March 9, 2021
तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी वाटचाल ….!

तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी वाटचाल ….!

ग्रामीण भागातून आलेले यशस्वी उद्योजक -संतोष मोरे

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील टेळकी या छोट्याशा गावातून आलेले संतोष मोरे नांदेड शहरात आज एक यशस्वी तरुण उद्योजक म्हणून ओळखले जात आहेत , त्यांनी कमवा आणि शिका या धोरणानुसार दहावी पासूनच नोकरी करत करत बि.ए.. पर्यंतचे शिक्षण घेतले.

आपल्या व्यवसायाविषयी सांगतांना संतोष मोरे म्हणतात सुरवातीच्या काळात मी काही खाजगी कंपनीत काम करत असताना मला कुठेतरी वारंवार जाणवत होते कि आपल्या कामावर बंधने येत आहेत त्यामुळे आपल्या कल्पना कार्यान्वित करता येत नाहीत मग आपण स्वतःच व्यवसाय का सुरु करू नये ?

यातून प्रेरणा घेत व आपला व्यवसाय म्हणजे आपल्या कल्पनांना आणि निर्णयांना स्वातंत्र्य असा विचार करून, सन २०१० च्या सुमारास काही मित्रांच्या मदतीने सुरवातीच्या काळात एक ते दीड लाख रु. भांडवल टाकून आर ओ वॉटर प्लांट चा व्यवसाय सुरु केला .पुढे येणाऱ्या लहान-सहान अडचणी व अडथळ्यांना मेहनतीच्या बळावर तोंड देत आज आमच्या साईबाबा एंटरप्राईझेसची आजची वार्षिक उलाढाल दोन ते अडीच कोटीच्या घरात पोहोचली आहे . व्यवसायासंबधात बोलताना संतोष मोरे म्हणतात कि मेहनत ,चिकाटी तसेच सेवा पुरविण्याची पद्धती यावर व्यवसायाची यशस्विता अवलंबून असते

सध्याच्या व्यवसायासाठी लागणार कच्चा माल ते हैदराबाद ,मुंबई, गुजरात येथील मार्केट मधून आणतात ,त्यांच्या व्यवसायीक वृद्धीबदल व ईतर क्षेत्रात तो वाढविण्यासंदर्भात ते म्हणतात की  केंद्रीय शासनाच्या धोरणानुसार अपारंपरिक ऊर्जा वापरासंदर्भात पुढाकार घेऊन कमीत कमी किमतीत सामान्य लोकांपर्यंत सोलर पॉवर द्वारे वीज पुरवठा करण्याचा आमचा साईबाबा एंटरप्राईझेस चा मानस आहे ,पुढील वर्षभरात दोन ते तीन हजार घरात सोलर द्वारे वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे ते मोठ्या आत्मविश्‍वासाने बोलून दाखवितात.

सौर उर्जा ही काळाची गरज आणि तीचा वापर हा पैसा बचतीचा उत्तम मार्ग ..

खिडकीतून मिळवा घराला पुरणारी वीज!

कमी सूर्यप्रकाशही पुरेसा; सौरऊर्जा साठवण्याचीही सुविधा …..

महागाईचे चटके बसत असताना सौरऊर्जेमुळे महिन्याच्या वीजबिलाचे बजेट वाचणार असेल, तर असे तंत्रज्ञान कोणालाही हवेहवेसे वाटेल. घरासाठी बसवलेली सोलर पॅनेलच्या रूपातील एक छोटीशी खिडकी तुमच्या घरातील वीज उपकरणांच्या गरजेसाठी उपयुक्त ठरली, वीजबिलात कपात झाली आणि अशी वीज साठवून ठेवता आली, तर असे मॉडेल प्रत्येकालाच हवेहवेसे वाटेल ना? असेच नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले आहे दिनेश कदम या उद्योजकाने.

सध्याच्या वाढत्या वीजदराच्या काळात अगदी घरातील विजेची उपकरणांची गरज असो किंवा शाळा, हॉस्पिटल किंवा एखादा उद्योग, त्यांच्या गरजेनुसार सौरऊर्जेवर आधारित उपकरणांचा हा पर्याय उपयुक्त ठरेल. एखाद्या इमारतीला संपूर्णपणे सौरऊर्जेचा पर्याय हवा असेल, तर त्यासाठी बिल्डिंग इंटिग्रेटेड फोटो व्होल्टाइक्‍स (बीआयपीव्ही) हे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार बांधकाम साहित्यासोबतच सोलर तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येतो. पारंपरिक बांधकाम साहित्य सोलर पॅनेलद्वारे बदलणारे असे हे तंत्रज्ञान आहे.

स्कायलाइट, छत, भिंती किंवा खिडक्‍या अशा कोणत्याही ठिकाणी हे पॅनेल बसवता येतात. सोलर पॅनेलद्वारे सौरऊर्जा ही बॅटरीशिवाय थेट इनव्हर्टरच्या उपयोगाने थेट ग्रीडशी जोडता येते आणि घरातली उपकरणे चालवण्यासाठी वीज उपलब्ध होते, अशी या तंत्रज्ञानाची सुलभ रचना आहे. कोणत्याही अतिरिक्त वायरिंगची गरजही यासाठी नसल्याने खर्चही खूप कमी होतो. बॅटरीचा समावेश असलेल्या या तंत्रज्ञानात सौरऊर्जा साठवताही येते. त्यामुळे सौरप्रकाश नसला, तरी ही “साठवलेली’ वीज रात्रीच्या वेळी वापरण्याची सुविधा आहे.

अधिक व विस्तृत माहीतीसाठी संपर्क….!

श्री संतोष मोरे , साईबाबा एंटरप्राईझेस्, राज कार्नर नांदेड ..

मो. ९६७३४०६९७९

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot