महिलांसाठी तज्ञ महिला डॉक्टरांची उपस्थिती….उपचारातही मिळणार भरघोस सूट
नांदेड – प्रतिनिधी
नांदेडातील आयुष हॉस्पिटल्स् च्या वतीने ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुळव्याध, भगंदर, फिशर, बद्धकोष्टता आणि मुतखडा मोफत तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन आयुष हॉस्पिटल्स्, दुसरा मजला, सेंटर पाँईट, शिवाजीनगर, दादऱ्या जवळ , नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे
मुळव्याधा सारख्या आजाराच्या रुग्णांसाठी या शिबीरात तज्ञ डॉक्टरांच्या वतीने पूर्णपणे मोफत तपासणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे महिलांच्या तपासणीसाठी तज्ञ महिला डॉक्टरांची देखील उपस्थिती राहणार आहे. या शिबिरामध्ये तपासणी केलेल्या रुग्णांना उपचारातही मोठी सूट देण्यात येणार असल्याची माहिती मुळव्याध तज्ञ डॉ. राजेश पंडीत यांनी दिली. आयुष हॉस्पिटल्स्, दुसरा मजला, सेंटर पाँईट, शिवाजीनगर, दादऱ्या जवळ , नांदेड येथे होणार आहे
तपासणी न केल्यामुळे मुळव्याध हा आजार वाढतच जातो. त्यामुळे मुळव्याध-भगंदर-फिशरचे लक्षणे आढळून आल्यास तत्काळ तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घणे गरजेचे आहे. अनेक रुग्ण पैसे नसल्याने तपासणी करत नाही. त्यांच्यासाठी आणि इतर सर्वांसाठीच आयुष हॉस्पिटल च्या वतीने मुळव्याध- भगंदर-फिशरची मोफत तपासणीसाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून तज्ञ डॉक्टरांच्या वतीने तपासण्या करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महिलांच्या तपासणीसाठी तज्ञ महिला डॉक्टरांची देखील उपस्थिती राहणार आहे. या शिबीरातील रुग्णांना उपचारामध्ये सवलतही देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राजेश पंडीत (मुळव्याध व भगंदर तज्ञ) यांनी दिली.
मुळव्याध-भगंदर-फिशर याचे लक्षणे मलप्रवृत्तीच्या वेळेस किंवा नंतर रक्त पडणे, शौच्याच्या जागेवर आजुबाजुला गाठ येणे, त्यामधून चिकट स्त्रव व रक्त येणे, शौचाच्या जागी आग होणे, वेदणा होणे, टोचल्यासारखे वाटणे, शौचाच्या वेळेस मांसल गोल आकराचा भाग बाहेर येणे इत्यादी लक्षणे असल्यास त्याची तत्काळ तपासणी करुन त्यावर निदान करता येते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा आजार बळावतो. त्यासाठी तपाणी करुन घेणे अत्यंत महत्वाचे आहे. या हॉस्पिटलमध्ये गुदगत आजारांसाठी क्षारसुत्र, क्षारकर्म, आग्रिकर्म सुरक्षित आयुर्वेदिक उपचार पध्दती उपलब्ध आहेत. त्यासाठी तज्ञ डॉक्टर येथे उपलब्ध आहेत.
या शिबीरामध्ये फोनवरही नाव नोंदणी करण्याची सुविध्दा उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी गरजू रुग्णांनी ९४२२९०९०००,९६३७४६५०६५,७२७६४७०७३८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपले नाव नोंदवू शकता. असे अवाहन मुळव्याध तज्ञ डॉ. राजेश पंडीत यांनी केले आहे. या शिबिराचा लाभ घेतला तर असाह्य मुळव्याधापासून आपली नक्कीच सुटका होणार असल्याचेही डॉ. राजेश पंडीत म्हणाले आहेत.या मोफत मुळव्याध तपासणी शिबीर महिलांसाठी तज्ञ महिला डॉक्टरांची उपस्थिती असणार आहे तसेच याच शिबीरात मुतखडयाची ही तपासणी करण्यात येणार असून वैद्यकीय ज्ञान व अद्ययावत तंत्रज्ञानामुळे मुतखड्याच्या शस्त्रक्रियांची उपचारपद्धती अत्यंत सोपी झाली आहे अशी माहीती डॉ. राजेश पंडीत यांनी दिल तसेच शिबीराचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे …