February 27, 2021
सिटी चिटस् च्या वतीने पुढील शिक्षणासाठी मदतीचा हात….!

सिटी चिटस् च्या वतीने पुढील शिक्षणासाठी मदतीचा हात….!

आई- वडिलांचे छत्र हरपलेल्या अत्यंत गरीब नांदेडच्या विशालचा MBBS साठी नंबर.. विशालचे स्वप्न IAS होण्याचे…. सिटी चिटस् च्या वतीने पुढील शिक्षणासाठी मदतीचा हात….!
——————————————————————————-
नांदेड – बातमीदार

#अवघे ३ वर्षाचे वय असतानाच विशाल उत्तमराव कठारे ( रा. तडखेल ता. देगलूर जि. नांदेड) यांची आई वारली… थोड्याच दिवसात वडिलांचेही निधन झाले. दोघा मातापित्यांचे छत्र हरवल्याने व घरची परिस्थिती फारच हलाखीची असल्याने त्याने खूप हालअपेष्टा सहन करत इथपर्यंतचा प्रवास केला.आजी द्रोपदा हनुमंत कठारे (वय ७०) यांनी विशालचा मोलमजुरी करून सांभाळ केला.
विशालच्या डोळ्यात एक स्वप्न होते की, आपल्याला मोठं व्हायचं… त्यासाठी त्यांने प्रचंड मेहनत घेण्याचं ठरवलं. आजीच्या तुटपुंज्या मदतीवर त्यांनं नांदेड गाठलं
दहावीला ९० टक्के गुण घेतले व पुढे बारावीत ७६ टक्के गुण घेऊन त्यानं डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं. परिस्थिती तशी नाजूक होती. नांदेडला फक्त एक वेळेस मेसचे जेवण करून त्यांनं अभ्यास केला. त्याननं धीर सोडला नाही. प्रचंड कष्ट करून अभ्यास केला.याचे फलित म्हणून त्याला नीट परीक्षेत ४१० गुण मिळाले व त्याचा नंबर मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेज (जे जे हॉस्पिटल) येथे MBBS साठी लागला.

मात्र MBBS च्या ॲडमिशनसाठी ११००० रुपयांचा DD काढण्याची परिस्थिती नव्हती त्यासाठी नांदेडातील कल्याणकर केमिस्ट्रि चे संचालक डॉ. नागेश कल्याणकर यांनी त्याला त्यासाठी ८००० रुपयांची मदत केली आणि त्याचा एमबीबीएस साठीच्या प्रवेशाच्या मार्ग सुकर झाला ..त्यावेळी यशदा पुणे चे श्री बबन जोगंदड यांनी एक फेसबुक पोस्ट करीत विशाल साठी मदतीचे आव्हान केले होते त्यात त्यांनी म्हटले होते की… खूप बरे वाटले. अशा विद्यार्थ्यांना समाजाने मदत करण्याची गरज आहे. मीही त्याला यथावकाश मदत करेलच. आता तो भविष्यामध्ये मुंबईत जाणार आहे. निश्चित तो चांगला डॉक्टर होईल, पण त्याचे स्वप्न आहे IAS होण्याचे…त्यासाठी तो प्रयत्न करणार आहे . त्याला मुंबईमध्ये एखाद्या कोणाचं पालकत्व मिळालं तर तो निश्चित पुढे जाईल. पुढे तो ही मागे वळून वंचित,गरीब,होतकरू उपेक्षितांना मदत करेल अशी अपेक्षा आहे.. चला तर मग विशालला ज्याची कोणाची मदत करायची इच्छा असेल तर कृपया त्याला संपर्क करा….!

#विशाल उत्तमराव पठारे
#संपर्क:9156201080

संकल्पना – बबन जोगदंड सर , यशदा , पुणे  ..!

ही फेसबुक पोस्ट “ब्रँडस् ऑफ नांदेड” या सकारात्मक विचारांचा वसा असलेल्या डिजिटल ब्रँडींग पोर्टलच्या नजरेस आली आणि त्याचवेळी “ब्रँडस् ऑफ नांदेड” ने ती पोस्ट आपल्या पोर्टलवर पुर्न प्रकाशित केली आणि त्या प्रकाशित आव्हानाला लाखो लोकांपर्यंत पोहचविले ज्यावरून नांदेडातील नामाकिंत अर्थसंस्था असलेल्या “सिटी चिटस्” चे संचालक श्री गोपाल चौहान व श्री विशाल तेहरा यांनी संपर्क करत आपणासही विशाल ला मदत करावयाची आहे असा संकल्प बोलून दाखविला व त्यानुसार आज रविवारी सायंकाळी ५ वाजता रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल मिडलँड येथे “सिटी चिटस्” च्या वतीने सामाजिक दायित्व म्हणून कोरोना योद्ध्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात “सिटी चिटस्” च्या वतीने विशाल चाही गौरव करून त्याला पुढील शिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे ..

या प्रसंगी अशा कतृत्ववान विद्यार्थ्यांच्या मागे समाजातील दानशूर व्यक्तींनी ऊभे राहायला पाहीजे व जास्तीत जास्त संस्थानी मदत केली पाहीजे कारण नांदेड हे आता फार मोठे शैक्षणिक केंद्र झाले आहे असे आवाहन सिटी चिटस् च्या वतीने करण्यात आले आहे ..

विशाल कठारे संपर्क –

#विशाल उत्तमराव पठारे
#संपर्क:9156201080

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot