February 27, 2021
आज सि टी चिट्स च्या वतीने सन्मान कोरोना योद्ध्यांचा गौरव सोहळा …!!

आज सि टी चिट्स च्या वतीने सन्मान कोरोना योद्ध्यांचा गौरव सोहळा …!!

नांदेड – बातमीदार

नांदेडातील नामांकित अर्थ संस्था असलेल्या सि टी चिट्स च्या वतीने कोरोना काळात कोरोना च्या विरोधात सक्षमपणे लढलेल्या कोरोना योद्धे यांचा गौरव आणि सन्मान सोहळा येथील हॉटेल मिडलँड येथे आज रविवारी , सायंकाळी ४.३० वाजता गुरुद्वारा लंगर साहिब चे मुख्य जथेदार संत बाबा बलविंदरसिंघजी , शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख श्री सुधीर देशमुख, वस्तू व सेवा कर निवृत्त सह आयुक्त श्री माधव कोकणे , आयएमए चे नांदेड जिल्हाध्यक्ष श्री सुरेश कदम , प्रजावाणी चे संपादक श्री गोवर्धन बियाणी , जेष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ सौ.चित्रा पाटील आणि अप्सरा आली फेम अभिनेत्री माधुरी पवार या मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे ..

मागील वर्ष भरापासून संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले असून त्यामुळे  विश्‍वातील जवळपास ५ कोटी पेक्षा जास्त जनता ही या व्हायरसच्या विळख्यात अडकली आहे..जगभरात असे सगळे विपरीत घडत असताना या काळात जनतेच्या मदतीला देवासारखे धावुन आलेल्या कोविड योद्ध्यांचे काम हे अनन्यसाधारण असून, त्यांच्या या अजोड कार्यासाठी मागील १५ वर्षापासून नांदेडातील नामाकिंत अर्थ संस्था म्हणून नावलौकीक असलेल्या सिटी चिटस् प्रा. लि. ने सर्व कोविड योद्ध्यांचे आभार मानत सर्वांच्या यथोचित गौरव आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे….

सिटी चिटस् प्रा.लि. च्या वतीने डॉक्टर, सफाई कर्मचारी, परिचारिका, प्रसूती कर्मचारी, शेतकरी,पोलिस,आपत्कालीन सेवा कामगार आदी सगळ्यांचा सिटी चिटस् प्रा.लि.च्या वतीने गौरव करण्यात येणार असून या अनुसंगाने कोविड सारख्या जागतिक महामारीच्या संकटात संपूर्ण विश्‍वाला वैद्यकीय सेवेचं व त्यांच्या कार्याचे खरे मोल आजमितीला लक्षात आले आहे…

त्याबरोबरच एकंदरीत सद्य परिस्थितीवरून नांदेड सारख्या निमशहरी भागात आज पासून चाळीस-पन्नास वर्षापूर्वी वेद्यकीय सोयी – सुविधाची प्रतिकुल परिस्थिती आणि  विपरित कालखंडात ज्या डॉक्टरांनी नांदेडकरांना देव रुपात अविरत व अमूल्य अशी वैदयकीय सेवा दिली ..हजारो गरजू रुग्णांचे प्राण वाचविले … कित्येक बाल मृत्यू.. माता मृत्यू रोखले …त्या सर्व डॉक्टरांचा त्यांच्या अमूल्य सेवेचं ऋण परतफेड करण्याच्या हेतूने सि टी चिट्स च्या वतीने सामाजिक दायित्व या नात्याने नांदेडातील ज्येष्ठ सेवावृत्ती सर्वश्री  डॉ, राम रतन सिंह बिसेन , डॉ, चित्रा पाटील, डॉ. स्वाती भालेराव, डॉ. तुकाराम तळणकर, डॉ, जयराम बास्टेवाड, डॉ, पी सुदर्शन, डॉ, रमेश नारलावर, डॉ, विद्याधर भेदे, डॉ, राजेंद्र अमिलकंठावार तसेच आपल्या शासकीय सेवेतील कारकिर्दीत अनेक नव उद्योजक आणि व्यावसायिक घडविणाऱ्या वस्तू व सेवा कराचे निवृत्त सहआयुक्त श्री माधव कोकणे या ज्येष्ठ देवदूतांचा “जिवन गौरव” या पुरस्कार व सन्मानासह गौरव करण्यात येणार आहे

तसेच यापुढेही सि टी चिट्स सर्व प्रकारच्या सामाजिक कार्य व दायित्व यासाठी कायम स्वरूपी सदैव तत्पर आणि कटी बद्ध असेल अशी ग्वाही या सोहळा आयोजन प्रसंगी संचालक मंडळाने दिली आहे …

 

 

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot