संस्कारातूनच मूहर्तमेढ……!
महाराष्ट्र शासनाच्या वतीने टॉप परफॉर्मिंग हॉस्पिटल म्हणून गौरव …!
नांदेड शहरात जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देण्याचा एक तंतोतंत प्रयत्न करण्याऱ्या निलेश बास्टेवाड आजच्या युवा पिढीतील सेवावृत्ती डॉक्टर म्हणून सुपरिचत झाले आहेत असे असले तरीही रुग्णसेवा म्हणजेच ईश्वर सेवा हे ब्रिद त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून मिळालेलं आहे कारण डॉक्टर साहेबांचे आई-वडील हे दोघेही डॉक्टर … वडीलांनी सामान्य रुग्णांना सेवा देतांना … आपल्या संपूर्ण कारकिर्दीत रुग्णसेवेला प्राधान्य देत कित्येक रुग्णांचे आर्शिवाद मिळविले आहेत अनेक अडल्या-नडल्यांना मदत करत नेहमीच जनसेवेचे काम केले आहे ..आपल्या शासकीय सेवेसोबतच उभयंताची संपूर्ण हयात ही हिंगोली नाका..खुशालसिंह नगर…मित्र नगर…सलिम किराणा या परिसरातील अनेक रुग्णांसाठी ते दैवत होते व आहेत ग्रामीण तसेच शहरी विशेषतः या भागातील कष्टकऱ्यांचे ते खऱ्या अर्थाने कैवारी ठरले हे त्यांच्या जनसंपर्क व रुग्णांच्या प्रतिक्रीयातून सहजपणे अधोरेखित करता येते ….
डॉक्टर साहेबांच्या आई-वडीलांनी या भागातील जवळपास सर्वच घरा-घरातील रुग्णाला संपूर्ण हयातीत एकदा तरी तपासले आहे… व त्यांवर उपचार केले आहेत त्यामुळे त्यांच्या सर्व सामान्य जनतेतील सपंर्काला तोड नाही … पुढे याच जडण-घडणीत जन्मलेले … वाढलेले …. डॉ. निलेश बास्टेवाड हे अगदी जन्मजातंच परोपकारी वृत्तीचे असल्यामुळे ….. त्यांनी याच प्रेरणेतून आणि विचारांतून रेणुकाई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ची मूहूर्तमेढ ही याच परिसरांत रोवली त्यामागेही सामाजिक बांधिलकी हीच मुख्य भावना होती व आहे …..
जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान व सेवा उपलब्ध ..
आजच्या घडीला नांदेडातील एक अद्यायावत आणि अत्याधुनिक सोयींसह रेणुकाई हॉस्पिटल हे नांदेडकरांच्या सेवेत असलेलं एक महत्वपूर्ण हॉस्पिटल्स् म्हणून सुपरिचित असून आजमितीला या ठिकाणी रेणुकाई मल्टिस्पेशालिटीच्या माध्यमातून शहरातील विविध शाखेतील तज्ञांचा सहभाग व शहरातील विविध विषयातील तज्ञ ज्यात एम.डी. मेडीसीन,स्त्रिरोग तज्ञ,ऑर्थोपेडीक सर्जन,ह्दयरोग तज्ञ, युरॉलॉजी तज्ञ, जनरल सर्जरी व कर्करोग सर्जरी तज्ञ , मानसपोचार तज्ञ, न्युरॉलॉजी व न्युरोसर्जरी तज्ञ,दंतरोग तज्ञ, कान,नाक, घसा तज्ञ, त्वचा रोग तज्ञ, पॅथॉलॉजी तज्ञ, रेडीओलॉजी तज्ञ यांच्या सहभागासह अतिगंभीर रुग्ण विभागात ह्दयविकार,श्वसनाचे विकार, विषबाधा, सर्पदंश, मेंदुचे विकार, प्रसूति व स्त्रीरोग चिकित्सा तसेच अपघातामुळे संभावणाऱ्या गंभीर शस्त्रक्रिया आदींवर तत्परतेने उपचार करण्यासाठी लागणारे अत्याधुनिक उपकरणे उदा. सेंट्रल ऑक्सीजन,सेंट्रल संक्शन, ॲडव्हान्स मॉनिटर्स, मल्टीपॅरा मॉनिटर्स, कार्डीॲक मॉनिटर्स, नॉन इन्व्हॉसीव व्हेंटीलेटर्स,ड्रॅगर व्हेंटीलेटर्स, सी.आर्म, टू-डी ईको, टिमटी मशिन, मायक्रोस्कोप आदी सोयी उपलब्ध आहेत
त्यासोबतच ह्दयविकार, श्वसनविकार, अस्थिविकार, ॲक्सीडेंन्टल केअर , २४ तास तत्पर सेवा, २८ बेडचा आयसीयु,अतिगंभीर प्रसुती विभाग, अद्यायावत अपघात विभाग आदीसोबत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तरी जास्तीत जास्त रुग्णांनी वाजवी दरात उपलब्ध सुविंधाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. निलेश बास्टेवाड व त्यांच्या चमूने केले आहे . याठिकाणी आता परिपूर्ण अशी कॅथलॅब ज्यात करोनरी ॲन्जिओग्राफी व ॲन्जीओप्लास्टी सोबतच ॲन्जीओग्राफी-कॅरोटिड,, रिनल व पेरीफेरल तसेच बलून मास्टर व्हाल्वोटॉमी या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत ..
अदयायावत कोरोनरी अॅन्जिओग्राफी ….
कोरोनरी अॅन्जिओग्राफी ही हृदयविकाराच्या आजाराचे निदान करणारी सर्वोत्तम तपासणी आहे. पुढील सर्व उपाययोजना आणि उपाययोजनेला हृदयाचा प्रतिसाद या एका तपासणीने सहजपणे कळतो. हदयविकाराच्या आजाराचे निदान करण्यासाठी बऱ्याच तपासण्या उपलब्ध असून त्यात १०० टक्के निदान करणारी आणि पुढील उपचाराची दिशा ठरवणारी एकमेव तपासणी आहे..
…. अनेक अवघड शस्त्रक्रीया यशस्वीपणे पूर्ण …!
“मूत्राशयातील खडा काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न.”
महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया रेणुकाई हॉस्पिटलचे तज्ञ डॉ. सुनील पालवे (किडनी व मूत्ररोगतज्ञ) यांनी यशस्वीरित्या पार पाडून रुग्णाला व्याधीमुक्त करत जिवनदान दिलं आहे त्यांनी सदरील रुग्णांच्या असह्य वेदना पाहून तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागेल असा सल्ला रुग्णाला दिला व मूत्राशयात तयार झालेला खडा ७० एमएम (७ सेमी ) तसेच 250 ग्राम वजनाच्या खडयाचे यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करून मोठी कामगिरी पार पाडली आहे सदरील शस्त्रक्रिया आपण यशस्वी रित्या करू अशा प्रकारे रुग्णाच्या नातेवाईकांना हमी देऊन त्यांनी शस्त्रक्रियेला सुरूवात केली व यशस्वीरित्या शस्त्रक्रीया पार पाडली .
डॉ. सुनील पालवे MBBS, Ms यांनी हैद्राबाद या ठिकाणी MCH Urology हे शिक्षण पूर्ण करून नांदेड या ठिकाणी अशा प्रकारची कठीण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल रेणुकाई हॉस्पिटल्स् चे संचालक डॉ. निलेशजी बास्टेवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले. या शस्त्रक्रिये दरम्यान डॉ. राहुल थोरात MD Anethesia यांनी भूलतज्ञ म्हणून महत्वपूर्ण भूमिका पार पाडली ..
नांदेडातील सर्वात मोठे डायलिसिस युनिट ..तसेच कर्करोग निदान व उपचार ..
रेणुकाई मल्टिस्पेशालिटी येथे आजच्या घडीला नांदेडातील सर्वात मोठे डायलिसिस युनिट कार्यरत असून नांदेड सह परिसरातील सर्व तालुके व शेजारील जिल्हयांतील जवळपास एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण हे शासनाच्या आरोग्य योजने अंतर्गत उपलब्ध डायलिसिस युनिटचा लाभ घेतात ..तसेच या ठिकाणी कर्करोगाचे निदान व उपचार या सोयी डॉ. माधव फोले यांच्या माध्यमातून उपलब्ध आहेत आणि कर्करोगाच्या अनेक रुग्णांवर या ठिकाणी यशस्वी उपचार केले आहेत ..
शासना मार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व योजना उपलब्ध ..
आजच्या घडीला वैदयकीय क्षेत्रात अमूलाग्र बदल होतांना दिसून येत असतात त्याला अनुसरत आपल्या नांदेडात आम्ही आमच्या रेणुकाई हॉस्पिटल्स् येथे शासनाच्या वतीने रुग्णांसाठी राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले, प्रधानमंत्री आरोग्य योजना , कर्मचारी राज्य बीमा निगम या योजने अंतर्गत उपचार सेवा उपलब्ध आहेत तसेच रुग्णसेवेसाठी रेणुकाई हॉस्पिटल्स् हे कायम कटीबद्ध असेल अशी ग्वाही संचालक डॉ.निलेश बास्टेवाड देतात…
डॉ. निलेश बास्टेवाड ,
संचालक , रेणुकाई क्रिटीकल केअर व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ,
बाफना रोड,एलआयसी ऑफीसच्या मागे, महाराणा प्रताप चौकाजवळ, हिंगोली नाका , नांदेड
संपर्क ०२४६२- २२१६६६ व २२२६६६ ..