#वाढदिवसाचे अभिष्टचिंतन …!
#मराठा समाजाच्या सामाजिक चळवळीत गेल्या अनेक दिवसांपासून एखाद्या खांबाप्रमाणे पाऊल रोऊन एकनिष्ठ असलेले अभ्यासु व वैचारिक व्यक्तीमत्व ईंजिनीअर तानाजी हुस्सेकर साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा …!!
#तानाजी दादांच्या घरी आम्ही आमच्या बालपणी शिक्षणासाठी राहायला होतो … त्यांचे वडील श्री सुगंधराव पाटील आणि आमचे बाबा यांचे चांगले सख्य होते आणि आजही ते टिकून आहे हे महत्वाचे … अगदी ईयत्ता पाचवी-सहावी पासून दादा मला ओळखतो …. आम्ही शाळकरी विद्यार्थी होतो त्यावेळी दादाचे इंजिनिअरींगचे शिक्षण सुरू होते हे आजही आठवते … दरम्यान शैक्षणिक जिवनाच्या काळातच दादाने स्वतःला मराठा चळवळीत झोकून देत छावा मराठा युवा संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यात झंझावात निर्माण केला होता….. या दरम्यान चळवळीत काम करत असल्याने दादाचा संपर्क मराठा समाजातील तळा-गाळाच्या युवकांशी सातत्याने येत होता … त्या-त्या वेळी दादांना एक प्रश्न नेहमी पडायचा …. ज्याचा नामउल्लेख त्यांनी माझ्याशी आताही कित्येकवेळा बोलतांना करतात …. तो प्रश्न म्हणजे …… आजही खेडो-पाडी पारावर-कट्यावर बसलेली कित्येक तरुण मुले दिसतात त्यातील बहुतांशी आपलीच असतात पण शिकून सवरून ज्यावेळी शिक्षणामुळे नवी दृष्टी प्राप्त झालेले हे तरुण ईथे का ….ह्याचे उत्तर मला आजही मिळाले नाही … कदाचित मिळणार पण नाही …. हा त्यांचा सापेक्ष अभ्यास समाजाबद्दलची तळमळ सांगून जातो …..
#बहुजन समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक प्रश्नांचा विचारांच्या गराड्यात ते तर नेहमी असतात पण माझ्या सारख्या शिक्षीत तरूणांला आपल्या कामाप्रती फोकस वाढवायला आवर्जून सांगतात ….. ईतके असतांनाही आपली नौकरी… कुटूंब आणि मित्रपरिवार सांभाळतांना सदैव हसतमुख असतात हेही तितकेच खरे … मराठा समाजाने आधुनिकतेची कास धरावी … शिक्षणाचा वसा अधिक व्यापकतेने स्विकारावा … गाव-गावकीत अडकून न राहता …. समुद्रापार आपली गुणवत्ता सिद्ध करावी अशा व्यापक व समग्र हेतूने समाजाचे कार्य करणारे … दादा आज आमच्या सारख्या कित्येकांना नुसती प्रेरणाच नाही तर सातत्याने मार्गदर्शनही करतात ….!
#अशा धडपड्या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना भरभरून शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक सदिच्छा …
आपला स्नेहांकित ,
मारोती सवंडकर, नांदेड !