#आई- वडिलांचे छत्र हरपलेल्या अत्यंत गरीब नांदेडच्या विशालचा MBBS साठी नंबर.. विशालचे स्वप्न IAS होण्याचे….!
—————————— —————————— ——————-
नांदेड – बातमीदार
#अवघे ३ वर्षाचे वय असतानाच विशाल उत्तमराव कठारे ( रा. तडखेल ता. देगलूर जि. नांदेड) यांची आई वारली… थोड्याच दिवसात वडिलांचेही निधन झाले. दोघा मातापित्यांचे छत्र हरवल्याने व घरची परिस्थिती फारच हलाखीची असल्याने त्याने खूप हालअपेष्टा सहन करत इथपर्यंतचा प्रवास केला.आजी द्रोपदा हनुमंत कठारे (वय ७०) यांनी विशालचा मोलमजुरी करून सांभाळ केला.
विशालच्या डोळ्यात एक स्वप्न होते की, आपल्याला मोठं व्हायचं… त्यासाठी त्यांने प्रचंड मेहनत घेण्याचं ठरवलं. आजीच्या तुटपुंज्या मदतीवर त्यांनं नांदेड गाठलं
दहावीला ९० टक्के गुण घेतले व पुढे बारावीत ७६ टक्के गुण घेऊन त्यानं डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं. परिस्थिती तशी नाजूक होती. नांदेडला फक्त एक वेळेस मेसचे जेवण करून त्यांनं अभ्यास केला. त्याननं धीर सोडला नाही. प्रचंड कष्ट करून अभ्यास केला.याचे फलित म्हणून त्याला नीट परीक्षेत ४१० गुण मिळाले व त्याचा नंबर मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेज (जे जे हॉस्पिटल) येथे MBBS साठी लागला… मात्र MBBS च्या ॲडमिशनसाठी ११००० रुपयांचा DD काढण्याची परिस्थिती नव्हती त्यासाठी नांदेडातील कल्याणकर केमिस्ट्रि चे संचालक डॉ. नागेश कल्याणकर यांनी त्याला त्यासाठी ८००० रुपयांची मदत केली आणि त्याचा एमबीबीएस साठीच्या प्रवेशाच्या मार्ग सुकर झाला .. विशाल साठी मदतीचे आव्हान केले होते त्यात त्यांनी म्हटले होते की… खूप बरे वाटले. अशा विद्यार्थ्यांना समाजाने मदत करण्याची गरज आहे. मीही त्याला यथावकाश मदत करेलच. आता तो भविष्यामध्ये मुंबईत जाणार आहे. निश्चित तो चांगला डॉक्टर होईल, पण त्याचे स्वप्न आहे IAS होण्याचे…त्यासाठी तो प्रयत्न करणार आहे . त्याला मुंबईमध्ये एखाद्या कोणाचं पालकत्व मिळालं तर तो निश्चित पुढे जाईल. पुढे तो ही मागे वळून वंचित,गरीब,होतकरू उपेक्षितांना मदत करेल अशी अपेक्षा आहे.. चला तर मग विशालला ज्याची कोणाची मदत करायची इच्छा असेल तर कृपया त्याला संपर्क करा….!
#विशाल उत्तमराव पठारे
#संपर्क:9156201080
#सामाजिक दायित्व म्हणून होतकरू विद्यार्थ्यांला मदतीचा हात …!
सामाजिक बांधिलकी व नांदेडकरांच्या सेवेत सदैव तत्पर असणाऱ्या सि टी चिट्सच्या वतीने मुंबई येथील जे.जे. हॉस्पिटल येथे एमबीबीएस साठी प्रवेश मिळविलेला होतकरू व गरिब विद्यार्थी श्री विशाल कठारे यास ११ हजार रुपये रोख रक्कम पुढील त्याच्या शिक्षणासाठी मदत म्हणून सिटी चिटस् चे संचालक श्री गोपाल चौहान व श्री विशाल तेहरा , अभिनेत्री माधुरी पवार , दै. उदयाचा मराठवाडा चे श्री मारोती सवंडकर यांच्या हस्ते या प्रसंगी देण्यात आली .. यावेळी यापुढेही सिटी चिटस हे सर्व प्रकारच्या सामाजिक कार्य व दायित्व यासाठी कायम स्वरूपी सदैव तत्पर आणि कटी बद्ध असेल अशी ग्वाही संचालक मंडळाने दिली …!
