नांदेड – प्रतिनिधी
येथील रेणुकाई हॉस्पिटल्स् चा महाराष्ट्र शासनाच्या वतीने टॉप परफॉर्मिंग हॉस्पिटल म्हणून प्रजासत्ताक दिना दिवशी पालकमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला ..
रेणुकाई हॉस्पिटल्स् ने कोरोना संक्रमण काळात केलेल्या अभूतपूर्व कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असून रेणुकाई मल्टिस्पेशालिटीने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेत केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेत राज्य शासनाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला .. यावेळी रेणुकाई हॉस्पिटल्स् चे संचालक डॉ. निलेश बास्टेवाड यांनी सदरील पुरस्कार स्विकारला ..
या विशेष गौरवाबद्दल प्रतिक्रीया देतांना डॉ. निलेश बास्टेवाड म्हणाले की आजच्या घडीला वैदयकीय क्षेत्रात अमूलाग्र बदल होतांना दिसून येत असतात त्याला अनुसरत आपल्या नांदेडात आम्ही आमच्या रेणुकाई हॉस्पिटल्स् येथे शासनाच्या वतीने रुग्णांसाठी राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले, प्रधानमंत्री आरोग्य योजना , कर्मचारी राज्य बीमा निगम या योजने अंतर्गत उपचार सेवा उपलब्ध केल्या आहेत तसेच यापुढेही उत्तम रुग्णसेवेसाठी रेणुकाई हॉस्पिटल्स् हे कायम कटीबद्ध असेल असे त्यांनी सांगितले ..
