February 27, 2021
 पेन मॅनेजमेंट आणि पी आर पी थेरपी…!

 पेन मॅनेजमेंट आणि पी आर पी थेरपी…!

डॉ.एस .एस. जगदंबे

पेन मॅनेजमेंट म्हणजे वेदना निवारण.शरीरातील कोणत्याही प्रकारच्या दुखण्यावर उपचार करणे म्हणजे पेन मॅनेजमेंट..ह्यामध्ये वेग वेगळ्या प्रकारच्या दुखण्यावर वेग वेगळी प्रकारची उपचार पद्धती उपलब्ध आहे.त्यातील एक उपचार पद्धती म्हणजेच पी आर पी थेरपी…आपण स्टेम सेल थेरपी हे नाव नक्कीच ऐकला असेल कीवा वाचलं असेल..पी आर पी थेरपी म्हणजे स्टेम सेल थेरपी सारखीच किंवा त्याचीच एक उपचार पद्धती असते असा म्हणायला काही हरकत नाही..

पी आर पी थेरपी म्हणजे काय ?

ती कोणत्या कोणत्या आजारावर वापरली जाते?

पी आर पी थेरपी ने कसा फायदा होवू शकतो ? 

ती कुठे कुठे उपलब्ध आहे ?

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणास खालील लिखाणात मिळतील.

पी आर पी थेरपी म्हणजे काय ?

पी आर पी थेरपी म्हणजे प्लेटलेट रीच पलास्मा थेरपी…

Platelet म्हणजे काय ? तर प्लेटलेट म्हणजे आपल्या रक्तातील एक पेशी  घटक..जे रक्त गोठवण्याचा काम करत असतात.ज्यामधे अनेक प्रकारची ग्रोथ फॅक्टर,असतात..जसे की (PDGF,IGF,TGF ,EGF,ETC ETC ) ही सगळी फॅक्टर हे वेवेगळ्या प्रकारची काम करत असतात.आपल्याला जखम झाल्यावर आपली जखम काही दिवसात आपोआप भरून येते .ती शरीरातील रक्तातील ह्या प्लेटलेट आणि त्याच्या factors मुळे.म्हणजे आपल्या रक्तात एखादी जखम भरून काढण्याची क्षमता असते..हाच सिद्धांताचा वापर करून पी आर पी थेरपी उपचार करते.

ज्यामध्ये रुग्णाच्या शरीरातून रक्त वाहिनिमधून किंवा हाड मधून (BONE MARROW) रक्त घेतल्या जात.त्यावर पी आर पी मशीन द्वारे प्रक्रिया करण्यात येते .व नंतर रक्तातील महत्वाचे घटक म्हणजे पी आर पी हे वेगळे करून उपचारासाठी वापरण्यात येते.. साधारणतः माणसाच्या रक्तात १ मिली लिटर मध्ये १५०००० ते ४००००० प्लेटलेट असतात.पी आर पी मध्ये आपल्याला ह्याचा प्रमाण ७ ते ८ पट जास्त असावा लागतं तरच त्याला पी आर पी म्हणतात.

काही वेळेस रुग्णाच्या चरबितून पण स्टेम सेल जमा करून ते उपचारासाठी वापरण्यात येतात..त्याला adipose tissue stem cells म्हणतात.. ती कोणत्या कोणत्या आजारावर वापरली जाते ?पी आर पी थेरपी बऱ्याच प्रकारच्या शारीरिक दुखण्यावर योग्य वेळेत उपचार केल्यास खूप फायदेशीर ठरते.

जसे की

१. खांदा दुःखी : 

खांद्याला होणाऱ्या ईजेमुळे खांद्याच्या वरील मास पेशींवर सूज येते कीव त्या फटल्या जातात.अशा वेळेस रुग्णाला खूप त्रास होतो ,ते आपला हात पण उचलू नाही शकत.दैनंदिन काम करत असताना कपडे घालताना पण त्रास होतो.

२. कोपरा दुःखी :(टेनिस एल्बो) : कोपरा दुःखी मध्ये पण पी आर पी थेरपी चा फायदा होतो.

संध्याला मार लागल्यामुळे.

३.गुडघे दुःखी (osteoarthritis):

गुडघे दुःखी ही बऱ्याच प्रकारची असते.त्याची गुडघ्याच्या आतील गादी चया वा हाडाच्या  खराबी नुसार त्यात १,२,३,४, असे grade असतात..कधी कधी वजन जास्त असण्याने,मार लागल्यामुळे ,वयोमानानुसार गुडघे खराब होतात ..व त्रास द्यायला लागतात.कधी मार लागल्यामुळे गुडघ्यातील गादीला इजा होते किंवा फाटते.अशा वेळेस वीणा ऑपरेशन पी आर पी थेरपी ने  आणि नियमित व्यायामाने आपण हा त्रास कमी करू शकतो व गुडघ्याची होणारी झीज कमी करू शकतो..

४. टाच दुःखी: 

बऱ्याच लोकांना टाच दुखी च त्रास असतो.आम्ही त्याला plantar fascitis mhnto . सकाळी झोपितून उठल्यानंतर रुग्णाला चालताना त्रास व्हायला लागतो..कीव जास्त वेळ एका जागेवर बसून उठल्यानंतर पण त्रास होतो..ह्यामध्ये टाच च्या खालच्या भागातील मास पेशींवर सूज आल्यामुळे हा त्रास सुरू होतो..कधी कधी हा त्रास कालांतराने आपोआप २-३ महिन्यामध्ये  पण कमी होवू शकतो..पण जर कमी नाही झाला तर हा त्रास आपला काम बंद करू शकतो..ह्यावर पण पी आर पी  थेरपी ने उपचार घेवून सूज कमी करता येते व होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळविली जावू शकते.. तसेच टाच च्या मागच्या बाजूस होणारा त्रास (tendo achilitis) ह्यावर पण पी आर पी थेरपी ने उपचार करता येवू शकतात..

५.कंबर दुखी.:..

कंबर दुखी बऱ्याच लोकांना असते..त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात.मणक्यातील गादी च्या  degenaration मुळे झीज झाल्यामुळे कंबर दुखत असेल तर पी आर पी थेरपी आपण मणक्यातील गादी मध्ये पण देवू शकतो..मणक्यातील सांध्यावर सूज आल्यामुळे त्रास असेल तर त्यात पण आपण ह्या उपचार पद्धतीने फायदा करून घेवू शकतो.

६. मन गट , घोटा दुखणे:

मन गटातील दुखणे तसेच घोट्याजवळच्या दुखण्यावर पण ह्या उपचार पद्धतीचा फायदा होवू शकतो..पी आर पी थेरपी ने कसा फायदा होवू शकतो ? पी आर पी थेरपी मध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लेटलेट रिच plasma मुळे त्यातील असणाऱ्या अनेक ग्रोथ फॅक्टर inflammatory markers.hyamule शरीरातील सूज कमी करून इजा कमी होवून त्रास कमी होवू शकतो.व भविष्यात होणारी झीज कमी करता येवू शकते..

ती कुठे कुठे उपलब्ध आहे  ?

पी आर पी थेरपी ही एक अत्याधुनिक उपचार पद्धती आहे.पाश्चात्य देशात हीचा सरस वापर केल्या जातो. भारतात मेट्रो शहरांमधील कॉर्पोरेट हॉस्पिटल मध्ये याचा  वापर करण्यात येतो. सुदैवाने, मराठवाड्यातील पहिले पेन मॅनेजमेंट सेंटर  आपल्या नांदेड शहरात बोर बन येथे नवजीवन पेन मॅनेजमेंट सेंटर  ह्या नावाने आहे . तिथे पी आर पी थेरपी साठी लागणारी अत्याधुनिक मशीन उपलब्ध आहे ..मराठवाड्यात नांदेड मध्ये ह्या उपचार पद्धतीचा फायदा गरजू रुग्ण करून घेवू शकतात..

डॉ. कृष्णा शेषराव जगदंबे

M.B.B.S. D.A. FPM (Delhi)  

इंटरव्हेंशनल पेन फिजिशियन व कन्सलटंट अनास्थेशिस्ट

नवजीवन पेन मॅनेजमेंट सेन्टर 

बोरबन  , नांदेड ..

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot