भाजपा उपजिल्हाध्यक्षांच्या हाती मनसेचा झेंडा
नांदेड- मनसेचे जिल्हाध्यक्ष असलेल्या विनोद पावडे यांनी २०१४ मध्ये भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपामध्ये ते उपजिल्हाध्यक्ष पदावर होते. परंतु आता परत ते स्वगृही मनसे पक्षात परतले आहेत. मंगळवारी जिल्हामाँटीसिंग जहागिरदार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे जिल्ह्यात मनसेची ताकद वाढणार आहे.जिल्ह्यात सध्या मनसेची ताकद वाढविण्यासाठी कार्यकारणीकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी यापूर्वी पक्ष सोडून गेलेल्यांनाही साद घालण्यात आली आहे. मोठ्या अपेक्षेने मनसे सोडून इतर पक्षात गेलेल्यांचा भ्रमनिरास झाला आहे.त्यामुळे ते आता स्वगृह परतत आहेत. विनोद पावडे हे याच अपेक्षेने भाजपात गेले होते. परंतु गेल्या सहा वर्षात पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनी परत हाती मनसेचा झेंडा घेतला. पावडे यांच्यासह संतोष राठोड, किशन पवार, राहूल देशमुख आणि इतर जणांनी मनसेत प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष माँटीसिंग जहागिरदार, शहराध्यक्ष अब्दूल शफीक, रवि राठोड, उषा नरवाडे, सुभाष भंडारे, पप्पू मनसूके, संतोष सुनेवाड, महेश ठाकूर, गणेश जोरगेवार, सय्यद फारुख, ज्योती मोरे, रेश्मा बाजी, नारायण हिलाल, शंकर सरोदे, चंदू नागूल, अनिकेत परदेशी, संघरत्न जाधव, राहूल शिंदे, विशाल देशमुख, सय्यद गफूर यांची उपस्थिती होती.