March 9, 2021
नववर्ष संकल्प..!

नववर्ष संकल्प..!

नववर्ष संकल्प
   -संत राजिंदर सिंह जी महाराज
नवे वर्ष जेंव्हा कधी सुरू होते, तेंव्हा बरेच लोक संकल्प करतात. कोणी संकल्प एक दिवस करतात, कोणी संकल्प एक आठवड्याकरिता, कोणी एक महिन्याकरिता आणि कोणी कोणी असे असतात की जे पूर्ण वर्षभर संकल्प टिकवून ठेवतात.
आपण सर्वजण आपापल्या प्राथमिकतेनुसार, आपला विकास आणि प्रगती करिता नववर्ष संकल्प करतो. काही लोक संकल्प दररोज व्यायाम करण्याचा, कोणी जास्त मेहनतीचा, कोणी सकाळी लवकर उठण्याचा, कोणी व्यवसायिक प्रगतीचा, काही जण तर मध्यपान- धूम्रपान सोडण्याचा संकल्प करतात.
या सर्वांबरोबर आपल्याला अध्यात्मिक प्रगतीचा सुद्धा संकल्प करायला पाहिजे. एक चांगला चारित्र्यवान, पवित्र आणि सदाचारी मानव बनण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. एक चांगली नीतिवान व्यक्ती बनण्याकरिता, आपणास बाह्य दुनियेत नाही तर आपल्या अंतरीचा ध्यास ठेऊन, आपले विचार व समज यांचा विकास केला पाहिजे.
          आपण लोक दुनियेला एका दृष्टिकोनातून पाहतो. जस-जशी आपली समज असेल, जस-जसे संस्कार असतील, जसे आपल्या जीवनात काही घडले असेल तसेच आपले विचार बनतात आणि त्या प्रकारे आपण पण विचार करणे व समजणे सुरू करतो. बऱ्याच वेळा आपण कोणाला तरी भेटतो, त्यांच्याशी आपले संभाषण होते, तेंव्हा आपणास वाटते की ही व्यक्ती काही ठीक नाही. तर मग आपण त्याच नजरेने त्यांना पाहू लागतो आणि विसरून जातो की ती व्यक्ती जी आपणास योग्य वाटत नाही, त्यांच्यामध्ये काही चांगल्या गोष्टीही असतील.
           विचार करण्यासारखी बाब ही आहे की आपण काही लोकांना का पसंत करत नाही किंवा काही लोक आपणास का पसंत करीत नाहीत?  हे यामुळे की आपण आपल्या आसपासच्या लोकांचे आकलन केवळ आपल्या भौतिक दृष्टीने करतो. आपण लक्षात ठेवावे की सर्व धर्मग्रंथ आपणास हे समजावतात की, आपण सर्व प्रभूची संतान आहोत. “एक पिता एकस के हम बारीक”, की भगवंत केवळ एकच आहे.  त्यांना कोणत्याही नावाने आळवावे, त्यांचे आपण अंश आहोत, संतान आहोत. आपल्या शरीरातील ते चैतन्य ज्याला आपण आत्मा म्हणतो, तोच आपल्याला जीवन देतो. जसा भगवंताचा अंश आपल्यात आहे, तसा तो इतरांमध्ये सुद्धा आहे. हा प्रभूचा अंश, सर्व मनुष्यमात्रांमध्ये, जनावरांमध्ये, पशुपक्ष्यांनमध्ये आणि जेवढे जीवजंतू आहेत, त्या सर्वांमध्ये आहे.
तर आपण प्रभूस प्रार्थना करूया की, जो आपला दृष्टीकोन आहे, तो जागृत व्हावा, जेणे करून सर्वांना आपण एकाच नजरेने पाहू शकू. हे कसे होईल? जेव्हा आपण ध्यान-अभ्यास नियमित करू, तेंव्हा प्रभूची दोन स्वरूपे, जी ज्योती आणि श्रुती आहेत त्यांचा आपणास अनुभव होईल. ज्यावेळी त्याचा अनुभव आपल्याला होईल, त्यावेळी आपणास खात्री होते की आपल्या आत काही असे आहे, जे बाहेरून आलेले नाही.
जी प्रभूची शक्ती आपल्यात काम करते, तीच दुसऱ्या माणसात, जनावरांमध्ये आहे आणि झाडाझुडुपांमध्ये आहे, अशी जेव्हा आपल्याला खात्री होईल, तेंव्हा आपण सर्वांना आपले समजू लागू. आपली संवेदनशीलता इतरां प्रति वाढेल. आपले विचार व समज खऱ्या अर्थाने वृद्धिंगत होतील.
        ज्यांची समज योग्य असेल, त्यांचे विचार योग्य होतील, ज्यांचे विचार योग्य असतील, त्यांचे बोल योग्य होतील, ज्यांचे बोल योग्य असतील, त्यांची कृती योग्य होईल. म्हणून तर योग्य समज असणं खूप गरजेचे आहे.
       तर या नववर्षी आपणास आपल्या संपूर्ण प्रगतीकरिता, अध्यात्मिक संकल्प सुद्धा करायला पाहिजे की, आपण दररोज ध्यान-अभ्यासाकरिता वेळ द्यावा. ज्या मुळे आपले विचार व समज विकसित व्हावेत. असे केल्याने आपण एक चांगले, चारित्र्यवान, पवित्र, सदाचारी मानव बनण्यास सहाय्यक ठरेल.
Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot