March 9, 2021
सत्व फूडस् – मार्क ऑफ प्युअरीटी ..!

सत्व फूडस् – मार्क ऑफ प्युअरीटी ..!

नांदेड – प्रतिनिधी

नांदेडातील भाग्यनगर कमान परिसरात … एका धडपड्या युवा उद्योजकांची जोडी सत्व फूडस् च्या आऊटलेट मध्ये बघायला मिळते … त्यातील श्री ऋत्वीज दिपक शंकरवार .. फार फार तर पंचवीशीतला तरूण .. मुंबई आयआयटी येथून सिव्हील इंजिनिअरींग सारख्या क्षेत्रात नुकताच बि. टेक. झालेला .. नौकरी च्या मागे न लागता आपले मामा श्री विपुल किशनराव सुदेवाड यांना सोबत घेऊन या नवीन क्षेत्रात उतरला .. मग त्यात स्वतः उत्पादनं सुरू करायचे म्हटले तर मेहनत आलीच .. प्रचंड कष्टानंतर मामा-भांजे जोडीची मेहनत फळाला आली व त्यातून  सत्व फूडस् – मार्क ऑफ प्युअरीटी ..या नवीन ऑरगॅनिक ब्रँडचा श्री गणेशा झाला .. आजरोजी नांदेडातील मध्यवस्तीत भाग्यनगर कमान येथे स्वतःचे आऊटलेट व मॅन्युफॅक्चरींग असलेला ब्रँड सत्व फूडस् नांदेडकरांच्या पसंतीस उतरतो आहे .. दोन्ही धडपड्या युवकांशी चर्चा करतांना एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे या क्षेत्रात त्यांनी मिळविलेलं ज्ञान व त्यांचा उत्पादना बद्दलचा सखोल अभ्यास .आजरोजी सत्व फूडस् येथे लाकडी घाण्यापासून बनविलेले शेंगदाणा तेल, करडई तेल, खोबरेल तेल,सूर्यफूल तेल, तिळाचे तेल, सरसो चे तेल, बदामाचे तेल, जवसाचे तेल, आक्रोडचे तेल, तसेच सेंद्रीय हळद, हातसडीचे तांदूळ, सेंद्रीय डाळी, काळे गहू, खपली गहू, काळे तांदूळ, तसेच केमिकल विरहीत रुम फ्रेशनर डिशवॉश,हँड वॉश, फ्लोअर क्लिनर,टॉयलेट क्लिनर तसेच हँडमेड साबूण व सर्व प्रकारचे मसाले आणि विविध प्रकारचे सेंद्रीय उत्पादने उपलब्ध आहेत त्यांनी त्यांचे मुख्य उत्पादना विषयी मांडलेलं विश्‍लेषण असे की ..

घाणावरील तेल आणि रिफायन तेल यांचे फायदे तोटे?

आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी वात, पित्त आणि कफ हे तीन दोष संतुलित ठेवणे गरजेचे आहे. ज्याचं वात, पित्त, कफ, मन, बुद्धी आणि कर्म हे संतुलित तोच खरा निरोगी. बहुतांश आजार हा समतोल बिघडल्यामुळे होतो. ते टाळण्यासाठी शरीरातील वात दोष संतुलित ठेवणारे पदार्थ सेवन करावेत. हे संतुलन सांभाळणारे घटक म्हणजे… देशी गाईचे शुद्ध तूप आणि लाकडी घाण्याचे शुद्ध तेल.

यातील देशी गाईचे तूप आपल्याला माहित आहे. मात्र लाकडी घाण्याचे शुद्ध तेल म्हणजे काय? आपण सर्रास वापरत असलेले रिफाईंड तेल म्हणजे काय? ते कसे तयार हाते? आणि रिफाईंड तेलाचे नेमके धोके कोणते? याविषयी जाणून घेवूया…

लाकडी घाण्याचे शुद्ध तेल..

घाण्याचे शुद्ध तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते. शुद्ध तेलाचा सुगंध येतो कारण त्यात ४ ते ५ प्रकारचे प्रोटिन्स असतात, तो सुगंध त्या प्रोटीन्सचाच असतो. शुद्ध तेलाचा चिकटपणा खूप असतो. कारण त्यामध्ये आपल्या शरिराला आवश्यक असणारे फॅटी अॅसिड असतात, व्हिटॅमिन ई आणि मिनरल्स सुद्धा असतात. लाकडी घाण्यावरचे तेल सर्वोत्तम असते, कारण हे तेल काढताना लाकडी घाणा असल्यामुळे तेल बियांवर जास्त दाब दिला जात नाही. शिवाय हा घाणा 1 मिनिटात फक्त 14 वेळाच फिरतो. थोडक्यात लाकडी घाण्याचा आर.पी.एम. 14 असतो. त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल काढताना एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही.

शरिराला अत्यंत आवश्यक असलेला घटक हायडेन्सिटी लीपोप्रोटीन (कऊङ) हा आपल्या लिव्हरमध्ये तयार होतो, मात्र तो शुद्ध तेल खाण्यामुळे तयार होतो. म्हणूनच आहारात शुद्ध तेल अवश्य असावे. शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो आणि त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाहीत. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबेटीस, सांधेदुखी, पॅरालिलिस, ब्रेन डॅमेज, उच्च रक्तदाब सारख्या गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी आहे.

भारतात शेकडो वर्षांपासून लाकडी घाण्याचे तेल आहारात असल्याने आपले पूर्वज दिर्घायुषी होते. १००  वर्षाच्या व्यक्तीला सुदधा गंभीर आजार नव्हते. लाकडी घाण्यावर तेल तयार करताना तेलाचे तापमान ४० ते ४५ अंशा पेक्षा जास्त नसते, त्यामुळे तेलातील कोणताही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही. हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात. त्यामुळे शुद्ध तेल खावे.

तसंच एक मोठा गैरसमज आपल्या सगळ्यामध्ये आहे की, शेंगदाण्याच्या तेलामुळे कोलेस्ट्रॉल वाढते, हे चुकीचे आहे. उलट शेंगदाण्याच्या तेलामुळे एच.डी.एल. (कऊङ) वाढते आणि ते आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असते.

रिफाईंड तेलाचे दुष्पपरिणाम…

अनेक प्रकारचे घातक केमिकल्स वापरल्याशिवाय तेल रिफाईंड होतच नाही, सिंगल रिफाईंडसाठी ६ ते ७  प्रकारचे केमिकल्स वापरले जातात. उदा. गॅसोलिन, सिंथेटिक अँटी ऑक्सीडंटस्, हेक्सेन इ. रिफाईंड तेलाचा वास येत नाही, कारण त्यात एकही प्रकारचे प्रोटीन शिल्लक राहत नाही.रिफाईंड तेलाला चिकटपणा नसतो, कारण त्यातले फॅटी अ‍ॅसिड आधीच बाहेर काढले जातात. तसंच रिफाईंड तेलामध्ये व्हिटामिन ‘ई’ आणि मिनरल्सही नसतात. रिफाईंड तेल आपल्या आरोग्यास सर्वात जास्त हानीकारक असते, कारण त्यात वापरले जाणारे केमिकल्स मानवाच्या शरीरातील अवयवांना निकामी करतात. रिफाईंड तेलामुळे आपल्या शरीरातील आवश्यक असणारं एकही घटक नसतो. उलट केमिकल पासून बनवलेले हे तेल एक प्रकारे विष समान आहे. रिफाईंड तेलामुळे आपल्या शरीराला घातक असलेला घटक तयार होतो. त्याला एल.डी.एल. असे म्हणतात. ज्यामुळे ब्लॉकेजस् तयार होतात आणि त्यामुळेच आपल्याला हार्ट अटॅक सारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते.

रिफाईंड तेल खाल्ल्याने वात विकार असंतुलित राहतात. गंभीर आजार उद्धभवतात….

रिफाईंड तेलाची निर्मिती भारतात ३०  वर्षापूर्वी झाली आणि जाहिरातींच्या माध्यमातून याचा प्रसार संपूर्ण भारतात झाला आणि आज सगळे हेच रिफाईंड तेल खातोय, ज्याचा परिणाम म्हणजे घराघरात आज लोकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागतोय. खरं तर तेलाला रिफाईंड करताना सुरूवातीला ३०० डिग्री सेल्सिअस आणि दुसर्‍यांना ४५०  डिग्री सेल्सिअस इतक्या उच्च तापमानावर उकळले जाते. तेल एकदा उकळले तर ते पुन्हा खाण्यास योग्य राहत नाही. डबल रिफाईंड आणि ट्रिपल रिफाईंड करताना तर हे तेल दोनदा आणि तीनदा उकळल्याने त्यात काही विषारी घटक समाविष्ट होतात.रिफाईंड तेल तयार करण्यासाठी पाम तेलाचा सर्वात जास्त वापर केला जातो. पाम तेलामध्ये आणि डालडामध्ये जनावरांच्या चरबीचा वापर केला जातो. जे शरीराला अत्यंत घातक आहे.

त्यामुळे आता आपल्या आहार सवयींचा फेरविचार करण्याची हीच वेळ आहे. आरोग्यदायी दिर्घायुष्य पूर्वजांनी दिलेल्या लाकडी घाण्याच्या तेलाचा वापर करूया आणि नवे आरोग्यदारी समतोल जीवनाचा अंगिकार करूया.

आजारांपासून बचाव करण्यासाठी सेंद्रिय पदार्थ फायदेशीर

 • सेंद्रिय पदार्थांचे उत्पादन घेताना कोणत्याही केमिकल्सचा वापर करण्यात येत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये पोषक तत्वं ही इतर पदार्थांच्या तुलनेनं अधिक असतात. त्यामुळे त्यांच्या सेवनानं रक्तदाबशी निगडीत समस्या, मायग्रेन, मधुमेह आणि कॅन्सर यांसारख्या आजारांपासून बचाव होतो. तसेच यांचे सेवन केल्यानं शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या पदार्थांमध्ये चरबीचे प्रमाणही फार कमी असतं. याव्यतिरीक्त दररोज सेंद्रिय पदार्थांचं सेवन केल्यानं त्वचेच्या समस्या दूर होतात आणि त्वचा तजेलदार होते.
 • आजकाल लोकांमध्ये प्रतिजैविक प्रतिकार वाढत आहे. यासाठी आवश्यक नसतानाही प्रतिजैविक घेण्याव्यतिरिक्तचे कारण म्हणजे आपण खाल्लेल्या गोष्टींचा वापर बिघडण्यापासून वाचवण्यासाठी त्यांना प्रतिजैविक दिला जातो. जेव्हा आपण अशा गोष्टी खातो तेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. सेंद्रिय पदार्थांमुळे आपण हा तोटा टाळतो.
 • सेंद्रीय पदार्थातून 40 टक्के जास्त ‘‘अ‍ॅन्टीऑक्सिडन्टस्’’ मिळतात. त्यामुळे ह्रदयविकार किंवा कर्करोग आदी रोगांपासून बचाव होऊ शकतो.
 • सेंद्रीयपदार्थाच्या सेवनामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होवू शकते.
 • सेंद्रीयशेतीमुळे पर्यावरणाचे रक्षण होते तसेच प्रदूषणालाही आळा बसतो. मातीचे संरक्षण होऊन पाणी मुरण्याची क्षमता वाढते.
 • नैसर्गिक खतांच्या वापरामुळे पदार्थाची मूळ चव, रंग, स्वाद टिकून राहतात.
 • सेंद्रीय उत्पादने वाढवल्याने व्यापारार्थ वाढविण्यात येणाऱ्या प्राण्यांची प्रजोत्पादन क्षमता वाढते.

ट्रेडींग किंवा उत्पादनांच्या अधिक माहीतीसाठी संपर्क –

 • पत्ता –
 • सत्व फूडस् – मार्क ऑफ प्युअरीटी ..
 • भाग्यनगर कमानी जवळ , भाग्यनगर , नांदेड ४३१६०५
 • संपर्क – ७७७७९९३९९१, ८८०६४२०४२०

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot