नांदेड – प्रतिनिधी
येथील नवजिवन पेन मॅनेजमेंट , बोरबन यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्या साधून नवजिवन पेन मॅनेजमेंट सेंटर , बोरबन येथे २६ जानेवारी रोजी तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्याठिकाणी – डॉ. कृष्णा शेषराव जगदंबे, MBBS DA FIPM CIPM (Delhi) इंटरव्हेंशनल पेन फिजिशियन यांनी उपस्थित रुग्णांवर निदान व उपचार केले..
या शिबीरात पाठदुखी ,मणक्याचे आजार,मणक्याची गादी सरकणे ,छोट्या सांध्यातील दुखणे,सायटिका व माकड हाडाचे दुखणे ,हातापायाला मुंग्या,बधिरपणा येणे,जळजळ होणे,गुडघेदुखी व ईतर सांधेदुखी,फ्रोझन शोल्डर म्हणजेच थिजलेला खांदा,घोट्याचे व टाचेचे दुखणे,कोपराचे दुखणे म्हणजेच टेनिस एल्बो ,मानेचे दुखणे , चेहऱ्यावरचे दुखणे , डोकेदुखी , मायग्रेन,ट्रायजमिनल न्युराल्जिाया,शस्त्रक्रियेनंतरचे कोणतेही दुखणे , ईतर कोणत्याही प्रकारचे दुखणे.. व त्यासोबत मोफत हाडाची ठिसूळता तपासणी आदी रुग्णांवर निदान व उपचार करण्यात आले..
सदरील शिबीरासाठी जवळपास शंभर पेक्षा जास्त रुग्णांनी नोंदणी करत अभूतपूर्व प्रतिसाद दिला व पन्नास पेक्षा जास्त रुग्णांनी शिबीराचा लाभ घेतल्याचे आयोजक डॉ. कृष्णा जगदंबे यांनी सांगितले ..पुढे माहीती देतांना ते म्हणाले की शिबीरात येणाऱ्या रुग्णांना आजाराबद्दल मार्गदर्शन करण्यात येऊन पुढील उपचारांबद्दल माहीती पण देण्यात आली ..