March 9, 2021
रस्ता सुरक्षा अभियान 2021…!!

रस्ता सुरक्षा अभियान 2021…!!

भावपूर्ण श्रद्धांजली …!
                                             असे म्हणतात माणूस आपल्या चुकांपासून शिकतो मात्र अपघात ही अशी घटना आहे जिथे आपली चूक सुधारण्याची कदाचित संधीही मिळू शकत नाही. रस्ते अपघातात आपली पहिली चूक ही शेवटची चूक ठरू शकते. याची अनेक उदाहरणे मी पाहिलेली आहे. तरी आज रस्ता सुरक्षा अभियान 2021 चे औचित्य साधून मी आमच्या विभागातील माझे सहयोगी कै. श्री प्रमोद प्रल्हादराव जोशी यांचे उदाहरण आपल्यासमोर मांडू इच्छितो.
                                             माझी आणि श्री जोशी साहेबांची प्रथम नियुक्ती सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणून 2007  मध्ये जळगाव कार्यालयात झाली. सदा हसतमुख असणारे श्री जोशी साहेब हे एअर फोर्स मधून निवृत्त(Ex service man) असल्यामुळे अतिशय शिस्तप्रिय असे व्यक्तिमत्त्व होते. आपल्याला आयुष्यात प्रत्येक माणसाकडून काहीतरी चांगले शिकायला भेटते. तसेच मला जोशी साहेबांची एक गोष्ट प्रखरतेने आवडायची ती म्हणजे त्यांची वाहन चालवण्याची कौशल्य. कोणतीही वाहन अगदी उत्कृष्ट पणे सर्व वाहतूक नियमांचे पालन करुन चालवणे हे जोशी सरांकडून  शिकण्यासारखे होते. आपल्या चारचाकी वाहनातून त्यांनी आपल्या कुटुंबासह संपूर्ण भारत भ्रमण केले आणि तेही स्वतः वाहन चालवून. सीट बेल्ट हे आपल्या वाहनातील शोभेची वस्तू नाही आहे तर ती वापरायला हवी हे त्यांनी माझ्यासमोर बऱ्याच जणांना शिकवले.
                                               जळगाव नंतर जोशी साहेब यांची नियुक्ती जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली. त्यांचे घर औरंगाबादला होते आणि तिथूनच जीवघेणं अप-डाऊन हा प्रकार सुरू झाला. आज बरेचसे शासकीय अधिकारी, कर्मचारी, तसेच शिक्षक आपल्या राहत्या ठिकाणापासून आपल्या कामाच्या ठिकाणी दररोज येणे जाणे पसंत करतात. आधुनिक जीवनशैली, मुलांचे शिक्षण, आरोग्य सेवा ,सर्व गरजेच्या वस्तूंची सहज उपलब्धता या सर्व गोष्टींमुळे आज अनेक लोक अप-डाऊन करतात. मात्र ते हे विसरतात की आपण दररोज किती भयंकर रिस्क घेतोय . भारतात दर तासाला 17 जणांचा अपघाती मृत्यू होतो. कोण्या एका तासांमध्ये त्या 17 मध्ये आपण तर नसू याची काय खात्री ? जर श्री प्रमोद जोशी यांचा अपघाती मृत्यू होऊ शकतो तर इतर कोणाचाही होऊ शकतो हे माझे ठाम मत आहे.
                                               दिनांक 18/ 3/ 2013 चा तो काळा दिवस. श्री जोशी साहेब आपल्या स्विफ्ट कार ने औरंगाबादहुन जालन्या कडे आपल्या कार्यालयासाठी निघाले. रोजच्या अप-डाऊन सारखाच तोही दिवस होता मात्र त्यादिवशी ते घडले जे कधी ही कोणाच्या आयुष्यात घडू नये. जोशीसाहेब स्वतः वाहन चालवत होते व शेजारी नवनियुक्त सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक बसले होते. घरहून कार्यालयाकडे निघायला थोडासा उशीर झाल्यामुळे वाहनाची गती नेहमीपेक्षा थोडी जास्तच होती. औरंगाबाद जालना हायवे चार पदरी असून मध्ये डिव्हायडर आहे. बदनापूर जवळ ठीक 11.30 वाजता एक क्रुझर वाला अचानक कट डिव्हायडर मधून मृत्यूच्या रूपाने यांच्या समोर आला.
                                              श्री जोशीसाहेब उत्कृष्ट चालक असल्यामुळे त्यांनी क्षणार्धात या गोष्टीला हेरले आणि आपले वाहन पूर्णतः डाव्याबाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे एका बिनडोक चालकाने आपले ट्रक पार्क केले होते. सरांची स्विफ्ट त्या ट्रकच्या पाठीमागे जोरात धडकली. तरी प्रसंगावधान राखून जोशी सरांनी आपल्या वाहनाची डावी बाजू पूर्णता वाचवली ज्यात नवनियुक्त सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक किरकोळ जखमी झाला. मात्र ड्रायव्हर साईड पूर्णता चकनाचूर झाली ज्यात जोशी साहेबांना गंभीर दुखापत झाली. त्यांना पोलिसांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने तात्काळ धूत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मी रुग्णालयात सरांना भेटायला गेलो तेव्हा त्यांची अवस्था पाहून व तेही रस्ते अपघातात मला धक्काच बसला!
                                                            दिवस झपाट्याने पालटायला लागले आणि साहेबांची प्रकृती दिवसेंदिवस खालावू लागली. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेतला मात्र प्रकृतीत काही सुधारला नाही. पाच महिन्यानंतर तर माझी रुग्णालयात जाऊन त्यांना भेटायची देखील हिंमत होत नव्हती. त्यांचे शरीर म्हणजे जणू हाडांचा सापळा झाला होता ,न ते कोणाला ओळखत होते न त्यांना काही कळत होते. शेवटी नऊ महिने मृत्यूशी झुंज देऊन दिनांक 17/ 12 /2013 रोजी श्री जोशी साहेबांना देवाज्ञा झाली. त्या नऊ महिन्याच्या कालावधीत माझा श्री जोशी साहेबांच्या कुटुंबियांशी ,त्यांच्या नातेवाईकांशी खूप जवळचा संपर्क यायचा. त्यांचे दुःख मी खूप जवळून पाहिले. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की अपघात हा फक्त एका व्यक्तीचा होत नाही तर त्यात संपूर्ण कुटुंब, नातेवाईक , त्या व्यक्तीवर अवलंबून असणारे सर्व जण शारीरिक ,मानसिक व आर्थिक दृष्ट्या खचतात.
                                                           अपघाताची कारण मीमांसा अभ्यासली असता असे आढळले की दोन अविचारी चालकाच्या चुकीने एका चांगल्या चालकाचा बळी घेतला. पहिली चूक क्रूजरच्या चालकाने केली ज्याने की हायवेवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांचा विचार न करता आपले वाहन पुढे रेटले. हायवेवर होणाऱ्या मोठ्या प्राणांकीत दुर्घटनामध्ये वाहन चालकांनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे विचार न करणे व लेन डिसिप्लिन न पाळणे हे सर्वात मोठे कारण आहे. दुसरा अविचारी चालक म्हणजे ट्रकचा ज्याने अगदी जिथे डिव्हायडर कट आहे आणि जिथून वाहने वळण घेऊ शकतात अशा जागी आपले वाहन उभे करून ठेवले. अशी चुकीच्या पद्धतीने उभी(पार्क) केलेली वाहने देखील अनेक अपघातासाठी कारणीभूत असून त्यामुळे हजारो लोकांचे बळी गेलेले आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने आपले वाहन पार्क करताना इतर वाहन चालकाचे, वाहतुकीचे सखोल विचार केले पाहिजे. प्रत्येक चालकाने आपण काय केले पाहिजे हा तर विचार जरूर करावाच पण त्यापेक्षाही पुढे जाऊन मी हे सांगेल की प्रत्येक चालकाने इतर वाहन चालक, पादचारी व रस्त्यावरील इतर घटक काय करू शकतात याचा विचार करून बचावात्मक पद्धतीने वाहन चालवले तर अपघाताचे प्रमाण निश्चितच प्रचंड कमी होतील.
                                                   ….., आपण आपले ज्ञानेन्द्रिय सक्रिय ठेवले तर आपल्याला आपल्या सभोवतालातून आणि निसर्गातून बरंच काही शिकायला मिळते. अगदी मुंग्यांचेच उदाहरण घ्या. प्रचंड मोठ्या संख्येत मुंग्या एकापाठोपाठ एक शिस्तीत चालताना दिसतात. पण कधीही 2 मुंग्यांची धडक होत नाही किंवा काही अपघात होत नाही. मग आपलेच अपघात का होते? ….. कारण जी गोष्ट 0.001mg मेंदूच्या मुंगीला कळते ती गोष्ट 1400 gm मेंदूच्या माणसाला कळत नाही ही शोकांतिका आहे.
                                                          शेवटी खेदाने येथे एवढेच नमूद करू वाटते की श्री जोशी साहेबांना  देशाचे  शत्रूपासून संरक्षण करताना आपले प्राण वाचवता आले मात्र रस्ते अपघातात इतरांच्या चुकीमुळे स्वतःचे प्राण वाचवता आले नाही.देशाच्या या वीर पुत्राला मोटर वाहन विभागातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
सचिन स. बंग 
मोटार वाहन निरीक्षक
प्रा. प. कार्यालय लातूर
Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot