शुभारंभाच्या दिवशीच लिनाज् मध्ये ग्राहकांची अलोट गर्दी ..
—-–
नांदेड, ता. २२ (बातमीदार):
नांदेड येथील जुना मोंढ्यातील महाराजा रणजित सिंघजी मार्केट येथे दिल्ली येथील सुप्रसिद्ध व नामाकिंत ब्रॅड असलेल्या लीना’ ज डिझायनर हेरीटेज या भव्य वस्त्र दालनाच्या नांदेडातील दुसऱ्या शाखेचा शुभारंभ सोमवार ता १८ जानेवारी २०२१ रोजी झाला आणि हे मराठवाड्यातील सगळ्यात मोठे आणि मनमोहक दालन नांदेडकरांच्या सेवेत रुजू झाले..
लिनाजू च्या दालनाचा शुभारंभ संत बाबा बालवीरसिंघजी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला यावेळी संत जगदीश महाराज यांच्या सह नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी, सौ.लिना जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. लिनाज् हे मराठवाड्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन असून यात मनमोहक डिझाईन तसेच देशपातळीवरील सर्वच ब्रँडस् एकाच छताखाली उपलब्ध आहेत. कपड्यांचे वेगवेगळे पोत एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना कपडे निवडीला येथे वाव आहे.
लग्न समारंभासहीत विविध समारंभासाठी लागणारे वस्त्र व परिधान या ठिकाणी उपलब्ध राहणार असून ग्राहकांना होलसेल दरात खरेदी करता येणार आहे. लिनाज च्या शाखेच्या शुभांरंभा निमित्ताने विशेष ऑफर म्हणून दोन हजार रुपयांच्या खरेदीवर २५० रुपयांचे मोफत कुपन खरेदीदारांना देण्यात आले. आजच्या घडीला लिनाज च्या शाखा महाराजा रणजित सिंघजी मार्केट , जुना मोंढा तसेच महात्मा फुले मार्केट, आयटीआय कॉर्नर , नांदेड परिसरात असून पहील्या शाखेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे जुन्या मोंढ्यात नवील विस्तारीत शाखेला सुरूवात केल्याचे संचालकांनी नमूद केले तसेच येथे उपलब्ध असलेल्या देशपातळीवरील ब्रँडस् चा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले ….