेईई साठी तयारी करत होते .. व तेथील उत्तम शैक्षणिक वातावरणात देशातील कठिण समजल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी सराव करत होते .. आणि गुणवत्तेच्या बळावर इंजिनिअरींग साठी अग्रगण्य असणाऱ्या आयआयटी सारख्या संस्थेत दोघंही भाऊ प्रवेशासाठी पात्र ठरले ही नांदेडकरांसाठी फार मोठी अभिमानाचा बाब असून त्यांच्या या यशामागे त्यांचे कष्ट व प्रयत्न तर आहेतच .. पण याबरोबर आहे तो डॉ. प्रकाश शिंदे याचा त्याग व तळमळ ..
दोन्ही मुलांच सुयश ऐकतांना मला चार-पाच वर्षापूर्वीचा काळ आठवला .. डॉ. शिंदे साहेब ईकडे नांदेडात प्रॅक्टीस करायचे .. मुलांसमतेत त्यांची आई कोटा येथे असायची .. कुंटूब कोटा शहरात असायचे आणि दर आठवड्याला – पंधरा दिवसाला नांदेड ते कोटा हा प्रवास स्वतः कार चालवत पूर्ण करायचे..त्यांचे एक पाऊल नांदेडात तर दुसरे पाऊल कोट्यात असायचे .. अशी कसरत ते चार वर्षे सलग पणे करत होते .. त्याचवेळी त्यांचे व्यसनमुक्तीचे कार्य ही तितक्याच तत्परतेनं सुरू होतं ..आज दोन्ही मुलं मोठ्या आनंदाने सांगतात की आज आम्ही जे काही आहोत ते आई-बाब व आजीमुळे कारण त्यांनी स्वतःच्या कष्टांचा विचार न करता आम्हाला उच्च सोयी व सुविधा उपलब्ध करून दिल्या तसेच नेहमी सकारात्मक पाठबळ दिले आणि त्यामुळेच आम्हाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले ..
डॉ. शिंदे यांच्या दोन्ही मुलांच शालेय शिक्षण हे आपल्या नांदेडातील ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल या शाळेत झालं असून महाविद्यालयीन शिक्षण हे कोटा-राजस्थान येथे झालं आहे .. व भविष्यात अजूनही खूप काही शिकायचे आहे असे ते मोठ्या आत्मविश्सासाने नमूद करतात ..
मुकूलेश व विश्वेष हे आयआयटी व आयआयटी प्रवेश परिक्षेबद्दल व आपल्या यशाची गुरूकिल्ली उकलतांना सांगतात की ,
‘जेईई’च्या परीक्षार्थीना उपयुक्त ठरणारे आमच्या मते काही महत्त्वाचे मुद्दे–
० सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी ‘जेईई’चा अभ्यास करताना लक्षात ठेवावं की, बारावी बोर्ड आणि एमएचटी-सीईटी परीक्षेची अभ्यास पद्धती आणि ‘जेईई’ची अभ्यासपद्धती पूर्णपणे वेगळी आहे. ‘जेईई’च्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम अकरावी, बारावीच्या एकत्रित अभ्यासक्रमातून तयार झाला आहे. जेईई परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असून संकल्पनांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
० दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना घोकंपट्टी करण्यापेक्षा पदार्थविज्ञानशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयातील मूलभूत संकल्पना समजून घेण्यावर भर द्यावा.
० जेईई परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे की, गणित, पदार्थविज्ञानशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांचा परस्परांशी खूप जवळचा संबंध (इंटर-रिलेटेड) आहे. यामुळे या विषयांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी या तिन्ही विषयांचा स्वतंत्रपणे नव्हे तर या एकात्मिक संपूर्ण विषयाच्या- वेगवेगळ्या बाबींचा अभ्यास करत आहोत, ही भावना ठेवावी.
० काही
हे सर्व मुद्दे लक्षात घेत ते कसोशीने अमलात आणले तर जेईई परीक्षेत उत्तम गुण संपादन करून हव्या त्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा पर्याय त्यांना उपलब्ध होतो.