चिंतामणी हॉस्पिटलच्या वतीने आर्थोस्कोपी शिबीराचे आयोजन
नांदेड – बातमीदार
येथील चिंतामणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स् आयुर्वेद कॉलेजच्या समोर येथे येत्या ७ फेब्रुवारी २०२१, रविवार रोजी आर्थोस्कोपी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरात गुडघेदुखीचे रुग्ण हे लाभ घेऊ शकतात अशी माहीती आयोजक डॉ. स्वप्निल चक्करवार यांनी दिली
सदरील शिबीरात ज्या रुग्णांना दुर्बिणीव्दारे गुडघ्याच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे अशा रुग्णांनी एक वेळेस अवश्य भेट द्यावी असे डॉ. चक्करवार यांनी म्हटले आहे तसेच या शिबीरात ज्या रुग्णांची गुडघ्याच्या आतील कुर्चा फाटली आहे किंवा गुडघ्याचे लिगामेंट तुटले असल्यास अथवा गुडघ्यात छोटा हाडाचा तुकडा पडला असल्यास तसेच गुडघ्याचे कार्टिएज डॅमेज झाले असल्यास या रुग्णांनी या आयोजित शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. स्वप्निल चक्करवार यांनी केले आहे
आर्थोस्कोपी म्हणजे काय ….?
ऑर्थोस्कोपी म्हणजेच हाडाची एंडोस्कोपी (ज्याला ऑर्थोस्कोपी शस्त्रक्रिया देखील म्हणतात.) ही एक लहान शस्त्रक्रिया असून , ज्यामध्ये एक तपासणी आणि कधीकधी सांध्याच्या खराब झालेल्या आतील भागावर ऑर्थोस्कोपीचा वापर केला जातो, हे एक प्रकारची एंडोस्कोप. (एक डिव्हाइस जे शरीराच्या अंतर्गत भागात जाऊन पाहणी करते ), जे लहान चिराच्या नंतर गुडघ्यात घातले जाते.
अधिक माहीतीसाठी व नोंदणीसाठी संपर्क –
स््वप्निल चक्करवार ,
एम.बी.बी.एस, एम.एस.आर्थो,
ऑर्थोस्कोपी व जाँईन्ट रिप्लेसमेंट सर्जन,..
चिंतामणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स , नृसिंह हाईटस , आयुर्वेद कॉलेज समोर , नांदेड
मो. – ७७७५८५४४४६