March 9, 2021
टॉय वर्ल्ड – नांदेडातील पहीलाच उपक्रम ..आज ७ फेब्रुवारी २०२१ रोजी भव्य शुभारंभ ..!

टॉय वर्ल्ड – नांदेडातील पहीलाच उपक्रम ..आज ७ फेब्रुवारी २०२१ रोजी भव्य शुभारंभ ..!

 

संस्कार व्हॅली स्कूलच्या संचालिका संगिता मोदी यांच्या पुढाकारातून लहान मुलांसाठी खेळण्यांची लायब्ररी ही नाविण्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात ..

आता आपल्या मुलांना लावाखेळण्यांची लायब्ररी

कोरोना सारख्या महाभंयकर साथीने संपूर्ण जग हादरून गेले .. मागील वर्ष भरापासून घरातील लहान मुलं घरातच आहेत .. त्यांचा खेळण्याचा हट्ट हा त्यांना मिळणाऱ्या मोकळ्या वेळा मुळे वाढलेला आहे कारण मागील वर्ष भरापासून शाळा बंद आहेत हे निरीक्षण सहज पणे नोंदवण्यासारखे असून या गरजेतूनच जन्म घेतला खेळण्यांची बॅंक अर्थात ‘टॉय वर्ल्ड’ या टॉय लायब्ररी या संकल्पनेने. खेळण्यांविषयी लहान मुलांना एक वेगळेच आकर्षण असते. अलीकडे मात्र या खेळण्यांची जागा मोबाईल व व्हिडीओ गेम ने घेतल्याचे चित्र पाहावयास मिळते .. मोबाईल व व्हिडीओज् च्या अति वापराने लहान मुलांवर विपरीत परिणाम होतांना आढळून येत आहेत .. मुलांमधील संवाद कमी होतांना दिसतोय ते चिडचिडे होताय यावर सर्वोत्तम उपाय म्हणजेच खेळ व खेळणे …

‘या संवादावर ‘खेळण्याची लायब्ररी’ हा एक उत्तम पर्याय आपल्या नांदेडात टॉय वर्ल्ड च्या माध्यमातून तयार झाला आहे ..

टॉय वर्ल्ड या खेळण्यांच्या लायब्ररी च्या संचालिका संगिता मोदी यांच्याशी या नवीन व नांदेडातील पहील्याच असलेल्या उपक्रमाबद्दल संवाद साधला असता त्या म्हणाल्या की सर्व साधारणपणे सुटी लागली की पुस्तकही नाही आणि शाळाही नाही, अशा मनाजोगत्या मोसमात मुले एवढी हरवून जातात की, खेळ खेळून दिवस पुरा पडत नाही. बाबांकडे आईच्या माध्यमातून मग रोज नवा खेळ आणून देण्यासाठी हट्ट सुरू होतो. पण मुलांना दररोज नवीन खेळणी आणून देणे शक्य नसल्याने मुलांचा हिरमोड होतो. मुलांचा हट्ट पुरवायचा की खिशाला कात्री लावायची, अशा विवंचनेत असणाऱ्या आपल्या नांदेडातील पालकांची सोय खेळणी घराने (टॉय लायब्ररी म्हणजेच टॉय वर्ल्ड)  ने केली आहे. दीड वर्षांपासून आठ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी नाना प्रकारच्या खेळण्यांचे भांडार असलेल्या जुन्या कौठा येथील संस्कार व्हॅली या शाळेतील  टॉय वर्ल्ड या टॉय लायब्ररी’त जाताच खरोखर एखाद्या ‘टॉय टाऊन’मध्ये गेल्याचे जाणवते.

टॉय वर्ल्ड च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकता वाढीला वाव …

टॉय वर्ल्ड च्या संस्थापिका संगिता मोदी यांनी आजचा काळ लक्षात घेत आपल्या कल्पकतेतून या ठिकाणी विविध प्रकारची खेळणी उपलब्ध करून दिली आहेत व विशेष म्हणजे येथे ‘कार्टून्सच्या सीडी नाहीत किंवा व्हिडीओ गेमची यंत्रणा पण नाही आहे कारण टी.व्ही., संगणक, मोबाइल यामध्ये मुलांना न अडकवता त्यांना खेळांच्या माध्यमातून चालना मिळेल, असे खेळ देण्याकडे कल आहे. हवी तेवढी खेळणी आणि मुलांसोबत समरस होऊन खेळणारे कर्मचारी या साऱ्यामुळे नव्यानेच होऊ घातलेल्या या ‘टॉय लायब्ररी’त मुलांसाठी नवीन काहीतरी असेल असा विश्‍वास टॉय वर्ल्ड च्या संस्थापिका संगिता मोदी या मोठया आत्मविश्‍वासाने व्यक्त करतात ..

खेळण्यांची मुबलक संख्या व पर्याय उपलब्ध…

आपल्या टॉय वर्ल्ड या टॉय लायब्ररीरीत लाकडी खेळणी, सॉफ्ट टाइज, गाड्या आणि कोड्यांवर आधारित खेळणी उपलब्ध असून याबद्दल ‘टॉय वर्ल्ड च्या संस्थापिका संगिता मोदी म्हणतात की ‘लहान मुलांना खेळण्याविषयी आकर्षण असते, पण साधारणतः १५ दिवसांतच त्यांचा खेळण्याबद्दलचा रस कमी होतो आणि ते नवीन खेळण्यांची मागणी सुरू करतात. त्यांच्यासाठी ‘खेळण्यांचे ग्रंथालय’ हा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पालकांची सोय होणार आहे असे त्यांनी सांगितले.
मुलांचा वयोगट, त्यांच्या आकलनशक्तीचा विचार करून ग्रंथालयासाठी खेळण्यांची निवड केली असून दर काही महिन्यांनी नवीन खेळणी आणली जातील. एवढेच नव्हे; तर त्यांच्या विचारशक्तीला चालना देणारी पुस्तके आणि सीडीदेखील उपलब्ध करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे असे त्या म्हणाल्या …

 

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot