चिंतामणी हॉस्पिटल ते मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर असा प्रवास करत , समाजकारण करत आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे व्यक्तीमत्व म्हणजेच डॉ प्रकाश शिंदे यांच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल व त्यांच्या व्यसन मुक्ती संकल्पा बद्दल हा शब्द प्रपंच.
उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव, हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील हे नायब .तहसीलदार म्हणून नांदेडला कार्यरत होते .त्यांचे प्राथमिक शिक्षण आजोळी चातारी ता. उमरखेड येथे झाले. त्यांनी पुढील महाविद्यालयीन शिक्षण नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात घेतले. अत्यंत जिद्दीने चांगल्याप्रकारे अभ्यास करून डॉ प्रकाश शिंदे यांनी शिक्षण घेतले.आई वडिलांनी काबाड कस्ट करून शिक्षणासाठी पैसे पुरविले.
चांगले शिक्षण घेऊन डॉक्टर व्हायचे हे स्वप्न त्यांनी प्रत्यक्ष साकार केले . वैद्यकीय शिक्षण नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालयात घेतले आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर लगेच त्यांना तिथेच प्रोफेसर ची नौकरी लागली . तद नंतर गावोगावी त्यांनी आपल्य मार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन केले. या शिबिरांच्या माध्यमातून आपल्या व्यसनमुक्तीच्या कार्याला सुरुवात केली.त्या बरोबरच चिंतामणी हॉस्पिटटल्र्स च्या माध्यमातून नांदेड शहरात आपल्या वैद्यकीय व्यवसायाला प्रारंभ केला. रुग्णांना योग्य सेवा मिळाल्यामुळे गर्दी वाढू लागली. परिसरातील नागरिकांना रात्री अपरात्री सेवा मिळू लागली. अल्पावधीतच त्यांचे हॉस्पिटल प्रसिद्ध झाले.
वैद्यकीय व्यवसाय करत असताना समाजाविषयी काही तरी केले पाहिजे असे विचार येऊ लागले. तरुण युवक दारूच्या आहारी जाऊन आपले जीवन संपवत आहेत. आहारी गेलेल्या व्यक्तीचे संसार मोडले आहेत. लेकरे मुलं बाळ यांच्यावर भीक मागण्याची वेळ अली आहे. हे चित्र पाहून ते व्याकुळ होत असत. त्यातून प्रेरणा घेत डॉ. शिंदे यांनी शालेय ,महाविद्यालय मेळावे घेऊन व्यसनमुक्तीवर जनजागृती करण्याचे काम चालू केले. विविध जयंतीचे औचित्य साधून स्पर्धेचे आयोजन केले जात असे. विद्यार्थी मोठ्या संख्येने यात सहभागी होत असत. समाजामध्ये जनजागृती करत असतांना अनेक कुटूंब उध्वस्त झालेली पाहिली.
दारू पिऊन स्वतःचे जीवन तर बरबाद होतेच पण कुटूंब भिकारी जीवन जगते. या कुटूंबाला समाजात कवडीची किंमत नसते. मुलं बाळ शिक्षणा पासून वंचित राहतात. एक कुटूंब असे असले की एक गल्ली नव्हे तर गावाचे नाव खराब होते. गावचा विकास करण्यासाठी तरुण युवक बरेच काही करू शकतात. पण ते दारूच्या आहारी जात आहेत. यासाठी आपणच काही तरी केले पाहिजे या विचाराने १९९३ साली त्यांनी संपूर्ण पणे व्यसनमुक्ती साठी स्वतः ला वाहून घेत नांदेड येथे चिंतामणी हॉस्पिटल मध्ये व्यसनमुक्तीचे कार्य चालू केले.
अत्यंत अल्प दरात उपचार सुरु केले. शंभर,दोनशे,पाचशे नाही तर हजारो कुटूंबाचे व्यसनमुक्त पुर्नवसन त्यांनी आपल्या कारकिर्दीत केले आहे. दारू पाजणारे अनेक असतात पण दारू सुटावी म्हणून हजारातून एकच व्यक्ती पुढाकार घेत असतो. नुसते व्यसन मुक्ती नव्हे तर त्या माणसाला समाजात मानसन्मानाने जगता यावे यासाठीही प्रयत्न केले. यामुळे ते महाराष्ट्र राज्यात नावलौकिक झाले आहेत.
त्यांच्या कार्याची दखल विविध सामाजिक संस्थांनी घेतली आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. तसेच विविध वृत्त वाहिनीवर , रेडिओ , आकाशवाणी, You Tube, वर्तमान पत्रात अनेक मुलाखती हि प्रदर्शित झाल्या आहेत.
व्यसनमुक्ती च्या माध्यमातून केलेल्या समाजकार्याची दखल विविध स्थरावर घेतली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यात पुरस्काराने डॉ प्रकाश शिंदे यांना सन्मानित केले आहे. अंतरराष्ट्रीय जागतिक स्तरावर देखील सामाजिक क्षेत्रातील मानक अंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना विविध संघटनेच्या माध्यमातून आरोग्य अभियानाअंतर्गत व्यसन मुक्ती मेळावे तसेच कार्यशाळाचे आयोजन केले . राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्त चळवळ गावागावात पोहचवली आहे. तरुणांना मार्गदर्शन केले आहे.
आज ते यशो शिखरावर पोचले आहेत. हजारो तरुण त्यांच्या मार्गदर्शना मुळे कामा धंद्याला लागले आहेत. हजारो कुटूंब सुखी जीवन जगत आहेत. शेकडो तरुण व्यसनमुक्त होऊन उदयोजक बनले आहेत.समाजात सन्मानाने जगत आहेत. समाजकार्याचा वसा घेतलेले डॉ प्रकाश शिंदे यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा…
गरजूंनी अधिक मार्गदर्शनासाठी डॉ प्रकाश शिंदे यांच्याशी संपर्क साधावा…
डॉ प्रकाश शिंदे
२३ / B , मयूर विहार कॉलनी,
पावडे वाडी नाका, नांदेड
मोबाईल – 9226757494