शिवगर्जना प्रतिष्ठाण तर्फे .. भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन..
नांदेडातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शिवगर्जना प्रतिष्ठाण च्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने १२ जानेवारी रोजी आनंदनगर चौक येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ११ वाजता माँ जिजाऊंच्या प्रतिमेला वंदन करून रक्तदान शिबीरास सुरूवात होणार आहे …
कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीमुळे रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे त्यामुळे दरवर्षी पेक्षा यावर्षीच्या रक्तदान शिबीरात सर्व रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात हातभार लावावा असे आवाहन शिवगर्जना प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद मोरे पाटील यांनी केले आहे ..