आनंद, स्वास्थ्य, शांती आणि समाधान देणारा व्यायामाची आता प्रत्येकाला गरज !
नांदेडातील सर्वात मोठ्या जिममुळे नांदेडच्या वैभवात भर . !
नांदेड – प्रतिनिधी
देशभरातील महानगरांच्या धर्तीवर नांदेड शहरातही व्यायामाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याचा विचार करून नांदेड येथील ध्येयवेडा तरूण अनिल नवनाथराव भालेराव यांनी आपल्या व्यायामाच्या आणि शरिरसौष्ठवाच्या आवडीतून आपल्याही भागात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोल्ड जिम सारखी अत्याधुनिक जिम असावी या हेतूने प्रेरित होत शहरातील मुख्य भाग असलेल्या नवीन मोंढा मार्केट यार्ड परिसरात ” विवांश हेल्थ क्लब ” हे अद्यायावत व नांदेडातील सर्वात मोठं हेल्थ क्लब सुरू केले आहे व ते आता काळानुरूप अत्याधुनिक साहीत्य आणि पर्सनल ट्रेनिंग या माध्यमातून तरुणाईचे आकर्षण बनले आहे , या ठिकाणीच्या अद्यायावत मशिनरींवर व्यायाम केल्यास त्याचे चांगले रिझल्टस् मिळतात असे त्यांचे म्हणणे आहे ,
आजच्या घडीला पारंपरिक तालीम संस्था, व्यायामशाळांना फाटा देत जिम संस्कृती शहरासह ग्रामीण भागातही झपाट्याने रूजत चालली आहे. व्यायामशाळेत जाऊन “बॉडी‘ कमावण्यापेक्षा फिटनेस राखण्यासाठी जिमला जाणे, चित्रपटातील हिरो, हिरॉईनप्रमाणे शरीराचा लूक करण्यासाठी जिमला जाणे किंवा “स्टेटस्‘ म्हणूनही जिमला जाणाऱ्यांची संख्या सगळ्याच शहरात वाढली आहे. “ विवांश हेल्थ क्लब ” प्रमाणेच राज्यातील अनेक शहारांमध्ये नव्या जिम थाटामाटात सुरू होत आहेत. यामध्ये नव्याने यंत्रसामग्रीही येत आहे. तरुणाईला जिमबाबात विशेष आकर्षण आहे.
जिम संस्कृतीमुळे ट्रेनर व डाएटिशयन ही दोन नवीन रोजगाराची क्षेत्रेही खुली झाली आहेत, तर पूरक खाद्यांचा व्यवसायही वाढला आहे. जिम म्हणजे केवळ फॅशन नसून शास्त्रीय गोष्टीच्या आधारे केलेला शास्त्र शुद्ध व्यायाम आहे ही गोष्ट तरूणांने लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. जिम संस्कृतीकडे केबळ उच्चभ्रूच नव्हे, तर मध्यवर्गीयही आकर्षित होत आहे. राज्यातील अनेक शहरांतील अशा जिममध्ये येणाऱ्या बहुतांश जणांचा कल वजन व पोट कमी करण्याकडेच अधिक आहे. अत्याधुनिक जिममधील खर्च वर्षाला सर्वसाधारण २० ते ३० हजारच्या आसपास जातो पण आपल्या नांदेडकरांचा विचार करता आपण तो १० ते १२ हजाराच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे असे विवांश हेल्थ क्लबचे संचालक श्री अनिल भालेराव यांनी आवर्जून नमूद केले.
ट्रेनर-डाएटिशयन -या दोन्ही बाबींवर आमच्याकडे विशेष लक्ष –
व्यायाम करवून घेण्यासाठी किंवा व्यायाम कशा पद्धतीने करावा, हे सांगण्यासाठी व्यायामशाळेत तज्ञ ट्रेनर नेमण्यात आले आहेत. केवळ व्यायाम करून फिटनेस राखणे व वजन कमी करणे शक्य नसल्याने त्यासाठी योग्य डाएटची आवश्यता असते. जिम संस्कृतीत ट्रेनर व डाएटिशयन हे दोन महत्त्वाचे घटक असून यातून तरुण-तरुणींना नव्या रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत.
“ विवांश हेल्थ क्लब “ चे संचालक श्री अनिल भालेराव म्हणाले, “”अत्याधुनिक साधने जिममध्ये येत असली तरी आपल्या शरीराला कोणते साधन उपयोगी आहे, याची शास्त्रीय माहिती घेणे या ठिकाणी आवश्यक ठरते. चुकीच्या साधनाने व्यायाम केल्यास शरीरावर परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. फिटनेसाठी पूरक खाद्य सेवन करण्याचे प्रमाणही वाढत असले तरी व्यायामाला ते केवळ पूरक खाद्य आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. तसेच फिटनेस राखण्यासाठी व्यायाम करीत असताना आपल्या शरीरातील क्षमतांची शास्त्रीय चाचणी करून घेऊनच मग व्यायाम करणे आयुष्यभर फिटनेस राखण्यासाठी उपयोगी असते.‘‘ त्यामुळे या बाबी लक्षात घेत आम्ही ट्रेनर-डाएटिशयन -या दोन्हींवरही भर देत शास्त्रोक्त तज्ञ या ठिकाणी उपलब्ध आहेत.
जीवन धकाधकीचे होत चालले आहे , सर्वच क्षेत्रात चुरस … अनिल भालेराव
दैनंदिन जीवनात जसे बदल घडू लागलेत तसेच बदल अलीकडल्या व्यायाम पद्धतींमध्येही घडून येत आहेत. … साहजिकच नियमित व्यायामाच्या पारंपरिक शैलींच्या ऐवजी आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असणार्या, एरोबिक्स आणि योगप्रशिक्षण … बॉक्सिंग आणि मेडिसीन बॉलपासून ते जाझ एक्सरसाइजपर्यंत अत्याधुनिक व्यायाम प्रकाराचं प्रशिक्षण मोठ्या आधुनिक जिम्स मध्ये आवर्जून दिलं जातं. .. पण आहारातील विषारी बदल, वेगवान जीवन शैली आणि त्यामुळे सततचा ताण-तणाव आदी बाबींमुळे आजची तरूणाई वेगवेगळ्या आजारांना खूप कमी वयात निमंत्रण देताना दिसत आहे त्यामुळे आमच्या लेखी आजच्या तारखेत फक्त शास्त्रोक्त व्यायाम हेच वरील सर्व मुद्यावरील गुणकारी औषध आहे …
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अत्याधुनिक हेल्थ क्लबची निर्मिती –
माझे बालपण हे नांदेड शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या नवा मोंढा परीसरात गेले ज्या ठिकाणी अगदी पहाटेपासूनच वाहनांची प्रचंड गर्दी असायची जिथे रस्त्याने साधे चालणेही अवघड आहे. मग रस्त्यावर वा मोकळ्या जागेत व्यायाम करणे ही तर लांबचीच गोष्ट होती आणि अलिकडच्या काळातील आधुनिक जीवनशैलीतील धकाधकीच्या व्यवहारांमुळे जेवण वेळेवर नसणे, व्यायामाचा अभाव असणे यामुळे शरीर आटोक्यात राखणे अवघड बनले आहे आणि त्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. व्यायामासाठी अत्याधुनिक साधने हवीच व तीही एकाच छताखाली जसे व्यायाम हा चमत्कार नाही, त्यात सातत्य हवे, योग्य प्रमाणा हवे. त्याचा योग्य असा परिणामही साधायला हवा म्हणून आम्ही गोल्ड जिमच्या धर्तीवर सायबॅक्स व जेराई या जगप्रसिद्ध ब्रँड ची उपकरणे आमच्या जिममध्ये वापरात आणली आहोत .
काळानुसार व्यायामाची अनेक अत्याधुनिक साधनेही उपलब्ध होत आहेत, ती आमच्याकडे आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील तसेच नांदेडातील छत्रपती चौक परिसरात आताच्या पेक्षाही मोठी जिम लवकरच सुरू करण्याचे नियोजन आहे ” असे श्री भालेराव शेवटी बोलतांना म्हणाले .
श्री अनिल नवनाथराव भालेराव,
संचालक विवांश हेल्थ क्लब , नवा मोंढा, नांदेड