#अभिनेत्री माधुरी पवार हीच्या अप्सरा आली गाण्यावर उपस्थितांची धम्माल …!
नांदेड – बातमीदार
#नांदेडातील नामांकित अर्थ संस्था असलेल्या सि टी चिट्स च्या वतीने कोरोना काळात कोरोना च्या विरोधात सक्षमपणे लढलेल्या कोरोना योद्धे यांचा गौरव आणि सन्मान सोहळा येथील हॉटेल मिडलँड येथे रविवारी सायंकाळी (दि.१७ जानेवारी २०२१) रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला् या कार्यकमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गुरुद्वारा लंगर साहिब चे संत बाबा हरिसिघंजी , डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन श्री सुधीर देशमुख, वस्तू व सेवा कर निवृत्त सह आयुक्त श्री माधव कोकणे , आयएमए चे नांदेड जिल्हाध्यक्ष श्री सुरेश कदम , संत पाचलेगांवर महाराज आश्रमाचे प्रमुख श्री गोविंद गुरू, जेष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञा सौ.चित्रा पाटील आणि अप्सरा आली फेम अभिनेत्री माधुरी पवार व सि टी चिट्स चे संचालक श्री गोपाल चौहान आणि श्री विशाल तेहरा यांची प्रमुख उपस्थिती होती ..
मागील वर्ष भरापासून संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले असून त्यामुळे विश्वातील जवळपास ५ कोटी पेक्षा जास्त जनता ही या व्हायरसच्या विळख्यात अडकली आहे..जगभरात असे सगळे विपरीत घडत असताना या काळात जनतेच्या मदतीला देवासारखे धावुन आलेल्या कोविड योद्ध्यांचे काम हे अनन्यसाधारण असून, त्यांच्या या अजोड कार्यासाठी मागील १५ वर्षापासून नांदेडातील नामाकिंत अर्थ संस्था म्हणून नावलौकीक असलेल्या सिटी चिटस् प्रा. लि. ने सर्व कोविड योद्ध्यांचे आभार मानत सर्वांच्या यथोचित गौरव आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते….
सिटी चिटस् प्रा.लि. च्या वतीने नांदेड व जिल्हयातील डॉक्टरर्स, सफाई कर्मचारी, परिचारिका, प्रसूती कर्मचारी, शेतकरी,पोलिस,आपत्कालीन सेवा कामगार, सामाजिक संस्था आदी मिळून ८० व्यक्तीमत्वांचा कोरोना योद्धा या पुरस्काराने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला .. त्याबरोबरच नांदेडातील जुन्या काळातील सेवावृत्ती डॉक्टरांचा त्यांच्या अविरत व समिर्पित रुग्णसेवेबद्दल त्यांच्या अमूल्य सेवेचं ऋण परतफेड करण्याच्या दृष्टीकोनातून सि टी चिट्स च्या वतीने सामाजिक दायित्व या नात्याने नांदेडातील ज्येष्ठ डॉक्टर सर्वश्री डॉ, राम रतन सिंह बिसेन , डॉ, चित्रा पाटील, डॉ. स्वाती भालेराव, डॉ. तुकाराम तळणकर, डॉ, जयराम बास्टेवाड, डॉ, पी सुदर्शन, डॉ, रमेश नारलावर, डॉ, विद्याधर भेदे, डॉ, राजेंद्र अमिलकंठावार तसेच आपल्या शासकीय सेवेतील कारकिर्दीत अनेक नव उद्योजक आणि व्यावसायिक घडविणाऱ्या वस्तू व सेवा कराचे निवृत्त सहआयुक्त श्री माधव कोकणे या ज्येष्ठ देवदूतांचा “जिवन गौरव” या पुरस्कार व सन्मानासह यथोचित गौरव करण्यात आला..
यावेळी सिटी चिटस् च्या वतीने त्यांचा भविष्यातील महत्वाकांक्षी योजना असेलेल्या सिटी निधी लि. या नव्या संस्थेच्या लोगोचे अनावरण श्रीमती मिराबाई हरिसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आले त्यासोबतच डॉक्टर बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या डॉक्टर स्पेशल भिशी चा २५ लक्ष रुपयांचा लकी ड्रॉ ही यावेळी अभिनेत्री माधुरी पवार यांच्या हस्ते काढण्यात आला या पहील्या भिशी चे मानकरी म्हणून नांदेडातील माधवबाग हॉस्पिटलच्या संचालिका सौ. रचना व्ही देशमुख यांना लकी ड्रॉ व्दारे निवडण्यात आले .. त्यानुसार त्यांना भिशीच्या रकमेचा धनादेध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सन्मान कोरोना योद्ध्यांचा या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिटी चिटस् चे संचालक श्री गोपाल चौहान,श्री विशाल तेहरा, श्री.बाबुराव जोगदंड, डिव्हीजनल मार्केंटिंग मॅनेजर श्री दत्ता देशमुख, डिव्हीजनल कलेक्शन मॅनेजर श्री विरेंद्र गौर व सिटी चिटस् च्या संपूर्ण टिमने परिश्रम घेतले ..
सामाजिक दायित्व म्हणून होतकरू विद्यार्थ्यांला मदतीचा हात …!
सामाजिक बांधिलकी व नांदेडकरांच्या सेवेत सदैव तत्पर असणाऱ्या सि टी चिट्सच्या वतीने मुंबई येथील जे.जे. हॉस्पिटल येथे एमबीबीएस साठी प्रवेश मिळविलेला होतकरू व गरिब विद्यार्थी श्री विशाल कठारे यास ११ हजार रुपये रोख रक्कम पुढील त्याच्या शिक्षणासाठी मदत म्हणून सिटी चिटस् चे संचालक श्री गोपाल चौहान व श्री विशाल तेहरा , अभिनेत्री माधुरी पवार , दै. उदयाचा मराठवाडा चे श्री मारोती सवंडकर यांच्या हस्ते या प्रसंगी देण्यात आली .. यावेळी यापुढेही सिटी चिटस हे सर्व प्रकारच्या सामाजिक कार्य व दायित्व यासाठी कायम स्वरूपी सदैव तत्पर आणि कटी बद्ध असेल अशी ग्वाही संचालक मंडळाने दिली …