आई- वडिलांचे छत्र हरपलेल्या अत्यंत गरीब नांदेडच्या विशालचा MBBS साठी नंबर.. विशालचे स्वप्न IAS होण्याचे…. डॉ.कल्याणकर सरांचा प्रवेश फीस साठी मदतीचा हात….!
——————————————————————————-
#अवघे ३ वर्षाचे वय असतानाच विशाल उत्तमराव कठारे
( रा. तडखेल ता. देगलूर जि. नांदेड) यांची आई वारली… थोड्याच दिवसात वडिलांचेही निधन झाले. दोघा मातापित्यांचे छत्र हरवल्याने व घरची परिस्थिती फारच हलाखीची असल्याने त्याने खूप हालअपेष्टा सहन करत इथपर्यंतचा प्रवास केला.आजी द्रोपदा हनुमंत कठारे (वय ७०) यांनी विशालचा मोलमजुरी करून सांभाळ केला.
विशालच्या डोळ्यात एक स्वप्न होते की, आपल्याला मोठं व्हायचं… त्यासाठी त्यांने प्रचंड मेहनत घेण्याचं ठरवलं. आजीच्या तुटपुंज्या मदतीवर त्यांनं नांदेड गाठलं
दहावीला ९० टक्के गुण घेतले व पुढे बारावीत ७६ टक्के गुण घेऊन त्यानं डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं. परिस्थिती तशी नाजूक होती. नांदेडला फक्त एक वेळेस मेसचे जेवण करून त्यांनं अभ्यास केला. त्याननं धीर सोडला नाही. प्रचंड कष्ट करून अभ्यास केला.याचे फलित म्हणून त्याला नीट परीक्षेत ४१० गुण मिळाले व त्याचा नंबर मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेज (जे जे हॉस्पिटल) येथे MBBS साठी लागला. मात्र MBBS च्या ॲडमिशनसाठी ११००० रुपयांचा DD काढण्याची ऐपत सुद्धा विशालची नाहीये. त्यासाठी त्यांनं नांदेडमध्ये अनेक जणांची भेट घेतली व मदतीची अनेकांकडून अपेक्षा केली. स्वतः ३-४ हजार रुपये कसेबसे जमवले, परंतु अकरा हजार रुपये फीस व मुंबईला जाणे – येणे यासाठी काही रक्कम असा बारा-पंधरा हजारांचा खर्च त्याला लागणार होता.त्यासाठी त्यांला कोणीतरी प्रा. डॉ. नागेश कल्याणकर हे तुला मदत करतील, त्यांच्याकडे जा,असे सांगितले. त्याने नागेश कल्याणकर सरांना भेटून आपली सर्व हकीकत सांगितली. सरांनी त्यांला बोलावून मदत करण्याचे आश्वासन दिले.मी नांदेडला असल्याने काल कल्याणकर सर यांची सहज त माझी भेट झाली होती.आज त्यांनी मला दादा आठ वाजता तुम्हाला थोडा वेळ आहे का?असा फोन केला व एका होतकरू विद्यार्थ्यांची मला तुम्हाला भेट करून द्यायची आहे, असे सांगितले. भविष्यामध्ये त्याला UPSC थोडी मदत करा म्हणून मला बोलावून घेतले. मी त्याच्याशी सविस्तर संवाद बोललो. त्याने त्याची आर्थिक परिस्थिती व त्यांच्या जीवनातून आई-वडिलांचे छत्र कसे हरवले याबद्दलची सविस्तर माहिती दिली. खरेतर याबद्दलची सविस्तर माहिती इथे लिहिली नाही. ती फार विदारक आहे.
अशा गरजू व होतकरू विद्यार्थ्याला प्रा. नागेश कल्याणकर सर यांनी माझ्या हस्ते त्यांच्या क्लासेसमध्ये बोलावून ८००० रुपयांची मदत प्रवेश फीस भरण्यासाठी केली… खूप बरे वाटले. अशा विद्यार्थ्यांना समाजाने मदत करण्याची गरज आहे. मीही त्याला यथावकाश मदत करेलच. आता तो भविष्यामध्ये मुंबईत जाणार आहे. निश्चित तो चांगला डॉक्टर होईल, पण त्याचे स्वप्न आहे IAS होण्याचे…त्यासाठी तो प्रयत्न करणार आहे . त्याला मुंबईमध्ये एखाद्या कोणाचं पालकत्व मिळालं तर तो निश्चित पुढे जाईल. पुढे तो ही मागे वळून वंचित,गरीब,होतकरू उपेक्षितांना मदत करेल अशी अपेक्षा आहे.. चला तर मग विशालला ज्याची कोणाची मदत करायची इच्छा असेल तर कृपया त्याला संपर्क करा….!
#विशाल उत्तमराव पठारे
#संपर्क:9156201080
शब्दांकन – बबन जोगदंड सर , यशदा , पुणे ..!