नांदेड – प्रतिनिधी
येथील नवजिवन पेन मॅनेजमेंट , बोरबन यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्या साधून नवजिवन पेन मॅनेजमेंट सेंटर , बोरबन येथे २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ अशा वेळेत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून नांदेडातील तज्ञ – डॉ. कृष्णा शेषराव जगदंबे, MBBS DA FIPM CIPM (Delhi) इंटरव्हेंशनल पेन फिजिशियन हे निदान व उपचार करणार आहेत ..
या शिबीरात पाठदुखी ,मणक्याचे आजार,मणक्याची गादी सरकणे ,छोट्या सांध्यातील दुखणे,सायटिका व माकड हाडाचे दुखणे ,हातापायाला मुंग्या,बधिरपणा येणे,जळजळ होणे,गुडघेदुखी व ईतर सांधेदुखी,फ्रोझन शोल्डर म्हणजेच थिजलेला खांदा,घोट्याचे व टाचेचे दुखणे,कोपराचे दुखणे म्हणजेच टेनिस एल्बो ,मानेचे दुखणे , चेहऱ्यावरचे दुखणे , डोकेदुखी , मायग्रेन,ट्रायजमिनल न्युराल्जिाया,शस्त्रक्रियेनंतरचे कोणतेही दुखणे , ईतर कोणत्याही प्रकारचे दुखणे.. व त्यासोबत मोफत हाडाची ठिसूळता तपासणी आदींचे निदान व उपचार करण्यात येणार आहेत
पेन उपचार पद्धतीचे फायदे हे आहेत की या शास्त्रात कुठल्याही प्रकारची शस्त्रकिया करावी लागत नाही तसेच चिरफाड नाही रक्त वाया जात नाही , भूल देण्याची गरज नाही व मॅनेजमेंट ॲडमिट राहण्याची आवश्यकता नाही तसेच ही अचूक उपचार पद्धती असून वैद्यकशास्त्रात ‘पेन मॅनेजमेंट’ अर्थात ‘प्रभावी वेदनाशमन’ शाखा असून कोणत्याही आजाराच्या दुखण्याचा काही ठराविक कालावधी असतो. त्याहून अधिक काळ दुखणे राहिले तर त्या दुखण्याला दुर्धर स्वरूप तयार होते .. अशा रुग्णांचे दुखणे वेदनाशमनाच्या आधुनिक पद्धतींद्वारे कमी करता येऊ शकते अशी माहीती आयोजक डॉ. कृष्णा जगदंबे यांनी दिली
तसेच शिबीरास येते वेळेस आजारासंबधीचे अगोदरचे तपासणी रिपोर्ट सोबत आणण्याचे त्यांनी आवाहन केले आहे शिबीरासाठी नोंदणी करिता ८२०८५५९११३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे ..