March 9, 2021
श्री ट्रेडिंग गहउद्योगाच्या माध्यमातून   ग्रामीण भागातील युवकांसाठी स्वयंरोजगारासाठी मोठे कार्य …!

श्री ट्रेडिंग गहउद्योगाच्या माध्यमातून  ग्रामीण भागातील युवकांसाठी स्वयंरोजगारासाठी मोठे कार्य …!

सरळ सोप्या व्यवसायातून मोठी रोजगाराची संधी

बेरोजगार युवकांना स्वावलंबी बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगत सुरुवातीला स्वतःच्या बेरोजगारीवर यशस्वी मात करत श्री शंकर हळदेकर या ग्रामीण भागातील युवकाने आपल्या श्री ट्रेडिंग या इवल्याश्या प्रकल्पाच्या बळावर बेरोजगार युवकांना नायगाव जि. नांदेड सारख्या ग्रामीण भागात गृह उद्योगाचे अचूक मार्गदर्शन करत स्वावलंबी बनविण्याचा एक प्रकारचा वसा हाती घेतला आहे त्यांच्या या भगिरथ प्रयत्नाने ग्रामीण भागातील युवक मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगारासाठी प्रेरीत होऊन प्रत्यक्ष कामाला लागले आहेत .

बिकट परिस्थितीतून यशस्वी वाटचाल ..

घरची बेताची आर्थिक परिस्थिती व त्यामुळे शालेय जीवनातच शाळेला ठोकलेला कायमचा रामराम त्यानंतर लहान-सहान नोकऱ्या आणि पुढे या सगळ्या प्रकारच्या अंत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करताना श्री शंकर हळदेकर यांनी प्रचंड मेहनतीने श्री ट्रेडिंग गृहउद्योग या छोटेखानी व्यवसायाची नायगांव जि. नांदेड या तालुक्याच्या ठिकाणी स्थापना केली.  त्यानंतर श्री ट्रेडींगच्या प्रारंभीच्या काळात आपल्या माध्यमातून त्यांनी नायगाव सह परिसरा तील गावात लग्न, संभारंभ, शुभकार्य आदी ठिकाणी द्रोण,पत्रावळ्या,प्लास्टिक ग्लास हे साहीत्य पुरविण्याची सुरुवात केली .   या लग्न व शुभकार्ये उपयोगी साहीत्याच्या पुरवठ्याच्या वेळी त्यांना एक बाब लक्षात आली की आपण आपल्या जिद्द व चिकाटीच्या बळावर होलसेल भावात खरेदी केलेल हे साहीत्य गावोगाव स्वतः फिरुन विक्री करतो मग द्रोण व पत्रावळ्या बनविण्याचे मूळ उद्पादन आपणच केले तर काय बिघडले आणि ते आपणच करायला पाहिजे असे त्यांनी ठरविले आणि त्यानंतर त्यांनी द्रोण बनविण्याची मशीन व कच्चा माल आदीची माहिती मिळवत स्वतःची उत्पादने तयार करायला सुरुवात केली. काल ओघात आपल्या उत्पादनाच्या दर्जा व वापरातील सुलभता आदी वर परीसरातील ग्राहकांचा विश्वास बसल्यानंतर त्यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा व विदर्भ येथील बेरोजगार युवकांना या व्यवसायात आणण्यासाठीचे प्रयत्नांना सुरूवात करत त्यांना या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल, मशीन्स् व अर्थसाह्य स्वतः उपलब्ध करून देताना श्री ट्रेडिंग गृह उद्योग मार्गदर्शन केंद्राची यशस्वी मुहूर्तमेढ रोवली .

श्री ट्रेडींग ची प्रगतीपथाकडे वाटचाल ..

पुढे जात या छोट्याश्या प्रयत्नाने अल्पावधीतच व्यापकस्वरूप घेतले आणि एक आदर्श स्वंयरोजगार मार्गदर्शन संस्था म्हणून नावलोकिक मिळविला आहे आजमितीला श्री ट्रेडिंग व गृह उद्योग मार्गदर्शन केंद् आपल्या माध्यमातून अत्यंत वाजवी दरात इच्छुक व्यावसायिकांना पत्रावळ्या , द्रोण , पेपर डिश ,अगरबत्ती आदी उत्पादने बनविण्यासाठीच्या सर्व प्रकारच्या मशीन उपलब्ध करतांनाच  कच्चा माल आणि तयार मालाच्या विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठ आदी बाबीवर अचूक मार्गदर्शन करत आहे . त्यामुळे तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण परिसरातील हजारो बेरोजगार तरुणांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे, येत्या काळात मराठवाड्यातील जास्तीत जास्त लहान खेडे, गाव, तालुका पातळीवरील युवकांना स्वंयरोजगाराच्या चळवळीत समाविष्ट करण्याचा निर्धार श्री शंकर हळदेकर यांनी शेवटी बोलतांना व्यक्त केला …

——-

सुरू करा घरच्या घरी आपला स्वतःचा व्यवसाय ! 

कमवा महिना दहा हजार पेक्षा जास्त गुंतवणूक १,२५,०००/-(मशीन +कच्चामाल +मार्केटिंग )

कच्चा माल देऊन तयार माल घेण्याची १००% हमी कायदेशीर एग्रीमेंट

संपर्क श्री ट्रेडिंग नायगाव जिल्हा नांदेड मो. नं. ९९ ६० १४० ४००

 

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot