February 27, 2021
श्रीराम रेफ्रिजेरेशन – कुलिंग हब ते आता हॉटेल इक्विपमेंट उत्पादक….!

श्रीराम रेफ्रिजेरेशन – कुलिंग हब ते आता हॉटेल इक्विपमेंट उत्पादक….!

वॉटर चिल्लर…फ्रिज पासून हॉटेल साठी लागणारे विविध इक्विपमेंट एकाच ठिकाणी ..
नांदेड शहरात आपल्या उत्कृष्ट आणि दर्जेदार उत्पादनाच्या बळावर गेल्या अनेक वर्षापासून ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देत वॉटर कुलिंग या मोठ्या कंपन्याची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात श्रीराम रेफ्रिजेरेशन एक विश्वसनीय नाव म्हणून पुढे आले आहे आणि आता त्या वाटचालीत पुढे जातांना श्रीराम रेफ्रिजेरेशन ने दर्जेदार हॉटेल इक्विपमेंट ची शृखंला तयार करतांनाच अनेक नव व्यावसायिकांना कमी किमतीत उत्कृष्ट उत्पादन उपलब्ध करून देत मोलाची कामगिरी बजावली आहे ..
आपल्या उत्पादनात सातत्याने दर्जात्मक बदल घडवत नवनवीन तंत्रज्ञान वापरत एकापेक्षा एक सरस उत्पादने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याकडे श्रीराम रेफ्रिजेरेशन चा नेहमीच कल असतो त्या उदंड इच्छाशक्ती च्या बळावर आजरोजी नांदेड शहरातील थंड पाण्याचे संयत्र व त्या सोबतच लहान ते मोठ्या हॉटेलसाठी लागणारे इक्विपमेंट तसेच बेकरी साठी उपयोगात येणारी सयंत्रे तसेच साधनं बनविण्याचे एक विश्वसनीय उत्पादक म्हणून श्रीराम रेफ्रिजेरेशन चे नाव नांदेड करांना सुपरचित झाले आहे श्रीराम रेफ्रिजेरेशन आजमितीला विविध प्रकारचे वाटर कुलर , डीप फ्रिजर , बॉटल कुलर , व्हर्टीकल फ्रिज ,मोठी शितगृहे, गॅस बर्नर,हॉटेल साठी उपयोगात येणारी विविध इक्विपमेंट ज्यात गॅस बर्नर, दोसा प्लेट, बॅनी मॅरी विथ सर्व्हिस काँऊटर, डम्प टेबल,वर्क टेबल, हँगिग सिंक, मसाला टेबल,स्टोरेज रॅक, सिंगल बर्नर शेगडी व अनेक प्रकारची उत्पादने याठिकाणी उत्पादित केली जातात..
साडे-तीन दशकांपूर्वी वडिलांने सुरू केलेल्या व्यवसायाला पुत्रांनी दिली आधुनिकतेची जोड व स्वंयरोजगारातून निर्माण केला आहे नांदेडकरांसमोर एक आदर्श !
एकविसाव्या शतकामध्ये शहरीकरण झपाट्याने वाढत गेले असले तरी त्यामुळे रोजगाराच्या संधीदेखील निर्माण झाल्या.ग्रामीण भागातील बेरोजगार युवक रोजगाराच्या शोधात महानगरामध्ये जाऊ लागले. त्यांपैकीच एक युवक राजेंद्र तुकाराम आळंदीकर असेच ग्रामीण भागातून नांदेडला आले. सुरवातीला हाताला मिळेल ते काम सुरू केले; परंतु त्यांच्यातील उद्योजक मात्र त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.इकडची तिकडची कामे करून चार पैसे कमावत असल्यामुळे त्यांचा बऱ्यापैकी उदरनिर्वाह सुरू होता; परंतु काही तरी वेगळे करण्याची त्यांची धडपड असायची. त्यामुळे शेवटी त्यांनी १९८५ मध्ये नांदेड शहरात पाच बाय दहाच्या दुकानात फ्रीज दुरुस्तीच्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला.
अडचणीतून यशस्वी मार्गक्रमण करत वाटचाल…
सुरवातीला अडचणी आल्या; पण त्यांवर मात करीत त्यांनी मेहनतीने हा व्यवसाय सुरूच ठेवला. त्याचबरोबर या व्यवसायाचा अभ्यास करून प्रशिक्षणही घेतले. त्यामध्ये पत्रा कारागीर म्हणून प्रशिक्षण घेऊन आळंदीकर यांनी १९९१ मध्ये दहा हजारांची पत्रा बेन्ड करण्याची मशिन विकत घेतली. या मशिनच्या साह्याने कलेची जोड देत कुल्फी, आईस्क्रिम  मशिन तयार करण्यास सुरवात केली. दरम्यान, राजेंद्र यांची दोन्ही मुले अमोल व नितीन त्यांना या व्यवसायात मदत करू लागली, तेव्हा रेफ्रिजरेटरच्या त्यांच्या या व्यवसायाला खरी चालना मिळाली. सुरूवातीला त्यांचा मुलगा नितीन याने स्वत्ः वर्कशॉपमध्ये काम करायला सुरूवात करत त्यांना मदत करायला सुरूवात केली तसेच त्यांचा मुलगा अमोल हा एमबीए मार्केटिंगचे शिक्षण घेऊन आल्यानंतर श्रीराम रेफ्रिजरेशन या नावाने फर्म सुरू केली आणि त्यांची मराठवाडा, कर्नाटक, आंध्र प्रदेशपर्यंत उत्पादने गेली आहेत.
श्रीराम रेफ्रिजरेशनच्या व्यवसायाला आधुनिक तंत्राची जोड देऊन व्यवसायाला गती दिली
अत्याधुनिक तंत्रज्ञान चा उपयोग..श्रीराम रेफ्रिजरेशनच्या व्यवसायात आज डिजिटलायझेशन झाले आहे. नामवंत आर्किटेक्‍चरने बनवून दिलेले डिझाईनची कटिंग मशिनच्या साह्याने करण्यात येत आहे. त्याचबरोबर श्रीराम रेफ्रिजरेशन यांच्याकडे सीएनसी प्लाझमा मशिन आहे. या मशिनच्या साह्याने हवे ते डिझाईन तयार करता येऊ शकते
दर्जेदार उत्पादनांच्या बळावर नांदेडकरांसाठी आपलेपण
गेल्या ३० वर्षा पासून आपल्या दर्जेदार उत्पादांच्या बळावर नांदेड शहरातील अनेक नामांकित शाळा, कॉलेजस्, संस्था , शासकीय कार्यालये , बँका या सोबतच मोठे हॉस्पिटल्स या ठिकाणी श्रीराम ची उत्पादने बसविली आहेत . श्रीराम कडे ५० लिटर पासून ते २००० लिटर प्रयंन्त्चे विविध कूलिंग मशिन्स् विविध प्रकारातील हॉटेल इक्विपमेंटस् ग्राहकांच्या मागणीनुसार तयार करून दिले जातात असे श्रीराम चे संचालक श्री अमोल व श्री नितीन आळंदीकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले नवीन पाऊल म्हणून आपण किचन इक्वीपमेंट हे हॉटेल्स साठी उपयोगी असणारे बहु उपयोगी उत्पादने बनवीत आहोत त्यास ग्राहकांचाही अनुकूल प्रतिसाद आहे
ग्राहकांचाही अनुकूल प्रतिसाद
उन्हाळ्याच्या काळात वाढत जाणारं तापमान, वेळेअभावी अन्नपदार्थ जास्त काळ टिकवण्याची गरज यामुळे बघता बघता रेफ्रिजरेटर हा स्वयंपाकघरातला अपरिहार्य घटक झाला आहे. त्यामुळे काळाच्या बरोबर कुलिंग मशिन्सची व दर्जेदार हॉटेल इक्विपमेंटस् ची मागणी शहरासोबतच ग्रामीण भागातही वाढली असून त्यानुसार आम्ही आता स्टेडिअम येथील जुन्या जागेचा विस्तार करत वसरणी भागात मोठं वर्कशॉप सुरू केलं आहे त्याठिकाणी अत्याधुनिक मशिन्स् व्दारे अधिक दर्जेदार उत्पादने देण्याचा आमचा मानस आहे ..
श्री अमोल व श्री नितीन आळंदीकर ,
संचालक , श्रीराम रेफ्रिजेरेशन , नांदेड
Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot