February 27, 2021

संस्कृत का शिकावी ?

दूरदर्शनवरील संस्कृत बातमीपत्र तामिळनाडू राज्यात दाखवू नका, अशी मागणी एका नेत्याने नुकतीच केली. त्यांचे नाव स्टॅलिन असले तरी त्यांच्या पित्याचे नाव करुणानिधी म्हणजे करुणेचा सागर, मुलाचे नाव उदयनिधी म्हणजे सूर्य आणि पत्नीचे नाव दुर्गा म्हणजे दुर्गम किल्ल्यावर किंवा पर्वतावर राहणारी. ही सर्व नावे संस्कृत आहेत.

आपल्याकडेही बघा “संस्कृत आता कालबाह्य झाली”, असे म्हणणारे लोक लग्नाच्या पत्रिकेत काय छापतात? ज्येष्ठ पुत्र, तृतीय कन्या.

“मोठा पोरगा, तिसरी पोरगी” असे छापत नाहीत. “प्रीतिभोज” असे लिहितात. जेवण्याची वेळ, असे छापत नाहीत. मंगल, परिणय, विवाह, आगमन, वर, वधू असे अनेक शब्द पत्रिकेत असतात.

मुडदा असला तरी मृतदेह आणि जाळायचा असला तरी त्याला लोक अंत्यसंस्कार म्हणतात. दहाव्याचा कार्यक्रम असला तर “दशक्रिया विधी” छापतात.

‘संस्कृत’ शब्दाचा अर्थ व्यवस्थित तयार केलेली भाषा.

आपण रोजचे कपडे सणाला किंवा लग्नात घालत नाही. त्यासाठी व्यवस्थित वेशभूषा करतो. तशीच विशिष्ट प्रसंगी जनतेला सुसंस्कृत भाषेची नेहमीच आवश्यकता वाटते. ही भाषा व्यवस्थित कोण करते? तर लोकच करतात. सर्व भाषा लोकांच्याच तोंडाने तयार होतात. त्यामुळे त्या कुणी कुणावर थोपण्याचा प्रश्नच नाही.

बसस्थानकावरून प्रवाशांना सर्व दिशांना घेऊन जाते ते ‘परिवहन महामंडळ’. परि म्हणजे सगळीकडे आणि वहन म्हणजे वाहून नेणे. आजही गरजेनुसार असे नवे शब्द देणारी भाषा मृत कशी असू शकते.

भारतातील बहुसंख्य नावे पहा.

पंक म्हणजे चिखल आणि पंकज म्हणजे चिखलात जन्मणारे कमळ.

नीर म्हणजे पाणी. नीरज म्हणजे पाण्यात जन्मणारे कमळ.

श्रीकांत म्हणजे लक्ष्मीचा नवरा. उमाकांत म्हणजे पार्वतीचा नवरा. तुम्ही आपापली नावे तपासून घेतली तर त्यात उपसर्ग, धातू आणि प्रत्यय ही शब्द तयार करण्याची संस्कृत व्याकरणातील पद्धत सापडते.

(नेटवर शोधा. इंग्रजांनी या भाषेचा जबरदस्त अभ्यास केलेला आहे.)

कमीत कमी अक्षरात जास्तीत जास्त अर्थ सांगणे हा संस्कृतचा विशेष गुण.

पीडित म्हणजे त्रास भोगलेली व्यक्ती,

जीवित म्हणजे जिवंत व्यक्ती,

शोषित म्हणजे शोषण केलेली व्यक्ती,

दलित म्हणजे दळलेली किंवा समाजव्यवस्थेत भरडलेली व्यक्ती आणि

वंचित म्हणजे फसवणूक झालेली किंवा लाभापासून दूर ठेवलेली व्यक्ती.

संस्कृत माहीत नसेल तर काय होते बघा…!

परवा तीस नोव्हेंबर रोजी ‘त्रिपुरारि पौर्णिमा’ होती. अरि म्हणजे शत्रु. त्रिपुरासुराचा शत्रु म्हणजे शंकर, असा त्रिपुरारि नावाचा अर्थ. दूरदर्शनचे एक मराठी निवेदक ‘त्रिपुरी पौर्णिमा’ असाच उल्लेख करीत होते. त्रिपुरी म्हणजे काय? तीन गावांची पौर्णिमा. अशा अनेक गमती जमती ते रोज करतात. (बरं या वाहिनीला फोन, ई मेल पाठवूनही काही सुधारणा नाही. असो)

अरि याच शब्दापासून अरिहंत म्हणजे शत्रूची हत्या करणारा, अरिजित म्हणजे शत्रूला जिंकणारा, मुरारि म्हणजे मुर नावाच्या दैत्याचा शत्रू, अशा अनेक नावांचे अर्थ संस्कृत शिकताना स्पष्ट दिसू लागतात.

आता लगेच “माझ्या नावाचा अर्थ काय” म्हणून विचारू नका. त्यासाठी चिकाटीने संस्कृत शिकायला सुरुवात करावी. नंतर काय टीका किंवा विरोध करायचा तो करावा.

सर्वांना शुभ+इच्छा म्हणजेच शुभेच्छा…

विनोद जैतमहाल

संचालक व प्रशिक्षक, स्पीकर अकॅडमी, जालना, (भाषणकलेची कार्यशाळा)

9823028332.

 

 

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot