February 27, 2021

पेन मॅनेजमेंट एक आधुनिक उपचार पद्धती..!

नांदेडातील तज्ञ – डॉ. कृष्णा शेषराव जगदंबे,

M.B.B.S. D.A. FIPM CIPM (Delhi)  ,इंटरव्हेंशनल पेन फिजिशियन..

अत्याधुनिक पद्धतींनी प्रभावी वेदनानिवार…!!

वैद्यकशास्त्रात ‘पेन मॅनेजमेंट’ अर्थात ‘प्रभावी वेदना निवारण’ ही शाखा नवीन आहे.  कोणत्याही आजाराच्या दुखण्याचा काही ठराविक कालावधी असतो. त्याहून अधिक काळ (३महिने)दुखणे राहिले तर त्या दुखण्याला वैद्यकशास्त्रात जुनाट दुखने (chronic pain) असे म्हणतात.अशा प्रकारच्या दुखण्यावर व कोणत्याही प्रकारच्या दुखण्यावर उपचार करण्यासाठी pain management ही एक नवीन  शाखा भारतात उदयास आली आहे , अशा रुग्णांसाठी वेदनाशमनासाठी विशिष्ट उपायांची गरज भासते.

कर्करोगासारख्या दुखण्यांमध्ये दुखण्याचे कारण माहिती असते पण रोगावर इतर उपचार सुरू असूनही दुखणे एका ठराविक मर्यादेपेक्षा कमी होत नसते. किंवा वृद्धत्त्वात आलेल्या पाठीच्या दुखण्यात काही वेळा दुखण्याचे नेमके कारण उलगडू शकत नाही अशा रुग्णांचे दुखणे वेदनाशमनाच्या आधुनिक पद्धतींद्वारे कमी करता येऊ शकते.

दुखण्यावर उपचार करताना नेहमी सोप्या पद्धतींपासून सुरूवात करून गरज पडल्यास अवघड आणि अद्ययावत पद्धतींकडे जातात. सर्वप्रथम रुग्णाला औषधे देऊन,  व्यायाम सांगून तसेच रुग्णाच्या जीवनशैलीत काही बदल करायला सांगून पाहिले जाते. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना मानदुखी, पाठदुखी, मनगटाचे दुखणे असे त्रास हमखास होताना दिसतात. अशा रुग्णांसाठी जीवशैलीत केलेले थोडेसे बदलही लाभदायक ठरू शकतात. सोप्या उपचारपद्धतींनी दुखण्यात म्हणावा तसा फरक पडला नाही तर त्याला अधिक परिणामकारक  औषधे दिली जातात. काही जणांना या उपचारांनी बरे वाटते. पण ज्यांचे दुखणे राहते त्यांच्यासाठी वेदनाशमनाचे काही आधुनिक उपाय आहेत.

अपघातात एखादा अवयव गमवावा लागलेल्या रुग्णांमध्ये ‘फँटम लिंब पेन’ ही परिस्थिती आढळते. जो अवयव प्रत्यक्षात त्याच्या जागेवर नसतो तोच दुखत असल्याची तक्रार हे रुग्ण करतात. अशा रुग्णांना ‘स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेशन’सारख्या उपचाराने बरे वाटू शकते. यात पाठीच्या कण्यात योग्य जागी इलेक्ट्रोड बसवून कण्याला ‘स्टिम्युलेट’ केले जाते अर्थात दुखणे कमी करणाऱ्या सुखद संवेदना पुरविल्या जातात. देशातील पहिले स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेशन ‘पॅनक्रिएटायटिस’ अर्थात स्वादुपिंडाचा एक विशिष्ट आजार झालेल्या रुग्णासाठी वापरण्यात आले होते. या रुग्णाला ‘फोर्टविन’ हे औषध सतत दिल्याने त्याला त्या औषधाचे अ‍ॅडिकशन झाले होते. काही औषधे सतत घेतल्याने रुग्णाला त्यांची सवय लागून जाते. नसेच्या विशिष्ट दुखण्यामध्ये किंवा अगदी नागीण (हर्पिस) या आजारातील दुखण्यांतही हा उपाय वापरला जाऊ शकतो. स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेशनद्वारे अशा रुग्णांचे दुखणे कमी करण्याबरोबरच त्याचे विशिष्ट औषधांवरील अवलंबित्त्वही कमी करता येते. हे उपचार महाग आहेत खरे मात्र विशिष्ट परिस्थितींत ते तितकेच प्रभावीही ठरतात.

‘सायटिका’ सारख्या आजारांमध्ये दर वेळी शस्त्रक्रिया करण्याची गरज नसते. वास्तविक पाहता अशा दुखण्यांत शस्त्रक्रिया करावे लागणारे रुग्ण केवळ दोन ते तीन टक्केच असतात. बाकीचे लोक दुखणे कमी करण्याच्या उपचारांनी बरे होऊ शकतात. अशा वेळी ‘नव्‍‌र्ह ब्लॉक’ किंवा ‘जॉइंट ब्लॉक’ सारख्या उपचारपद्धती इतर उपचारांबरोबर वापरता येतात. यात पेशंटला ज्या अवयवाचे दुखणे असेल त्या अवयवाला किंवा सांध्याला पुरवठा करणारी नस शोधून ठराविक जागी इंजेकशन दिले जाते. या इंजेकशनसाठी स्टिरॉइडचा वापर केला जातो. पूर्वी इंजेकशन द्यायची जागा डॉक्टरांना अंदाजाने ठरवावी लागे. आता मात्र इंजेक्शन कुठे द्यायचे ती नेमकी जागा शोधून काढण्याच्या पद्धती खूप विकसित झाल्या आहेत. त्यामुळे योग्य जागी कमी प्रमाणात औषध पोहोचवून अपेक्षित परिणाम साधता येतो आणि साईड इफेक्ट्स अर्थात औषधाचे दुष्परिणाम टाळणे शक्य होते.

‘न्यूरोअ‍ॅबलेशन सर्जरी’ हीदेखील एक प्रगत वेदनानिवारण उपचारपद्धती आहे. काही जणांना नव्‍‌र्ह ब्लॉकसारखी इंजेक्शने दिल्याने दुखण्यात चांगला फरक पडतो. पण कालांतराने ते दुखणे परत उद्भवू शकतो. उदा. वृद्धत्त्वात रुग्णाने पाठीच्या दुखण्यासाठी इंजेकशन घेतले असेल तर त्याचा परिणाम काही महिने टिकतो व नंतर दुखणे परत सुरू होऊ शकते. असे झाल्यास ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्या-त्या सांध्याला पुरवठा करणाऱ्या नेमक्या नव्‍‌र्हज् शोधून जाळून टाकल्या जातात. याद्वारे संभाव्य शस्त्रक्रिया टाळण्यात यश येऊ शकते.

स्लिप डिस्कसारख्या आजारांमध्येही इंजेकशने घेऊन अपेक्षित आराम मिळाला नाही तर ओझोन dissectomy या उपचाराने त्रास कमी केल्या जावू शकतो. याद्वारे डिस्कचा आकार कमी करून प्रत्यक्ष शस्त्रक्रिया टाळता येणे शक्य होऊ शकते.

कर्करागाच्या काही रुग्णांमध्ये ‘मॉर्फिन’ या प्रभावी वेदनाशामकाचा डोस खूप जास्त लागतो. मॉफिनबद्दल रुग्णांमध्ये असंख्य गैरसमज आढळतात. अनेक रुग्णांचा असा समज असतो की हे औषध आयुष्याच्या शेवटीच देतात! मात्र हे खरे नाही. ‘मल्टिपल मायलोमा’ किंवा हाडांच्या कर्करोगासारखे कर्करोग तीव्र दुखण्यासाठीच ओळखले जातात. अशा परिस्थितीत रुग्णाच्या शरीरात औषधाचा पुरवठा करणारा पंप बसवण्याचा उपायही विकसित झाला आहे. तोंडावाटे घेण्याच्या औषधाच्या डोसपेक्षा शरीरात बसवलेल्या पंपमधून दिला जाणारा डोस अत्यल्प असतो. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम टाळले जातात आणि रुग्णाला आवश्यक त्या प्रमाणात औषध  मिळत राहते. ‘सेरेब्रल पाल्सी’सारख्या आजारांत शरीरात खूप ताठरपणा आलेला असू शकतो. अशा वेळी ताठरलेले स्नायू रीलॅक्स व्हावेत या उद्देशाने ‘बॅक्लोफेन’ हे औषध दिले जाते. हे औषधही शरीराच्या आत पंप बसवून त्यातून देणे फायदेशीर ठरू शकते…

डॉ. कृष्णा शेषराव जगदंबे

M.B.B.S. D.A. FIPM CIPM (Delhi)  ,इंटरव्हेंशनल पेन फिजिशियन,

नवजीवन पेन मॅनेजमेंट सेन्टर ,बोरबन  , नांदेड ..

संपर्क – ९९७०५९६६९५

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot