जाणून घ्या आर्थोस्कोपी म्हणजे काय ….?
डॉ. स्वप्नील चक्करवार यांच्या कडून अगदी सरळ व सोप्या भाषेत ….
ऑर्थोस्कोपी म्हणजेच हाडाची एंडोस्कोपी (ज्याला ऑर्थोस्कोपी शस्त्रक्रिया देखील म्हणतात.) ही एक कमीतकमी पसरलेली शल्यक्रिया आहे, ज्यामध्ये एक तपासणी आणि कधीकधी सांध्याच्या खराब झालेल्या आतील भागावर ऑर्थोस्कोपीचा वापर केला जातो, एक प्रकारची एंडोस्कोप. (एक डिव्हाइस जे शरीराच्या अंतर्गत भागात जाऊन पाहणी करते ), जे लहान चिराच्या नंतर गुडघ्यात घातले जाते.
ऑर्थोस्कोपिक प्रक्रियेचा उपयोग विविध ऑर्थोपेडिक (हाडे किंवा स्नायू संबंधित) परिस्थितींचे मूल्यांकन आणि उपचार करण्यासाठी केल्या जातो..
‘हिप रिप्लेसमेंट’विषयी समज–गैसमज..?
समज-गैसमजांसह ‘हिप रिप्लेसमेंट’नंतरची परिस्थिती, वेदना तसेच ही सर्जरी धोकादायक आहे की नाही, या विषयीच्या समजांबाबतची सविस्तर माहिती नांदेडातील नामाकिंत असे अस्थिरोग तज्ञ डॉ स्वप्निल चक्करवार यांच्या कडून घेऊयात…
‘हिप रिप्लेसमेंट’नंतर अनेक आठवडे चालता येत नाही..?
काही वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीनं शस्त्रक्रिया केल्यानंतर काळजीच्या उद्देशाने विश्रांतीचा सल्ला दिला जात असे. हे खरे आहे; पण आज आधुनिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या या शस्त्रक्रियेनंतर काही तासानंतर लगेच रुग्णाच्या हालचाली करण्यास सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी उभे करणे, काही पावले चालवणेही शक्य असते. दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यानंतर रुग्ण स्वतःची दैनंदिन कामेही करू लागतात. तीन महिन्याच्या काळानंतर रुग्णास वाहन चालविणे, प्रवास करणे, चढणे, उतरणे आदी गोष्टीही पूर्वीप्रमाणे करू लागतात. काही विशिष्ट रुग्णांनी काही हालचाली करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच क्रिया करणे हे हितावह असते. तरुण वयातील स्त्रियांना शस्त्रक्रियेनंतर गर्भधारणेसही अडथळा येत नाही.
खुब्याचा सांधा खूपच खराब असेल, तर ‘हिप रिप्लेसमेंट’ फायदेशीर नसते ..?
हा निव्वळ गैरसमज आहे. उलटअर्थी वेदना तीव्र असतील, खुब्याच्या सांध्यातील हाडाचा बॉल तुटलेला असेल, सॉकेट तुटलेले असेल, स्नायू जखडल्यामुळे हालचालीस बंधने असतील, ट्यूमर असेल, त्या ठिकाणी गंभीर इजा असेल, तर ताबडतोब सर्जनने ‘हिप रिप्लेसमेंट’ सर्जरी गरजेचे आहे, असे सुचविल्यास शस्त्रक्रिया करणे हितावह असते. कुठल्याही शस्त्रक्रियेची यशस्विता सर्जनची कुशलता, कौशल्य, तंत्रज्ञान, उपकरणे, आजाराची स्थिती, सर्जनबरोबरच असणारी इतर सहकारी टीम आणि शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारी सुसज्ज यंत्रणा या घटकांवर अवलंबून असते.
‘हिप रिप्लेसमेंट’ ही शस्त्रक्रिया धोकादायक आहे…?
कोणतीही शस्त्रक्रिया म्हटलं, की ती धोकादायक आणि ती कशी टाळता येईल, असाच विचार केला जातो. प्रत्येक शस्त्रक्रिया ही जशी फायदेशीर आहे, तशी काही अंशी धोके असतातच. या शस्त्रक्रियेतील धोके कमी व्हावेत, म्हणून सातत्याने संशोधन सुरूच असते. तंत्रज्ञानातील आधुनिकतेमुळे , आधुनिक उपकरणांमुळे, साधन सामुग्रीतल्या सुसज्ज यंत्रणेमुळे व ही कौशल्ये आत्मसात करणाऱ्या प्रशिक्षित तज्ज्ञांमुळे शस्त्रक्रियेतली अचूकता वाढली आहे, धोकेही कमी झाले आहेत. अगदी वीस वर्षाच्या तरुणापासून ते नव्वदीच्या जेष्ठांपर्यंत आता या शस्त्रक्रिया करता येतात. डायबेटीस, हृदयविकार, थायरॉईड अथवा अन्य वैद्यकीय इतिहास असणाऱ्या रुग्णांवरही शस्त्रक्रियापूर्व तपासणी व योग्य काळजी घेऊन आता शस्त्रक्रिया यशस्वी होतात. वय, आजार यानुसार असणारे धोके लक्षात घेऊन योग्य काळजी घेत ‘हिप रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया केली, तर रुग्णास वेदनांपासून मुक्ती मिळते.
सहज-सुलभ हालचाली करता येतात, दैनंदिन स्वतःची कामे, प्रवास करता येतो. आयुष्य परावलंबित्व होऊन जगण्यापेक्षा वेदनांपासून मुक्त होऊन जगण्याचा पर्याय केव्हाही चांगला…अस्थीभंग व अस्थीरोगाच्या कुठल्याही समस्येच्या निराकारणा संदर्भात अवश्य संपर्क साधावा ..-
डॉ. स्वप्नील चक्करवार,
एम.बी.बी.एस, एम.एस.आर्थो,ऑर्थोस्कोपी व जाँईन्ट रिप्लेसमेंट सर्जन,चिंतामणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स्, सेंट्रल बँकेच्या वर, आयुर्वेदीक कॉलेज समोर, नांदेड,संपर्क – ७७७५८५४४४६