February 27, 2021
परमीत सिंघ थान सिंग बुंगई …!

परमीत सिंघ थान सिंग बुंगई …!

 

पंचवीशीतील एक यशस्वी युवा उद्योजक …!

नांदेड शहरात … आपण जुना मोंढा परिसरात गेल्यावर एक शांत व चिंतनशील युवक भल्या पहाटे आपल्या दैनंदिन कामाकाजासाठी आपल्या संपूर्ण टिमच्या नियोजनात व्यस्त असतो .. उत्साहाने आपल्या संपूर्ण टिमला .. तो तरूण दिवसाचे नियोजन समजावून सांगत असतो … ओ लाला .. अरे गजु सेठ.. ओ भाई … अशा लिनतेच्या स्वरात तो त्याच्या टिमला मार्गदर्शन करतांना दिसून येतो …तसे पाहायला गेले तर अंत्यत सुखवस्तु कुटुंबातील या तरुणाला स्वतःचे काही काम करण्याची तसे पाहीले तर आवश्‍यकता नाही पण … त्यांना भेटल्यावर आपल्या सहजपणे लक्षात येईल की , अंत्यत श्रीमंत व सुख वस्तू कुंटुबात जन्म घेतलेल्या श्री परणित बुंगई .. हे एक वेगंळ व्यक्तिमत्व आहे ..

सर्व साधारणपणे आपण आपल्या कार्यालयात पोहोचल्यानंतर साहजिकपणे सर्वप्रथम आपले ई-मेल पाहतो… त्यानंतर ते मिटिंग मध्ये व्यस्त होतात आणि मग आपल्या सहकार्यां सोबत गप्पा केल्यानंतर पुन्हा ई-मेल किंवा फेसबूक पाहण्यात वेळ घालवतात. दरम्यानच्या काळात ते थोडे बहुत काम सुद्धा करतात.…. अशी सर्वकष कार्यालयीन जीवन शैली आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवली असेल यात शंका असण्याचे कारण नाही पण श्री बुंगई यांना भेटल्यावर लक्षात येते की , ते त्यांच्या कामाप्रती अंत्यत निष्ठावान असून त्याबरोबरच त्यांच्याशी बोलल्यानंतर समजते की .. या तरुणाने पुण्यातील नावाजलेल्या सिम्बाएसिस सारख्या नामांकित संस्थेतून ग्रॅज्यूऐट इंन बिजनेस स्टडीज या शाखेतून उतीर्ण आहेत .. शिक्षणानंतर त्यांनी मुथूट फायनान्स् सारख्या संस्थेत नांदेडात जवळपास दिड वर्षे शाखाधिकारी म्हणून काम केले आहे …त्यांनी त्यांच्या तेथील कार्यकाळात अनेक नव-नवीन उपक्रम केले आहेत आणि आता  त्यांनतरच आपली स्वप्ने सत्यात आणण्याकरिता ते आता पूर्णवेळ व्यावसायिक म्हणून कार्यरत झाले आहेत …

त्यांच्या मूथूट मधील कारकिर्दी बद्दल सांगतांना ते म्हणातात की मी नेहमीच कामाला प्राथमिकता दिलेली असल्यामुळे आताही माझ्या स्वतःच्या व्यावसायातही तिच कार्यप्रणाली म्हणजेच कामाला प्राथमिकता व कामाची यादी बनवणे तसेच आपल्याला दिवसभरात कोणते काम करायचे नाही याबाबत सुद्धा त्यांना चांगली माहिती असते.

कामावर विश्वास  हेच यशाचे खरे गमक ..!

उद्योजक केव्हाही यश मिळवण्यासाठी शॉर्टकट मार्ग शोधत नाहीत. ते आपल्या कामावर मनापासून प्रेम करतात आणि त्यासाठी आपले शंभर टक्के देत असतात. त्यांच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळावी हा त्यामागचा उद्देश असतो. .. या वाटचालीत त्यांनी पुढे जातांना हॉटेल व कॅटरींग व्यवसायात मार्गस्थ होण्याचे ठरवले असून त्या नुसार त्यांनी आपली वाटचाल सुरू केली आहे …

स्वस्त दरात गरजूंना भोजन मिळावं यासाठी आखण्यात आलेल्या ०५  रुपयांत ‘शिवभोजन’ योजनेला २६ जानेवारी २०२० पासून ही योजना राज्यभरात सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्तात भोजन मिळावं यासाठी शिवभोजन योजनेची सुरुवात करण्यात आली असून. या योजने अंतर्गत गरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात स्वच्छ, पोषक, ताजे भोजन संपूर्ण राज्यात देण्यात येत आहे.

आपल्या परोपकारी स्वभाव नुसार आज रोजी श्री परमीत सिंघ बुंगई हे रेल्वे स्थानक परिसरात शिवभोजन भोजनालय आपल्या बुंगई हॉटेल मार्फत चालवितात यासाठी भल्या पहाटे त्यांना मेनूपासून सगळी तयारी करावयाची असते तसेच मुळातच त्यांचा स्वभाव हा क्वालिटी देण्याचा असल्यामुळे व शिवभोजन योजनेतील भोजनालय ही सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु अशी असल्यामुळे त्यांना वैयक्तिक रित्या सगळ्या बाबींवर लक्ष देतांनाच राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या ॲप मध्येही ठरलेल्या वेळेत सगळ्या बाबी नमूद कराव्या लागतात त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरू होते …आज जवळपास 200 पेक्षा जास्त थाळी भोजन ते उपलब्ध करून देतात वेळ प्रसंगी स्वतःही या कामात पुढाकार घेतात…

तसेच त्यांच्या वतीने भोजनालयात अन्नपदार्थ तयार करण्यासाठी स्वच्छ फिल्टर्ड पाणी वापरले जाते तसेच. भोजनालयात स्वच्छ टेबल आणि खुर्च्या कायम स्वरूपी ठेवलेल्या असतात तसेच स्वयंपाकगृहात खाद्यपदार्थ तयार करताना प्रदूषण होणार नाही याचीही ते काळजी घेतात … विशेषतः कोरोना काळात शिवभोजन केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या तत्परतेबद्दल ते विशेष समाधान व्यक्त करतांना सांगतात की, शिवभोजन सुरू झाल्यांनतर काही दिवसांतच लॉकडाऊन सुरू करण्यात आले यावेळी अनेकानेक गरजुंना भोजन व्यवस्था करण्याचे सौभाग्य आम्हा मंडळींना लाभले हे आम्ही आमचे सुदैव मानतो तसेच मला वाटते की उद्धव ठाकरे साहेब सरकारीची ही योजना कोरोना काळात खऱ्या अर्थाने लोकाभिमुख ठरली असून या योजनेचा खराखुरा लाभ नागरिकांना कडक लॉकडाऊनच्या काळात झाला असल्याचे ते मोठ्या आनंदाने मत मांडतात … आपल्या शिवभोजन केंद्राला एकदा अवश्‍य भेट द्यावी ही विनंती ते सर्वांना आवर्जून करतात

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot