March 9, 2021
नांदेडातील पहिलेच अत्याधुनिक डेंटल केअर युनिट स्टुडिओ डेंटल….!

नांदेडातील पहिलेच अत्याधुनिक डेंटल केअर युनिट स्टुडिओ डेंटल….!

दातांचे आरोग्य आणि उपचार – दंतरोग तज्ञ डॉ.सागर राहेगांवकर


आज आपण आपले आयुष्य सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने जगू शकतो, कारण आपले आणि आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी देशाच्या सीमेवर आपले जवान डोळ्यांत तेल घालून पहारा देत असतात. त्यामुळे अशा जवानांमध्ये देशप्रेमाची ऊर्जा आणि बळ आणखी वाढावे, यासाठी आवर्जून वेळ काढून त्यांच्यासाठी सर्वतोपरी करण्याची धडपड असलेली व्यक्ती नांदेडमध्ये असून ती पेशाने डॉक्टर आहे. एवढेच नव्हे तर समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून नि:स्वार्थ भावनेने त्यांचे काम गेल्या एकोणीस वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळेच दंतवैद्यक असलेल्या डॉ. सागर राहेगावकर यांची ‘माणुसकी जपणारा देवमाणूस’ अशी ओळख निर्माण झाली आहे.

आपल्या  डॉक्टरी करिअरचा ‘श्री वरद’ नावाने श्रीगणेशा


आपल्या मुलाने डॉक्टर, इंजिनियर बनावे, अशी जवळपास सर्वच पालकांची अपेक्षा असते. त्यानुसार सागर राहेगावकर यांनी देखील आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न केले आणि ते दंतवैद्यक झाले. डॉ. सागर राहेगावकर यांचे मूळ गाव राहेगाव (ता. नांदेड) येथील. महाराष्ट्र ग्रामीण बँकेत नोकरी लागल्याने 1989 मध्ये वडील सुधाकर राहेगावकर नांदेडला गोवुळनगर भागात राहायला आले. त्यामुळे सागर राहेगावकरांचे शालेय शिक्षण गोवुळनगरच्या पीपल्स हायस्वूलमध्ये झाले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण यशवंत महाविद्यालयात घेतले. बारावीनंतर औरंगाबादच्या शासकीय दंत महाविद्यालयात त्यांनी बीडीएस ही पदवी घेतली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2002 मध्ये नांदेडला रेल्वेस्टेशन रोडवरील डॉक्टरलाईनसारख्या गजबजलेल्या परिसरात त्यांनी श्री वरद डेंटल हॉस्पिटल सुरू केले. श्री गणेशावर निस्सीम भक्ती आणि श्रद्धा असल्यामुळे त्यांनी श्री वरद हे नाव निवडले. 2005 मध्ये डॉ. स्वप्ना यांच्याशी विवाह झाला. गेल्या जवळपास 19 वर्षांपासून त्यांची नि:स्वार्थ सेवा सुरू असून, सामाजिक कार्यासोबतच ते वुटुंबातील आई-वडील, पत्नी आणि दोन मुले यांच्यासाठीही वेळ देतात.

डॉ. सागर राहेगांवकर यांनी आजपर्यंतच्या कारकिर्दीत पाचशेहून अधिक शिबिरे


श्री वरद डेंटल हॉस्पिटल सुरू केले असले तरी त्यांच्यातील सामाजिक कार्य करण्याची उर्मी जागृत होती. त्यामुळे नांदेड जिल्ह्यासह आजुबाजूच्या परभणी, हिंगोली, यवतमाळ तसेच आदिलाबाद, निजामाबाद, म्हैसा, बासर आदी भागात फिरून त्यांनी शाळा, महाविद्यालयांसोबतच ग्रामीण भागातील जनतेसाठी पाचशेहून अधिक मोफत दंतरोग निदान शिबिरे घेतली. दातांचे उपचारच नव्हे तर निगाही तितकीच महत्त्वाची असल्याचे ते सांगतात. त्याचबरोबर रुग्णालयात आलेल्या आर्थिकद़ृष्ट्या गरीब रुग्णांवर पैसे नसल्याने उपचार टाळले नाहीत. माफत दरात चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात. दातांची निगा आणि काळजी याबाबत ते जनजागृती शिबिरे घेऊन व्याख्यानेही देत आहेत.

भारतीय सैन्य दलातील सैनिकांना तन, मन, धनाने मदत…

नांदेड जिल्ह्यातील सोनखेडचे रहिवासी असलेले सैन्यातील जवान संभाजी कदम हे शहीद झाले होते. त्यावेळी त्यांनी व त्यांच्या मित्रांनी पुढाकार घेत वजिराबाद येथील चौकात आदरांजली सभा घेतली. त्यातून सैनिकांप्रती आपण काहीतरी करावे, ही भावना जागृत झाली आणि त्यांनी तेव्हापासून नांदेड आणि आजुबाजूच्या जिल्ह्यांतील सैनिक आणि त्यांच्या वुटुंबियांसाठी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर त्यांच्यासोबत एक दिवस राहून त्यांना स्नेहभोजन घेणे आणि भेटवस्तू देण्याचा उपक्रमही सुरू केला. त्यामुळे सीमेवर लढणारे सैनिकही भारावून गेले. सैनिक हे पैशाचे नव्हे तर प्रेमाचे भुकेले आहेत. आपल्यासाठी आणि देशाच्या रक्षणासाठी लढणार्‍या या सैनिकांना या उपक्रमामुळे ऊर्जा आणि बळ भेटले आहे. सीमेवर असतांना देखील ते आवर्जून या आठवणींना उजाळा देतात. मीच नव्हे तर सर्वच भारतीय नागरिकांनी देखील आपल्या सैनिकांप्रती अशी भावना ठेवली पाहिजे, अशी अपेक्षाही डॉ. राहेगावकर यांनी व्यक्त केली.

डॉ. सागर राहेगांवकर हे समाजसेवेसाठी नेहमीच अग्रेसर..

डॉ. सागर राहेगावकर यांनी इंडियन डेंटल असोसिएशनचे सदस्य झाल्यानंतर नांदेड शाखेचे सचिव आणि अध्यक्षपदही अनेक वर्षे भूषविले आहे. सध्या ते मार्गदर्शक व सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. अध्यक्षपदाच्या काळात 2016 मध्ये त्यांनी राज्यस्तरीय नेडकॉन (नांदेड डेंटल कॉन्फरन्स) घेतली. यावेळी राज्यभरातील चारशेहून अधिक दंतवैद्यक उपस्थित होते तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दंतवैद्यकांनी त्यात वक्ते म्हणून हजेरी लावली होती. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. त्याचबरोबर वासवी क्लबच्या माध्यमातूनही त्यांनी सदस्य, कोषाध्यक्ष आणि सचिव पदावर काम केले. शांत चित्ताचे कार्यमग्न व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. सागर हे धार्मिक कार्यातही अग्रेसर असतात. गणेशोत्सवासोबतच दर चतुर्थीला सत्य गणपतीला त्यांच्यासह पंधरा ते वीसजणांचा एक ग्रुप पहाटे पाच वाजता जातो आणि आरती झाल्यानंतर उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात येतो. स्वतःच्या व्यक्तिगत सुख-दुःखाचा विचार करीत असतांनाच इतरांसाठी जगणारी माणसे या जगात फार कमी आहेत; मात्र डॉक्टरी पेशात राहूनही ते नाते जपतात व समाजाच्या सेवेसाठी सतत काहीतरी करीत राहण्याची इच्छा सातत्याने बाळगतात. मनात असेल तर एक व्यक्तीही समाजकार्य करू शकते, यावर त्यांचा विश्वास आहे. त्याबरोबरच मराठी संत साहित्यावर असणारे प्रेम आणि मराठी साहित्याबद्दलही त्यांचा अभ्यास आहे.

अत्याधुनिक सुविधा देण्याचा मानस….
दंतोपचार तज्ज्ञ डॉ. सागर राहेगावकर व ‘स्टुडिओ डेंटल
नांदेडातील पहिलेच अत्याधुनिक डेंटल केअर युनिट स्टुडिओ डेंटल….

गती, प्रगती आणि अत्याधुनिकता या बाबी नजरेसमोर ठेवून नांदेडातील प्रख्यात दंतोपचार तज्ज्ञ डॉ. सागर राहेगावकर यांनी ‘स्टुडिओ डेंटल’ या स्मार्ट क्लिनिक व दंत प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन मागील वर्षी नांदेडातील भाग्यनगर परिसरात केले. डॉ. राहेगांवकर हे एक उपक्रशील व मदतगार व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित आहेत.
वेगवेगळे उपक्रम व समाजोपयोगी कार्य सातत्याने करीत राहण्याचा त्यांचा कायम प्रयत्न राहतो. त्यांच्या या उपक्रमशील प्रयत्नांची उत्पत्ती म्हणजे डेंटल स्टुडिओ. आपल्या नांदेडसारख्या भागात मी बघितलेलं कोचिन किंवा बेंगलुरू येथील अत्याधुनिक दंत उपचाराचे केंद्र या ठिकाणी असावे, हे माझ्या कायम मनात होते. त्यासाठी मी माझ्या वैद्यकीय शिक्षणानंतरही भारतातल्या विविध दंत उपचार संस्थामध्ये ट्रेनिंगसाठी जायचो आणि तिकडे माझ्या स्वप्नपूर्तीसाठी आणखी बळ मिळायचे, असे ते नेहमीच मोठ्या अभिमानाने नमूद करतात.

अत्याधुनिक दंतोपचार संस्था.. सर्व दंतउपचार एकाच छताखाली..

दात, हिरडी, सुहास्य व यासंबंधी करावयाचे सर्व उपचार, चाचणी आणि चिकित्सा या बाबींसंबधी सर्व अत्याधुनिक साधने एकाच छताखाली उपलब्ध करण्याचा हेतू स्टुडिओ डेंटलमुळे सफल झाला असल्याचे डॉ. सागर राहेगावकर मोठ्या आनंदाने सांगतात, तसेच आपल्या अत्याधुनिक युनिटसंदर्भात माहिती देतांना ते नमूद करतात की, दंतोपचारासंबंधी छोटे छोटे कोर्सेस घेणे व रुग्णांच्या समस्येसंबंधी सर्व प्रकारच्या क्ष किरण चाचणी आदी सर्व अत्याधुनिक संयंत्रे या ठिकाणी स्थापित करण्यात आली आहेत. सर्व प्रकारच्या डेंटल इम्प्लांट सर्जरी व उपचार अत्याधुनिक व अद्यावत सयंत्राद्वारे करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
त्यांच्या अविरत वैद्यकीय प्रवासाला मानाचा मुजरा व पुढील सशक्त वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा! तसेच उपरोक्त उपलब्ध सोयी-सुविधांचा नांदेडकरांनी लाभ घ्यावा, असे सर्व नागरिकांना मन:पूर्वक आवाहन!
– शब्दाकंन मारोती सवंडकर
दै. उद्याचा मराठवाडा, नांदेड-परभणी-हिंगोली

 

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot