March 9, 2021
उत्तमाचा ध्यास – ‘जीव्हीसी ग्रुप’—- श्री गंगाप्रसाद तोष्णीवाल…!

उत्तमाचा ध्यास – ‘जीव्हीसी ग्रुप’—- श्री गंगाप्रसाद तोष्णीवाल…!

सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुल सत्यात उतरविण्यासाठी सतत कार्यमग्न असलेले उद्योजक म्हणून नांदेड आणि परिसरात गंगाप्रसाद तोष्णीवाल यांचे नाव आहे. कायदा व नियमांचे काटेकोर पालन करुन दर्जेदार गुणवत्ता देणारा ग्रुप म्हणून त्यांच्या ‘जीव्हीसी’ ग्रुपची ओळख आहे. ‘उषा रेसिडेन्सी’ या प्रकल्पापासून सुरुवात करुन ‘सप्तगिरी ग्रीन’, ‘सप्तगिरी प्लाझा’ ‘रामबाग’ हे प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्याचबरोबर ७१ बंगले आणि रो हाऊसचा ‘शगुन सिटी’चा मोठा प्रकल्पही पूर्णत्वाकडे गेला आहे आता त्यात पुढे जात शगुन सिटी फेज ३ हा प्रोजक्ट ला सुरूवात करण्यात येऊन या ठिकाणी २६ रो-हाऊस पूर्णत्वास गेले आहेत तसेच ‘गंगाधाम’ हा १२५ प्लॉटचा प्रकल्प आणि ‘शगुन स्क्वेअर’ प्रकल्प सुरु करण्यात आला असून भविष्यात नांदेडकरांसाठी ‘टाऊन सिटी’चा भव्य आणि दिव्य प्रकल्प उभारण्याचा मानस आहे. त्याचबरोबर पुणे येथेही त्यांनी श्रीगणेशा केला असून त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

अशी झाली सुरुवात

श्री. गंगाप्रसाद यांचे वडील रामेश्वर तोष्णीवाल यांचा पूर्वी पशुखाद्याचा व्यवसाय होता. तो श्री. गंगाप्रसाद  व त्यांचे लहान बंधू श्री दुर्गापसाद यांनी २०११ पर्यंत सांभाळत त्यानंतर ‘जीव्हीसी’ ग्रुप नावाने मोबाईलचा व्यवसाय सुरु केला. पशुखाद्यापासून सुरू झालेला त्यांचा व्यापार कालांतराने बी – बियाणे, सेलफोनचे वितरक आदी विविध क्षेत्रांत वृद्धिंगत होत गेला. नांदेडमध्ये भक्कम विश्वासाचे प्रतीक म्हणून ‘जीव्हीसी’ ग्रुपची ख्याती झाली. हे करत असतानाच त्यांचे मन बांधकाम व्यावसायाकडे वळले आणि त्यांनी सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
आजतागायत आपल्या विभिन्न व्यवसायांच्या माध्यमातून ग्राहकांशी नाते जोडताना पारदर्शकता, प्रामाणिकपणा, विनम्र सेवा याचबरोबर रास्त किंमत आदी बाबी केंद्रस्थानी ठेवून ग्राहकांचं समाधान हेच आपलं खरं यश, अशी भावना जोपासत त्यांनी २०११ मध्ये बांधकाम क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ग्रुपचे संचालक गंगाप्रसाद तोष्णीवाल व दुर्गाप्रसाद तोष्णीवाल हे नांदेडसह हिंगोली जिल्ह्यातील महिको, नुजीविडू अशा अनेक नामांकित कंपन्यांचे एक प्रतिष्ठित वितरक म्हणून कार्यरत होते.

शासकीय नियमांचे काटेकोर पालन


काहीतरी नवीन करायचे, या विचाराने प्रेरित होऊन श्री. तोष्णीवाल यांनी नांदेडच्या मध्यवस्तीत चिखलवाडी भागात ‘उषा रेसिडेन्सी’ या नावाने २०११ मध्ये प्रकल्पाचा श्रीगणेशा केला. त्याचबरोबर ‘सप्तगिरी ग्रीन’ हा प्रोजेक्टही लगेचच सुरु केला. ‘उषा रेसिडेन्सी’ या पहिल्या प्रकल्पात त्यांनी आपला उच्च दर्जा आणि उत्तम नियोजनाची चुणूक दाखवली. प्रकल्पाचा दर्जा, रचना, ग्राहकांच्या आवडी-निवडी, भविष्यातील सुरक्षा व्यवस्था याबरोबरच किफायतशीर किंमतीत ग्राहकांना सदनिका उपलब्ध करून दिल्या. इतकेच नव्हे, तर हे करत असताना सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून, नांदेड महापालिकेचे प्रकल्प पूर्णत्व प्रमाणपत्र (पूर्णत्वाचा दाखला) देखील प्राप्त केले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, तत्कालीन आयुक्त जी. श्रीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत उषा रेसिडेन्सीच्या सर्व सदनिकाधारकांसाठी ‘चावी प्रदान’ समारंभ आयोजित केला. या प्रसंगी नांदेडमधील एक अतिशय दर्जेदार निवासी प्रकल्प म्हणून कौतुकाची थाप ग्रुपने मिळवली.

नवीन प्रकल्पांनाही प्रतिसाद


सदर प्रकल्पानंतर त्यांनी हाती घेतलेल्या ‘सप्तगिरी ग्रीन्स’ या प्रकल्पाला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला. त्यांनी आणखी जोमाने काम करत कौठा परिसरात ‘रामबाग रेसिडेन्सी’ हा निवासी व ‘सप्तगिरी प्लाझा’ हा व्यावसायिक प्रकल्प उभारला. ग्रुपने प्रस्तावित सोयी – सुविधांपेक्षा ग्राहकांना नेहमीच अधिक व काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न केला. पुणे, मुंबईच्या तोडीचे, नियोजनबद्ध व सुविधा संपन्न प्रकल्प नांदेडकरांना देण्याचा त्यांचा मानस आहे. नजीकच्या भविष्यकाळात असेच आणखी दर्जेदार, जीवनशैली उंचावणारे प्रकल्प साकारण्याबरोबरच नाविन्यपूर्ण रो हाऊसेस् व आलिशान बंगलो स्कीमचे महत्वाकांक्षी प्रकल्प देखील त्यांनी सुरु केले आहेत. त्यामध्ये ‘शगुन सिटी’ आणि ‘गंगाधाम’ यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार देखील वाढविण्यास सुरुवात केली असून पुण्यामध्ये व्यावसायिक संकुल उभारण्यास सुरुवात केली आहे.
‘जीव्हीसी’ ग्रुपने घेतलेल्या या उंच भरारीत संचालक गंगाप्रसाद तोष्णीवाल यांच्यासह त्यांचे भाऊ दुर्गाप्रसाद, मुलगा नितेश यांच्यासह कंपनीतील प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या विविध कामांच्या माध्यमातून जोडले गेलेल्या हजाराहून अधिक व्यक्तींचा सहभाग आहे. त्यांच्या या कामामुळे आज हजारो जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

‘जीव्हीसी’ ग्रुपने उभारलेले प्रकल्प…


१) उषा रेसीडेन्सी – चिखलवाडी – २८ फ्लॅट – २०११
२) सप्तगिरी ग्रीन – कौठा – ४० फ्लॅट – २०११
३) सप्तगिरी प्लाझा – कौठा – ३९ शॉप – २०१४
४) रामबाग – कौठा – ३२ फ्लॅट
५) शगुन सिटी – कौठा – ७१ बंगलो, रो – २६ हाऊस – २०१७
६) गंगाधाम – असर्जन – १२५ प्लॉट – २०१८
७) शगुन स्क्वेअर – मालेगाव रोड, तरोडा – १३ शाॅप, आठ फ्लॅट – २०१८
८) आयबीबी – स्वारगेटजवळ, पुणे – २५ आॅफिस – २०१८

९)  कॅसा ॲब्रिगो” – पुणे ९२ फ्लॅटस्

‘जीव्हीसी’ ग्रुप लोकप्रिय झाला कारण…


– प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरसुद्धा ग्राहकांच्या समस्यांकडे लक्ष
– उच्च दर्जा राखण्यासोबतच वाजवी दर
– शासकीय नियमांचे आणि कायद्याचे काटेकोरपणे पालन
– प्रत्येक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचा पूर्णत्वाचा दाखला
– ग्राहकांचे हित जपणारी गृहप्रकल्पांची दर्जेदार शृंखला

विविध पदे आणि पुरस्कार

– ‘क्रेडाई’ संस्थेच्या नांदेड शाखेचे विद्यमान अध्यक्ष
– एशियन पेन्टसतर्फे सलग तीन वर्षे वार्षिक कॅलेंडरमध्ये प्रोजेक्टच्या छायाचित्राचा समावेश
– माहेश्वरी युवा संघटनचे संस्थापक अध्यक्ष, सिड्स ॲण्ड पेस्टीसाईट ॲण्ड फर्टिलायझर डिलर असोसिएशनचे सचिव, लॉयन्स कल्ब, नांदेड मिडटाऊन क्लब, लॉयन्स आय हॉस्पीटलचे विश्वस्थ, नांदेड माहेश्वरी प्रगती मंडळ (माहेश्वरी भवन), मारवाडी धर्मशाळेचे कार्यकारिणी सदस्य.
– खेल महोत्सव, मॉर्निंग वॉक, लाॅयन्स क्लबतर्फे आयोजित जयपूर फुट कॅम्प, भागवत कथा, सालासर भजन मंडळासह विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभाग.

नांदेडातील नावाजलेला जिव्हीसी ग्रुप आता पुण्यात !

आता आपल्या “जिव्हीसी” ग्रुपने नांदेड शहराच्या बाहेर पाऊल ठेवतांना धर्माबाद येथे शगुन पार्क नावाचा दर्जेदार प्रकल्प पुर्णत्वास नेला तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात पाऊल टाकत स्वारगेट परिसरात “आयबीबी” हे व्यावसायिक संकूल उभे करत पुण्यात यशस्वी मूहर्तमेढ रोवली .. आणि तदनंतर आता “जिव्हीसी” ने “कॅसा ॲब्रिगो“…या नवीन गृहप्रकल्पासह पुणे शहराच्या अगदी मध्यवस्तीत आल्हाददायी टू-बिचके प्रकल्पासह आपल्या सेवेत तत्पर आहे ..

“कॅसा ॲब्रिगो” प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये आपल्यासाठी ….!

  • कॅसा ॲब्रिगो” – पुणे शहराच्या अगदी मध्यभागी हडपसर येथे ॲमोनोरा पार्क च्या मागे प्रकल्प कार्यान्वित
  • पुणे रेल्वेस्टेशन-बसस्टँन्ड-शासकीय कार्यालये-हॉस्पिटल्स-मार्केट हे सर्वच फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर..
  • आल्हाददायक वातावरण…वाजवी दर…..सर्व शासकिय मापदंडानुसार निर्गमित …
  • आजची गुंतवणूक …..उद्याचे नियोजन….त्वरा करा ..आजच आपला फ्लॅट बुक करा…

आपला स्नेहाकिंत ,

गंगाप्रसाद तोष्णीवाल , अध्यक्ष ,

जिव्हिसी ग्रुप , नांदेड-पुणे-महाराष्ट्र !

 

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot