March 8, 2021
अवलिया वैद्यक शास्त्रातील …डॉ.राजेश पंडीत ..!

अवलिया वैद्यक शास्त्रातील …डॉ.राजेश पंडीत ..!

 

आजच्या धाकधुकीच्या आणि वेगवान काळात प्रत्येकाला आपल्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष द्यायला वेळ मिळतच नाही अशी परिस्थिती कमी अधिक प्रमाणात सगळीकडेच आढळून येते त्यामुळे विविध आजारांना आजचा मनुष्य हा सहजासहजी बळी पडतो , बदलेली जिवनपद्धती , खाणपान , राहणीमान ताणतणाव आदींमुळे वरवरून न दिसणारा पण मरणोप्राय त्रास देणारा आजार म्हणून मुळव्याधी कडे बघितले , मुळव्याधीच्या रुग्णांना जो त्रास असतो तो त्यांनाच त्याची जाणीव व व्याप्ती अगदी जवळून माहीती असते , अशा अवघड आणि संवेदनशिल रुग्णांसाठी मुळव्याधीचा तज्ञ डॉक्टर हा काही देवापेक्षा कमी नसतो हे आपण अशा रुग्णाला भेटल्यानंतर सहजपणे जाणून घेऊ शकता अशा पिडीतांसाठी मागील दोन दशकांपासून नांदेडातील रुग्णांना विनम्र सेवा देण्याच काम करणाऱ्या डॉक्टरांत डॉ. राजेश पंडीत यांचा वरचा क्रमांक आहे ,

डॉ. पंडीत यांच्याशी बोलतांना लक्षात येते की रुग्णसेवेला भारावून गेलेल्या डॉक्टरी व्यक्तिमत्वपैकी ते एक आहेत ते भारतीय वैद्यकीय क्षेत्राबदल आपले मत मांडतांना म्हणतात की भारतात आरोग्य सेवा पध्दती ब्रिटीश राजवटीपासून सुरु झाली. सुरवातीस आरोग्य सेवेची उददीष्ट सैनिक व युरोपीयन नागरी नोकरांना सेवा देणे हे होते व साथरोग नियंत्रण उदा.प्लेग, कॉलरा, देवी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने प्राधान्याने कॅन्टोमेंट भागात सुरु केली. ब्रिटीश राजवटी पाश्चात पध्दतीचे औषधोपचार सुरु केल्यामूळे अस्तित्वात असलेल्या पारंपारिक औषधोपचार व आयुर्वेदिक उपचार याकडे दुर्लक्ष झाले. सुरवातील मोठया शहरात हॉस्पिटल व दवाखाने यांच्यामार्फत उपचारात्मक सेवा देणे सुरु केले अशा प्रकारे आपल्याकडील वैदयकीय सेवा क्षेत्राला सुरूवात झाली .

पुढे अधिक सखोल माहीती देतांना ते म्हणतात की नियोजन समितीने सर्वसाधारणपणे १९४० साली ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणेची सूचना केली व दर १००० लोकसंख्येला १ आरोग्य सेवक व प्रमाणात आरोग्य सेवकांना आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले.

त्यानुसार देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद् १९४२ साली कलकत्याजवळ (पश्चिम बंगाल) शिंगुर या गावी सुरु केले. त्याला ग्रामीण आरोग्य पथक असे संबोधण्यात आले. ग्रामीण आरोग्य सेवा डॉ.जेम्स ग्रॅड, संचालक, अखिल भारतीय स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविला होता हा झाला वैदयकीय सेवा क्षेत्राचा देशपातळीवर थोडक्यात ईतिहास पुढे .त्याचसुमारास मुंबई प्रांत सरकारच्या आर्थिक सहाय्याने आरोग्य सेवा पदध्ती महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे दवाखाने राज्यात सोयीच्या ठिकाणी सुरु करण्यात आले त्यालाच नागरी दवाखाने म्हणत नंतर हे सर्व दवाखाने जिल्हा परिषदेमध्ये वर्ग करण्यात आले.

खऱ्या अर्थाने १९८० नंतर आमच्या वैदयकीय व्यवसायाला अत्याधुनिकीची झालर व तंत्रज्ञान प्राप्त होत गेले पण मुळव्याधी सारख्या आजारावर कायमस्वरूपी व कमी त्रासाचा ईलाज ईतक्यात उपलब्धच नव्हता त्याही परिस्थितीत रुग्णांना धीर व सेवा देण्याचे काम आमचे डॉक्टर बांधव प्रामाणिक पणे करत होते काळाबरोबर या व्याधीच्या आधुनिक उपचारांनी रुग्णाला कमी कालावधी , कमी त्रासात बरे होण्याकरिता बरेच नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले

आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच वैद्यक शास्त्रातील नवीनत्तम बदल हे फार आशादायी असे आहेत असे ते आर्वर्जून नमुद करतात ..

डॉ. राजेश पंडीत ,

संचालक आयुष हॉस्पिटल्स् , सेंटर पाँईट , शिवाजीनगर , नांदेड

मो . ९४२२९०९०००

शब्दाकंन – मारोती सवंडकर – नांदेड

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot