March 9, 2021
‘आयआयबी’ ने केली 2021 च्या ‘फास्ट’ घोषणा  

‘आयआयबी’ ने केली 2021 च्या ‘फास्ट’ घोषणा  

 इयत्ता 12 वी मध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना
1000 विद्यार्थ्यांच्या फिस एवढी रक्कम संपूर्णत : माफ

IIB Fast

नांदेड , (प्रतिनिाधी)  देश पातळीवर एमबीबीएस प्रवेश पूर्व परीक्षेसाठी कौतुकास पात्र ठरलेल्या ‘आयआयबी ने 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी ‘आयआयबी ‘फास्ट’   मोफत प्रवेश ही अभिनव योजना जाहीर केली आहे.
एम्पॉवरिंग नेशन थ्रू एज्यु केशन या ब्रीद वाक्याला सार्थ ठरवत एमबीबीएस प्रवेश पूर्व परीक्षेसाठी अग्रेसर ‘आयआयबी’  ने या योजनेत चालू शैक्षणिक वर्षात तब्बल 1000 विद्यार्थ्यांच्या फिस एवढी रक्कम संपुर्णत: माफ करण्याचा निर्णय आयआयबी ने घेतला आहे. एमबीबीएस प्रवेशासाठी सध्या तयारी करीत असलेल्या विद्यार्थी आणी पालकांनी ‘आयआयबी’ च्या या सामाजिक बांधिलकीतून घेतलेल्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे.
‘आयआयबी’ ‘फास्ट’ हा उपक्रम नांदेड आणि लातूर या दोनही शाखांमध्ये  एकाच वेळी राबवण्यात येणार आहे.
या वर्षी सुध्दा ही योजना ‘आयआयबी’ अत्यंत प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नांना साक्षात उतरविण्यासाठी सज्ज झाली आहे. अशी प्रतिक्रिया व्यवस्थापकीय संचालक श्री. दशरथ पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
नांदेड ,लातूर येथे गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून आयआयबी संस्थेतर्फे एमबीबीएस प्रवेश पूर्वपरीक्षेसाठी बायोलॉजी विषयाचे मार्गदर्शन टिम ‘आयआयबी’ तर्फे केले जातेे . ‘आयआयबी’ च्या माध्यमातून आतापर्यंत हजारो विद्यार्थी उच्चतम पदव्यात प्राप्त करून वैद्यकीय क्षेत्रात स्थिरस्थावर होऊन रुग्ण सेवेत कार्यरत आहेत. राष्ट्रीय पातळीवरच्या नीट-2020 मध्ये टीम ‘आयआयबी’ आणि विद्यार्थ्यांनी कोरोना काळातही अतीशय मेहनत करत एमबीबीएसच्या 1253 जागांवर शिक्का मोर्तब केला आहे . ‘आयआयबी’  च्या या यशाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
आर्थिक व सामाजिक दृष्टया दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थी मागे राहू नयेत, या उद्देशाने प्रेरीत आयआयबी फास्ट ही फ्री ऍडमिशन सिलेक्शन टेस्ट योजना आयआयबी राबवत आहे. नीट-2022 ची तयारी करणार्‍या इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांना घ्आयआयबीङ फास्ट चा लाभ मिळेल. अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या बारावी थिअरी तसेच नीट-2022 या परीक्षेची ‘आयआयबी’  तज्ञांच्या टीमकडून तयारी करून घेतली जाईल.
आयआयबी फास्ट निवड चाचणी दोन टप्पयात होणार आहे. सविस्तर माहिती साठी आयआयबी च्या  www.iibedu.com या संकेतस्थळावर  भेट देऊन किंवा  आयआयबीच्या कार्यालयास संपर्क साधून विद्यार्थ्यांना आयआयबी फास्ट साठी नांव नोंदणी करता येईल. प्रवेश नोंदणी केल्यानंतर  विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळ व ठिकाण हॉल टिकीट वर दिले जाईल.
परीक्षेचे वेळापत्रक :
नांदेड आणि लातूर या दोनही ठिकाणी आयआयबी फास्ट योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘आयआयबी’ टीमची जय्यत तयारी सूरू आहे. प्रथम प्रवेश चाचणी नांदेड व लातूर येथे 21 फेब्रुवारी 2021 रोजी होणार आहे या निवड चाचणी मधून नांदेड साठी 1000 विद्यार्थ्यांची व लातूर साठी  700 विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाचणी साठी निवड होईल अंतिम निवड चाचणी परीक्षा दि.25  फेब्रुवारी 2021  रोजी नांदेड व लातूर येथे घेण्यात येईल. नांदेड आणि लातूर येथे स्वतंत्ररीत्या या परीक्षा ठराविक वेळापत्रकानुसार तसेच नीट अभ्यासक्रमाच्या आधारावर पार पडणार आहेत.
‘आयआयबी’ ‘फास्ट’  या योजनेचा खर्‍या अर्थाने गरजू गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. आयआयबी’ तर्फे या योजनेत भारतीय सैन्य दलात कार्यरत सैनिकांच्या पाल्यांना विशेष सवलत देण्याचे आयआयबी ने जाहीर केले आहे व तसेच आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पाल्यांसाठी सुध्दा हाच निकष ठेवून त्याचबरोबर आयआयबी फास्ट द्वारे नांदेड व लातूर जिल्ह्यात कार्यरत पोलीस कर्मचार्‍यांच्या पाल्यांना फीस मध्ये विशेष सवलत देण्यात येणार असल्याचे आयआयबी च्या वतीने सांगण्यात आले आहे. आयआयबी च्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot